किम आण्णा सिंगापूरच्या मिटींगला स्वत:चा टॉयलेट घेवून गेले होते : टॉयलेट एक प्रेमकथा. 

अर्थात किम जोंग उन. किम आण्णा भयंकर भारी माणूस. कोरियन राष्ट्राध्यक्षानं आपल्या देशाच्या सीमा पहिल्यांदाच ओलंडण्याचा पराक्रम किम आण्णांच्या नावावर रजिस्टर झाला आहे. सिंगापूर येथील समिट मध्ये ट्रम्प तात्या आणि किम आण्णा भेटले आणि देशात शांतीच नवं वारू वाहू लागलं.

पण या सगळ्यात किम आण्णांनी ट्रम्प तात्यांना जोरदार टशन निर्माण केली. त्यांनी सिंगापूरला जाताना स्वत:च टॉयलेट अर्थात पोर्टेबल संडासगृह घेवून गेले. ते पाहून ट्रम्प तात्यांना आपण खूपच मागं असल्याचं फिल झालं.

नेमकं कांड काय आहे ?

twitter

सिंगापूरच्या मिटींगसाठी किम आण्णा सज्ज झाले ते आपल्या संपुर्ण सुरक्षारक्षकांच्या फळीसोबत. एकतर हि मिटींग यासाठी ऐतिहासिक होती की कोणतातरी उत्तर कोरियाचा सम्राट पहिल्यांदा त्याच्या इलाख्यातून बाहेर पडतोय. दूसरं कारण हे पहिल्याच कारणामुळ महत्वाच ठरतं ते म्हणज, आलाय बाहेर तर घ्या राउंडात म्हणणार आपलं जग आहे. त्या कारणामुळेच किम आण्णांच्या सिक्यूरिटीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. दिसेल ते बुलेटफ्रुप करण्यासोबतच. विमानांचा ताफा देखील डाव्या बाजूला दोन उजव्या बाजूला दोन. असा करण्यात आला होता. कारण एकच किम आण्णांना काही होवू नये. 

या सर्व सुरक्षेच्या बातम्यांमधूनच एक बातमी बाहेर पडली ती म्हणजे किम आण्णा सिंगापूरला स्वत:चा असा पोर्टेबल टॉयलेट घेवून आले होते. याच कारण काय तर किम यांच्या मते, माणसांचा शौच हा नेहमीच खरं बोलतो. माणसानं काय खाल्लं काय पिलं इथपासून ते माणसाला कोणता रोग झाला आहे की नाही त्याची इत्यंभूत माहिती माणसाचा शौच देवू शकतो. 

लोकांनी माझा शौच गोळा केला तर त्यांना माझ्या आरोग्याची डिटेल्स माहिती मिळेल. म्हणूच मी नेहमीच माझा स्वत:चा टॉयलेट घेवून जातो. 
खास याच गोष्टीमुळे किम आण्णा आपलं वेगळपण सिद्ध करतात. ट्रम्प तात्या कितीही मनोरंजक वागले तरी देखील त्यांना ओरिजनल थॉट नाहीत अशी कवीवर्गाकडून केली जाणारी टिका त्यामुळेच तर पटते. 

Leave A Reply

Your email address will not be published.