याठिकाणी राम “राजा” म्हणून पूजलां जातो. बंदूकीच्या फैरी झाडून पोलीस रोज सलामी देतात !!!

भारतात अस एक ठिकाण आहे ज्याठिकाणी रामाला आजही राजा म्हणूनच मानलं जातं. रामाला रोज पोलिसांमार्फत बंदूकींच्या फैरी झाडल्या जातात. रामाच्या हातात ढाल आणि तलवार आहे. याठिकाणी रामाचं मंदीर नाही तर रामाचा राजदरबार भरतो.

ओरछा हे मध्यप्रदेश मधील गाव या गावात रामाच मंदिर नाही तर रामाचा राजदरबार आहे. या राजदरबारात रामाच्या एका बाजूला सिता तर दूसऱ्या बाजूला लक्ष्मणाची मुर्ती आहे. राम, लक्ष्मण, सिता यांच्याबरोबरीनेच या मंदिरात हनुमान, जाबुवंत, नरसिंह, दुर्गामाता देखील उपस्थित आहेत. सोबतीला राजदरबाराचे संरक्षण म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आहे. हेच पोलिस रोज रामाला बंदूकीच्या फैरी झाडून सलामी देतात.

अशा या अनोख्या मंदिराबाबत तितकीच इंटरेस्टिंग आख्यायिका आहे.

“तर पंधराव्या शतकात ओरछा शहराचा राजे मधूकर शहाजी देव हे हे कृष्णाचे भक्त होते तर त्यांच्या पत्नी राणी गणेश कुंवारि या रामाच्या भक्त होत्या. नक्की देव कोण या त्यांच्या लढाईत राजे मधूकर यांना दृष्टांत झाला की कृष्णाने त्यांना द्वारकेला बोलवलं आहे. तिथं ते त्यांना दृष्टांत देणार आहे. त्यांनी ही गोष्ट आपली पत्नी राणी गणेश कुंवरि यांना सांगितली त्यांनी देखील लगेच मला देखील रामाने दृष्टांत दिला असून कृष्णानं दर्शन दिलं तर आपण अयोध्येला देखील जावू. राम नक्की दर्शन देईल अस सांगितलं. ओरछा जे राजा आणि राणी राम आणि कृष्ण यांच्या भेटीसाठी निघाले. ठरल्याप्रमाणे कृष्णाने त्यांना दर्शन दिलं तेव्हा राजा शहाजी देव आपल्या पत्नीला म्हणाले राम जर खरेच अस्तित्वात असतील तर तू त्यांच दर्शन घेवून त्यांना आपल्या मुलाच्या रुपात ओरछा येथे घेवून ये. राणीने राजाचा आदेश मानला आणि ती अयोध्येला पोहचली तिथे राम भेटले नाहीत म्हणून त्यांनी शरयू नदीत उडी घेतली. तेव्हा राम त्यांना प्रसन्न झाले आणि रामानं सांगितल की मी तूझा मुलगा म्हणून सोबत येण्यासाठी तयार आहे पण त्यासाठी तू एका ठराविक नक्षत्रातच माझ्यासोबत यायला हवं. राणीने देखील ते लगेच मान्य केलं आणि ठराविक नक्षत्रात चालत त्या ओरछा शहरात आल्या. त्या ज्याठिकाणी थांबल्या त्या ठिकाणीचं रामाचा राजदरबार बांधण्यात आला.”

या घटनेचा आणि रामाला नेमकं देव न मानतां राजा मानण्याच्या प्रथेचा नेमकां काय संबंध आहे ते सांगण अवघड आहे पण मध्यप्रदेशातील रामाच्या राजदरबारास प्रत्येकानं भेट द्यावी असा राजदरबार हा नक्कीच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.