त्याकाळी जगभरातली लोकं स्वस्तात किडनी विकत घेण्यासाठी भारतात यायची..

डॉक्टरकी पेशाला देवमाणसाचं नाव दिल जात. जो आपल्या कर्तव्याच पालन करत अनेकांचा जीव वाचवतो. मात्र, याच पेशात रुग्णांच्या  गरिबी, असहाय्यतेचा किंवा  अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कधी पैशाच, कधी नोकरीच आमिष दाखवून तर कधी नकळतचं किडनी दान करणाऱ्याला तयार करायचं आणि किडनी प्रत्यारोपनाचा व्यापार सुरु झाला.

१९७० च्या दशकात भारतात  एखाद्या व्यक्तीच्या शरीरातला अवयव काढून दुसऱ्याच्या शरीरात बसवायचं तंत्रज्ञान विकसित झालं.  हे जरी लोकांच्या भल्यासाठी असल तरी अनेक तथाकथित ‘देवमाणसांनी’ एका किडनीवर माणूस जगतो या वस्तुस्थितीचा फायदा घेत काळाबाजार सुरु केला.

यात वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, रुग्णालयं, एजंटस्,  स्थानिक दलाल सामील झाले आणि हळू- हळू हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं.

या प्रकरणाची चर्चा सगळीकडे होती, मात्र हाती काहीच लागायचं नाही. या गैरव्यवहारातून दरवर्षी  ८० कोटींची उलाढाल आणि जवळपास ५ हजार शस्त्रक्रिया होतायेत हे आढळल्यावर भारत सरकारचे डोळे उघडले आणि १९९४ मध्ये मानवी अवयव रोपण कायदा समंत केला. ज्यानंतर सरकारी यंत्रणा हरकतीत आल्या आणि  या पहिल्या  रॅकेटचा पर्दाफाश झाला.

१९९५ सालच्या जानेवारी महिन्यात असाच एक माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला.

दिल्ली,  चेन्नई, मुंबई, बंगळूरू अश्या शहरांत हे जाळं पसरल होत. भारतात कायदा सामंत झाल्याने किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया भारतात न करता डोनरला परदेशात नेऊन शस्त्रक्रिया करणार जाळ दिल्लीत उभं केल गेल. जे दिल्लीच्या कस्टम अधिकाऱ्यांनी उघड केल्यानंतर माध्यमांत हे प्रकरण झळकू लागलं.

 त्या पाठोपाठ लगेच २३ जानेवारी १९९५ ला चेन्नईमधील या  अवैध किडनी विक्री प्रकरणाचा भंडाफोड करण्यात आला.

तिथल्या विलीवक्कम या कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसन केंद्रातील रुग्ण पैशांसाठी एजंटमार्फत किडनी विकत असल्याच निष्पन्न झाल. त्यानंतर ६ दिवसातचं म्हणजेच २९ जानेवारी  १९९५ ला बंगळूरू पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पसरलेलं किडनी रॅकेट हुडकून काढालं. बंगळूरूमधील एका प्रसिद्ध डॉक्टरने रुग्णालयामध्ये जवळपास  १ हजार लोकांच्या किडन्या काढल्याच उघड झाल.

किडनीच्या  बदल्यात नोकरी देण्याच आश्वसन तिथ दिल जात होत. तर अनेकांनी आपल्या परवानगीशिवाय  किडनी काढल्याचं सांगितलं.  मुंबईमध्येही अश्याच प्रकारच किडनी विक्रीच रॅकेट उघडकीस आलं होत.

या किडन्या परदेशात विकल्या जात होत्या. 

१९९७ मध्ये देखील हा अवैध प्रकार पंजाबमध्ये सुरु असल्याच निष्पन्न झालं. पंजाबमध्ये सुमारे अडीच हजार किडन्या काढल्याच तपासात समोर आलं. ज्यात तब्बल १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. पंजाब पोलिसांनी अनेक तज्ञ डॉक्टरांना बेड्या ठोकल्या. त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून या रुग्णालयाने खोटी शपथपत्र बनवली, ज्यासाठी  ३० हून अधिक वकिलांना नेमलं गेल होत.

यानंतर या काळाबाजारात वाढतच होत गेली. पंजाब मानवी हक्क संघटनेच्या अहवालानुसार २००० सालानंतर एकट्या अमृतसरमध्ये दीड हजाराहून अनेक लोकांच्या किडन्या काढून घेण्यात आल्या होत्या. 

या किडन्या एकतर आखाती देशात नाही तर जपान चीन या देशांमध्ये विकले जात होते. अमेरिका युरोपमधून कित्येकजण किडनी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनसाठी भारतात यायचे. या किडनी रॅकेटमध्ये डॉक्टरांसह रुग्णालयाचे कर्मचारी ते चहा टपरी चालवणाऱ्या छोट्या मोठ्या दुकानदारांपर्यंत अनेकांचा समावेश होता. राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होणे शक्य नव्हते.

कायदा बनवूनही या प्रकरणाला आळा  घातला आला नाही.

किडनी रॅकेटचा सर्वात गाजेललं प्रकरण म्हणजे २००८ साली काठमांडू येथे सापडलेला डॉक्टर अमित कुमार. हा माणूस नोएडा येथे आपल्या इस्पितळात किडनी रॅकेट चालवायचा. काही अमेरिकी नागरिकांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांना याचा सुगावा लागला. तेव्हा त्याने त्यांना वीस लाखांची लाच दिली आणि तिथून नेपाळ मध्ये पळाला. नेपाळच्या पोलिसांनी लाच घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला पकडता आले.

सध्या तो जेलची हवा खातोय.

गरीबीवर मात करण्यासाठी अनेक लोकं या गैरव्यवहारात सामील झाली आणि आपली किडनी देण्यास तयार झाली. इतर देशांच्या मनानं भारतात किडनी स्वस्तात उपलब्ध होत होती आणि कायदा असूनही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करता आली नाही. ज्यामुळे देशाबरोबरच परदेशातील रुग्णांसाठी भारत हे किडनी प्रत्यारोपणाच केंद्र बनलं. यानंतरही अनेक प्रकरण समोर आली, मात्र त्याविरोधात  ठोस पावलं उचलली गेली नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.