गांधीजींच्या हत्येसाठी नथुरामने वापरलेली “किलर कार” आज कोणाकडे आहे, माहितय का ?

अमेरिकेत तयार करण्यात आलेली स्‍टडबेकर कार. तिचा नंबर आहे USF 73. तिच मायलेट आहे चार किलोमीटर. मात्र ती गाडी एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीत असते. कारण त्याच्या नंबर प्लेटवर लिहलं आहे “किलर कार”.

किलर कार लिहण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या गाडीचा संबध गांधीहत्येशी जोडला जातो.

नथुराम गोडसे गांधीच्या हत्येच्या उद्देशाने आला तेव्हा तो या गाडीतून आला होता.  गांधीची हत्या झाल्यानंतर नथुराम गोडसेशी संबधीत वस्तू पुरावा म्हणून जप्त करण्यात आल्या. त्याचवेळी ही कार दिल्लीच्या तुघलक रोड पोलिसांमार्फत जप्त करण्यात आली होती. त्या दिवसापासून सन १९७८ पर्यन्त ही गाडी तुघलक पोलिसांच्याच ताब्यात होती. 

नथुरामकडे असणारी हि गाडी होती तरी कोणाची ? 

अस सांगितल जात की ती गाडी होती ती जौनपुरच्या राजाची. जौनपुरचा राजाची आणि नथुरामची जवळीक होती. त्यातूनच नथुरामकडे हि गाडी आली. त्याने गांधीच्या हत्येसाठी बिर्ला हाउसला जाताना याचाच वापर केला होता. १९७८ साली गाडीचा लिलाव करण्यात आला. १९७८ साली तुघलक पोलिसांमार्फत या गाडीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील एका व्यक्तीने हि गाडी घेतली व त्यावर किल्लर कार अस लिहलं.. 

35 BHP, 6 सिलेंडर आणि 3500 CC असणाऱ्या कारने एक वेगळी ओळख निर्माण केली होती ती म्हणजे किल्लर कार. त्यानंतर ती व्हिन्टेज कारच्या प्रदर्शनात जावू लागली. वेगवेगळ्या ठिकाणी तिला वेगवेगळा प्रतिसाद भेटत. काही लोक तिच्याबरोबर फोटो काढत तर बहूतांश लोक तिच्यावर दगड फेकत. गाडीला पुष्कळवेळा विरोधच होत असे. 

दिल्लीतून हि गाडी कलकत्ता तिथून वाराणसी तिथून लखनौ व तिथून बरेलीत पोहचली. अनेकांनी कौतुकाने हि गाडी घेतली पण नंतर आपल्या उद्दातीकरणाचा फोलपणा जाणवला. काहींनी ती गाडी मुद्दाम विकली तर काहींनी पैशाच्या मोहापायी. 

बरेलीच्या कमाल साहब यांच्याकडे सन २००० च्या दरम्यान हि गाडी आली. लखनौच्या एका व्यक्तीकडून त्यांनी हि गाडी खरेदी केली होती. त्यानंतर दिल्लीच्या ललिता पार्कमध्ये राहणाऱ्या एका मुस्लीम युवकाची नजर या गाडीवर पडली. गाडीची महती ऐकताच त्याने हि गाडी तात्काळ खरेदी केली. 

दिल्लीच्या रस्त्यावर ती गाडी पुन्हा फिरू लागली. १९७८ पासून दिल्ली कलकत्ता लखनौ बरेली करुन ती गाडी पुन्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आली होती. 

आत्ता तो युवक पुन्हा ती गाडी घेवून फिरू लागला. अशातच एक दिवशी हिमाचल प्रदेशात असताना त्याला अटॅक आला. त्यातच तो गेला. तेव्हा त्याची प्राणप्रिय असणारी गाडी देखील अनाथ झाली. या गाडीची शेवटची माहिती समजली ती या मालकाचीच. अस सांगितल जात की ललिता पार्कमध्ये असणाऱ्या त्याच्या गॅरेजमध्ये आजही ती आपल्या अंगाखांद्यावर इतिहासाची राख घेवून पडून आहे…

हे हि वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.