किम जोंग उन ‘बसं नाम ही काफी है’

स्टोरीचं टायटल वाचूनचं डोक्यात झिणझिण्या आल्या असतील. कारण उत्तर कोरियाचा  हुकूमशहा किम जोंग उन याच्या नावातचं एक वेगळी दहशतचं आहे. जगातला सर्वात बेक्कार हुकूमशहा म्हणून त्याची गिनती होते. आता त्यामागची कारण सुद्धा तशीचं आहे म्हणा. कारण तो आणि त्याचे अजब – गजब नियम नेहमीचं चर्चेत असणारा विषय.

म्हणजे, आपण देव आहोत त्यामुळं प्रत्येकाच्या घरात आपला फोटो असायलाचं पाहिजे. नाहीतर डायरेक्ट जेलची हवा खायला लागलं. असा हा एक अजब नियम. आता असे बरेच नियम आहे, जे आपण पाहणार आहोत. पण सध्या त्याच्या नव्या आणि जगावेगळ्या  फर्मानाची जगभरात चर्चा होतेय.

आता हा नवा नियम विचारलं तर ‘हसना मना है’

हे वाचून दोन मिनिटासाठी डोकं हँग पडलं असलं पण भिडू हे खरंय, या पठ्ठ्यानं आपल्या उत्तर कोरियातल्या लोकांच्या हसण्यावर ११ दिवस बंदी घातलीये. कारण हुकूमशहाच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. म्हणून ह्या १७ डिसेंबरपासून पुढच्या ११ दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल.

त्यामुळे ११ दिवसांच्या या दुखवट्यात कोणी सुद्धा हसायचं नाही. हा राष्ट्रीय दुखवट्यात कोणाचा वाढिदवस असेल तर त्याने तो साजरा सुद्धा करायचा नाही. नागरिकांनी रिलॅक्स राहता कामा नये आनंदी राहू नये म्हणून इथल्या लोकांची विश्रांतीची सगळी कामं सुद्धा बंद करण्यात आलीत.

या राष्ट्रीय दुखवण्यात कोणी दारू सुद्धा प्यायची नाही, कि कोणी शॉपिंगला जायचं नाही, नवीन कोणती वस्तू घ्यायची नाही कि रोजच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर सुद्धा पडायचं नाही.

एवढंच नाही तर या ११ दिवसात हसण्यावरचं नाही तर रडण्यावर सुद्धा बंदी आहे. म्हणजे या ११ दिवसात जर कोणी वारलं तर त्याच्या कुटुंबातील कोणी जोरजोरात रडायचं सुद्धा नाही. तसचं त्या मेलेल्या माणसाचा मृतदेह या दिवसात अंतिम संस्कारासाठी सुद्धा न्यायचा नाही, ११ दिवस पूर्ण झाल्यानंतरचं त्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले जातील.

आणि खबरदार! जर कोणी हे नियम  मोडले तर त्याला डायरेक्ट जेलची हवा खायला लागणार. आणि तिथून रिटर्न येण्याचा कुठलाच  रस्ता नसेल.

आता तसं  हा राष्ट्रीय दुखवटा दरवर्षी असतो. याआधी किम जोंग-इलच्या पुण्यतिथीला  दारू पिताना नाहीतर कोणी नशेत एकदम टाईट झालेल्या अवस्थेत सापडला तर त्याला अटक केलं जातं आणि गुन्हेगारांप्रमाण त्याला ठेवण्यात येत. त्याला आजीवन तिथंच राहायला लागत, एवढं नाही अटक केल्यानंतर ना त्याची कोणती चिठ्ठी ना संदेश.

यासोबतचं अशा  बर्‍याच अटी-शर्ती किम जोंग उननं उत्तर कोरिया घातल्यात.

म्हणजे काही दिवसांपूर्वी त्या हुकूमशहानं देशात लेदर जॅकेट विकायला आणि वापरायला बंदी घातली. नवीन नियमांनुसार, उत्तर कोरियात लाँग लेदर ट्रेंच कोट विकले जाणार नाहीत किंवा कोणीही हे जॅकेट विकतही घेणार नाही. यामागचं कारण म्हणजे हुकूमशहा किम जोंग उन आपल्या आवडत्या लेदर कोटची नक्कल केल्यामुळे संतापला, म्हणून या पठ्ठ्याने डायरेक्ट लेदर जॅकेट वरचं बंदी आणली. 

उत्तर कोरियात लोकांच्या राहणीमानावर सुद्धा निर्बंध आहेत. म्हणजे पुरुष मंडळी फक्त २८ प्रकारच्याचं हेयर स्टाईल करू शकतात. या २८ हेअर स्टाईल सोडून दुसरी कुठलीही हेअर स्टाईल केली त्याला अटक केलं जातं.

दुसरीकडे, जर महिला विवाहित असेल तर तिला तिच्या आवडीची  हेअर स्टाईल करण्याची परवानगी आहे. पण जर एखाद्या महिलेचं लग्न झालं नसेल तर तिला तिचे केस बारीकचं ठेवायला लागतील.

हद्द म्हणजे हा जगातला पहिला देश आहे, जिथे तीन पिढ्यांपर्यंत शिक्षा दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीने कोणताही गुन्हा केला तर त्याची शिक्षा केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला दिली जाते, ज्यात त्याच्या आजी-आजोबांपासून ते आई आणि इतर मुलांना तुरुंगात जावं लागतं.

या नियमाचा जगभरातून विरोध होतो, पण आपल्या मनाचा मालक असलेला किम भाऊ थोडीना  कोणाचं ऐकणार.

उत्तर कोरियात लोकांच्या मनोरंजनावर सुद्धा बंदी आहे, म्हणजे परदेशी म्यूजिक ऐकणं किंवा परदेशी भाषेतील चित्रपट पाहणं हे गुन्हेगारी कृतीशी संबंधित मानले जाते. उदाहरण द्यायचं तर तुम्ही अमेरिकन चित्रपट पाहिला तर फाशीची शिक्षा होऊ शकते,  भारतीय चित्रपट पाहिल्यास तुरुंगवास आणि पोर्नोग्राफी शेअर केला तर जिवाला मूकलातं. 

त्यातल्या त्यात टीव्ही बघत असाल तर तुम्ही कोणतेही तीन चॅनलचं बघू शकता, आणि हे तीन चैनल सुद्धा सरकारचा कंट्रोलमध्ये आहेत.

आता फक्त नियमचं नाही तर उत्तर कोरियाचं कॅलेंडर जगाच्या कॅलेंडरपेक्षा खूप वेगळं आहे. जग २१व्या शतकात असेल पण उत्तर कोरियाचे कॅलेंडर अजूनही तेच आहे. या देशाचे कॅलेंडर त्याचे संस्थापक किम इल सुंग यांच्या वाढदिवसावर आधारित आहे. उत्तर कोरियाच्या लोकांसाठी हे अजूनही ११० वं वर्ष आहे. देशाचं कॅलेंडर १५ एप्रिल १९१२ पासून सुरू होतं.

महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उत्तर कोरियात रहात असाल आणि दुसऱ्या देशात कॉल करत असाल तर तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागेल. आंतरराष्ट्रीय कॉल करणे येथे गुन्हा मानला जातो. 

येथे इंटरनेट ऐवजी, त्याचे स्वतःचे इंट्रानेट आहे, ज्याचे नाव Kwangmyong आहे, जे २००० मध्ये लॉन्च केले गेले. त्यातही तुम्ही फक्त २८ वेबसाइट्स व्यावसायिक गरजांसाठी वापरू शकता आणि तेही सरकारच्या देखरेखीखाली. जगभरातील उत्तर कोरियाच्या दूतावासांमध्ये वाय-फाय वापरण्यास बंदी आहे.

इथं करियर करायला सुद्धा कॉम्प्रमाईज केलं जात.  म्हणजे एखाद्याला आपला व्यवसाय निवडायचा असेल, तर ते सुद्धा तिथलं सरकार ठरवतं. देशाच्या गरजेनुसार लोकांना व्यवसायात पाठवले जातं. जर कोणी तसं करायला सहमत नसेल तर त्यांना जबरदस्तीने लेबर कॅम्पमध्ये पाठवले जातं

आता हे सगळं वाचून तुम्ही विचार करत असाल की लोकंं इथलं सरकारचं का बदलतं नाही, तर भिडू ते करता आलं असतं तर केलं नसतं का?

म्हणजे इथं नावापूरतं मतदान होतं पण मतदान एकच उमेदवारासाठी होतं. १९४८ पासून इथं एकाचं घराण्याची सत्ता आहे. मतदारांना निवडण्यासाठी एकच उमेदवार आहे. मगं ती निवडणूक कुुुुुठलीही असो.

आता असले नियम आहे म्हंटल्यावर कोण त्या देशात राहायला तयार होईल. पण भिडू इथं परवानगीशिवाय देश सोडून जायला सुद्धा मनाई आहे. येथील नियम इतके कडक आहेत की लोक आपला जीव धोक्यात घालून दक्षिण कोरियाला जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असंं करताना कोणी पकडला गेला तर  थेट गोळ्या घातल्या जातात.

आता असे अनेक नियम आहेत त्यामुळे तिथल्या लोकांचं जगणं मुश्कील झालयं. एकूणच काय इथल्या लोकांना ना धडं जगता येतं, ना मरता येतं. म्हणूनचं उत्तर कोरियाला पृथ्वीवरचा नक्की समजलं जातं. त्यामुळे भिडूंनो आपलं नशीब चांगलं माना आणि हुकुमशहाच्या या नियमांबद्दल आपलं पण मत कमेंट करून सांगा.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.