किम जोंगपेक्षाही जबरी काम त्याच्या वडिलाने केलं होतं….
आजवर आपण अनेक हुकूमशहा वाचले, ऐकले असतील, त्यांनी केलेल्या कांडाची महती आपण अनेकदा वाचली असतील. जुने होऊन गेलेले असो किंवा आताचे जे आहेत ते असो त्यांनी केलेल्या कर्मातून त्यांनी बरीच वाहवा मिळवली. चंगेज खान, हिटलर अशा अनेक लोकांची नाव आपण ऐकली असेल. नॉर्थ कोरिया मध्ये आजसुद्धा हुकूमशाही शासन आहे.
नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या धाकात सगळा देश वावरतो. त्याने केलेल्या क्रूर शासनाने तो कायम चर्चेत असतो. पण किम जोंग उनचा बाप किम जोंग इल हा मुलापेक्षाही क्रूर होता. किम जोंग इल बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही पण त्याने एक असं कांड केलं होतं ज्यावरून कळतं कि तो मुलापेक्षाही क्रूर होता. त्याबद्दलचा आजचा किस्सा.
किम जोंग उनने सध्या नॉर्थ कोरियात बाहेरील सिनेमांवर बंदी घातली आहे. नॉर्थ कोरियात इतर देशांचे सिनेमे दाखवले जात नाही कांर किम जोंग उनचा आदेश आहे. पण किम जोंग इल हे भयंकर सिनेप्रेमी होते. सिनेमाची इतकी आगळीवेगळी आवड किम जोंग इलला होती कि त्याने थेट साऊथ कोरियाची अभिनेत्री किडनॅप केली होती.
१९७० च्या दशकात दक्षिण कोरियात उत्तमोत्तम सिनेमांनी धुमाकूळ घातला होता. आजही ७०च्या दशकातील दक्षिण कोरियन सिनेमे जागतिक पातळीवर चर्चिले जातात. चोई युन ही [ Choi Eun-hee ] आणि शिन जोंग ग्युन [ Shin Jeong-gyun ] हि त्यावेळची लोकांमध्ये फिल्म मेकींगमधली तुफ्फान लोकप्रिय जोडी होती. शिन जोंग ग्युन [ Shin Jeong-gyun ] हे नावाजलेले फिल्म मेकर होते. त्यांनी अनेक सिनेमे बनवले होते. पण दुसऱ्या ऍक्टरेस सोबत चाललेल्या अफेअरमुळे हि जोडी फुटली.
हिरोईन चोई युन ही [ Choi Eun-hee ] हिला हॉंगकॉंगला एका बिझनेस डीलसाठी बोलावण्यात आलं होतं. तिथे किम जोंग इल यांनी आधीच आपली माणसं पाठवून ठेवलेली होती. त्या लोकांनी लगोलग चोई युन हीला अपहरण करून हुकूमशहा किम जोंग इल समोर हजर केलं.
या हिरोईनला नॉर्थ कोरियात अशा पद्धतीने वागविण्यात येत होतं कि जणू ती तिच्या मर्जीने इथे आली असावी. इथे तिला किम जोंग इलसोबत बळच हसून फोटो काढायला सांगितलं होतं. या घटनेवर पुढे एक डॉक्युमेंट्रीसुद्धा बनवण्यात आली होती. अभिनेत्री सोबतच तिच्या पतीलाही किडनॅप करण्यात आलं होतं. ज्यावेळी त्याने पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा किम जोंग इलने त्याला पकडून जेलात डांबलं.
त्या हिरोईनकडून किम जोंग इलने तब्बल २ वर्षे सिनेमांमधून काम करून घेतलं. या हिरोईनकडून बळजबरीने दोन वर्षात १७ सिनेमा किम जोंग इलने करवून घेतले. तिला रात्री झोपू दिलं जात नसे, फक्त तीन तास झोप आणि त्यानंतर पूर्णवेळ तिच्याकडून काम करून घेतलं जात असे. या तीला अश्लील सिन दिले जात असे. त्या दोन्ही पती पत्नीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं कि त्यांना किडनॅप केलेलं आहे.
पुढे या जोडीला या कारणावरून सोडण्यात आलं कि ते इथून पुढे नॉर्थ कोरियासाठी सिनेमे बनवतील. १९८६ मध्ये युरोपियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये नॉर्थ कोरियातर्फे किम जोंग इलने या हिरोईनला आणि तिच्या पतीला पाठवलं. पण त्यांच्यावर पहारा सुरूच होता. पण या नवरा बायकोने हुशारीने तिथून पळ काढला आणि ते अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले.
यावरून आपण अंदाज लावू शकतो कि किम जोंग पेक्षा त्याचा बाप किती विचित्र होता. सिनेमा आवडतो म्हणून तेहत हिरोईनला किडनॅप करणारा तो एकमेव हुकूमशहा किंवा सिनेवेडा गडी असावा.
हे हि वाच भिडू :
- एका जर्मन ऑफिसराने हिटलरच्या टेबल खाली बॉम्ब लावला होता..
- म्हणून एकनाथ खडसेंच्या डाव्या हातावर हिटलरच्या उलट्या स्वस्तिकचा टॅटू आहे..
- हिटलरच्या हल्ल्यात बेघर झालेल्या ६०० पोलिश मुलांना एका भारतीय महाराजाने सांभाळलं होतं…
- किम आण्णा सिंगापूरच्या मिटींगला स्वत:चा टॉयलेट घेवून गेले होते : टॉयलेट एक प्रेमकथा.