किर्लोस्करवाडी खऱ्या अर्थानं भारताची मेक इन इंडिया होती.

शेतकऱ्यांची तिसरी पिढी. सहकारातून शिकली. साहेब झाली. काही पुण्या मुंबईला गेली. तर काही गावात राहिली. तिथच साहेब झाली. गावात असणाऱ्या MNC कंपनीत गलेलठ्ठ पगारावर काम करू लागली. आईबाप आणि शेतीचं जमवत आपल्याच मातीत राहून मोठ्या हूद्यावर गेली. त्या पोराचं शिक्षण झाल कारण बापाला शेतीच्या जोडीला काम करायला ती कंपनी होती.

शेताच्या मातीत उभा राहिलेली ती ७० देशांहून अधिक देशांमध्ये शाखा असणारी कंपनी आहे.

“किर्लोस्कर ब्रदर्स”

नुकतीच विसाव्या शतकाची सुरवात झाली होती. जगात ब्रिटीशांच्या सोयीचं आधुनिकतेच वारं वाहत होतं. आधुनिकता म्हणजे कापड गिरण्या, हे समिकरण भारताच्या आर्थिक विकासाची नस झालेलं होतं. या काळात लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सायकल दुरुस्ती करण्याच दूकान काढल होत.

भारतातला पहिला लोखंडी नांगर म्हणून १९०४ साली पेपरामध्ये जाहिरात देखील दिली होती.

आपली लोकं पण अतरंगी होते. लोखंडी नांगराने जमिनीत विष पसरत अशी पुडी त्यांनी सोडून दिली होती. बेळगावात किर्लोस्कर आपली स्वप्न रंगवत होते. याच काळात त्यांच्या जागेवर सरकार दप्तरी अतिक्रमण झाल. जागा गेली. त्याचसोबत काम करणाऱ्या पन्नास कुटूंबाचा संसार देखील गेला.

लक्ष्मणरावांनी औंधच्या पंतप्रतिनिधींचा दरबार गाठला. औंधचा राजा बाळासाहेब पंतप्रतिनिधी हा खरच राजा माणूस होता. देशात दूरचं दिसणारी जी थोडी माणसं होवून गेली त्यातला हा राजा. राजानं लक्ष्मणरावांच म्हणणं ऐकलं.

त्यांनी जेकब बापूजींना हाक मारली,

बापू आपल्या संस्थानाचा नकाशा घेवून या !!!”

जेकब बापू नकाशा घेवून आले. राजानं त्यांना कुठ जागा पाहीजे म्हणून विचारलं. लक्ष्मणरावांनी कुंडलच्या कोपऱ्यावर असणाऱ्या नुसतच तण उगवणाऱ्या रिकामा जागेकडं बोट दाखवलं. हिच जागा का ? कारण इथून रेल्वे जाते. हे उत्तर ऐकून राजानं हव्या तितक्या जागेला गोल करायला सांगितलं.

लक्ष्मणरावांनी कुंडल रोडच्या स्टेशनवरची ३२ एकर जागा कंपनीसाठी घेतली. राजानं जागेसोबत दहा हजार दिले आणि कुंडलच्या कोपऱ्यावर लक्ष्मणरावांची लोखंडी नांगर करण्याचा कारखाना सुरू झाला.

१० मार्च १९१० ला एका रानानं किर्लोस्करवाडी होण्याच्या दिशेनं पहिल पाऊल टाकलं.

पन्नास जणांच्या जीवावर कंपनी चालू झाली. १९२० साली कंपनी प्रायव्हेट लिमीटेड झाली. त्यानंतरच्या सहा वर्षात कंपनीने भारतातला पहिला सबमर्सिबल पंप बाजारात आणला. त्यानंतरच्या एका वर्षातच कंपनीनं भारतातल पहिल डिझेल इंजिन बाजारात आणल. १९४० ला भारतातल पहिले इलेक्ट्रिक इंजिन तर १९४१ ला भारताल पहिलं लेथ मशीन आणल. १९०३ साली भारतातला पहिला नांगर काढणाऱ्या कंपनीने पुढे भारतातल पहिल हे ध्येय जपल. त्यातून हजारो लाखों लोकांच्या आयुष्यात बदल झालाच. सोबत किर्लोस्करवाडीच्या उभारणीचा इतिहास देखील निर्माण होत गेला. एका माणसाच्या स्वप्नातून निर्माण झालेल हे महाराष्ट्रातल इंडस्ट्रीयल गाव.

Screen Shot 2018 06 20 at 6.18.21 PM
Kl

किर्लोस्करवाडी कृष्णेच्या पट्यात होत. कंपनीचे कामगार राबून कंपनीत काम करणारे. या काळात कामगारांच्या आयुष्यात एक नविन काम आल होत ते म्हणजे भारताला स्वातंत्र मिळवून द्यायच. सांगली भागातले अनेक स्वातंत्र सैनिक लपण्यासाठी किर्लोस्करवाडीत येत.

अशाच एका आंदोलनात उमाशंकर पांडे आणि सदाशिव पेडणेकर या दोघांचा जीव गेला. कंपनीच्या आवारात आजही असणार त्यांच स्मारक कंपनी कोणाची होती ते सांगण्यासाठी पुरेस होत. इथल्या लोकांनी फक्त कंपनीतच काम केल नाही तर कंपनी आपली समजून तिच्यासोबत गाव वसवलं.

असाच एक प्रसंग गांधी हत्येनंतरचा. गांधीची हत्या झाली देशभर दंगल पेटली. अशा वेळी कंपनीतच काम करणाऱ्याचा एक गट कंपनी जाळून टाकण्यासाठी कंपनीत दाखल झाला. लक्ष्मणराव त्या चिडलेल्या लोकांच्या समोर गेले. त्यांनी फक्त इतकच विचारलं की, आपण कंपनी जाळू. पण तुम्ही उद्या कुठं कामाला जाणार तेवढं मला सांगा ?

असे हे लक्ष्मणराव किर्लोस्कर. एका कंपनीन एक गाव तयार केल.जमशेदपूर जर का आधुनिक भारताचा राम असेल तर किर्लोस्करवाडी लक्ष्मण आहे. पहिला नांगर या जमिनीत झाला. पहिलं डिझेल इंजिन याच जमिनीत झालं. पहिली इलेक्ट्रिक मोटार याच जमिनीत झाली, पहिली लेथ मशिन याच ठिकाणी झाली..

पण हा असा लक्ष्मण ज्यांच्या वाट्याचं क्रेडिट द्यायचं आपण विसरुन जातो. मेक इन इंडियाचा नारा देताना आपण सुई करु शकत नाही अशा टिका करणाऱ्यापासून ते महाभारतातल्या सर्जरीचे दाखले देणाऱ्यांनी हे चांगलच लक्षात ठेवावं कि, आपल्या सुदैवानं लक्ष्मणरावांसारखी माणसं आपल्याच मातीत होवून गेली आहेत.

हे ही वाचा. 

 

9 Comments
  1. Adhik jadhav says

    महाराष्ट्राचा इतिहास शोधल्याबद्दल अभिनंदन
    आज आपल्या सारख्या लोकांची खरी गरज आहे मीडिया म्हणून

  2. Sunil M.Mali says

    Great Mahrastrian Industrialist , we Indians Salute you sir

  3. Santosh shirke says

    Few Maharashtra king such like shahu Maharaja from kolhapur ,sayajirao Gaikwad from badoda ,balasaheb pantpratinidhi from auindha kingdom dedicated indian poor society

  4. Mujawar M A says

    A true iron man, who recognised the real progress point and focused on farmers throughout his life. Hats off to his efforts!!

  5. दत्ता शिंदे says

    किर्लोस्कर खूप मोठं नाव आहे पण आता त्यांच्या मुलांनी ते मोडीत काढल आहे आता बघा किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी मध्ये 131 मराठी मूल एक बंगाली माणूस येऊन कडून टाकतो आणि राहुल साहेब त्या मुलांचं काय पण ऐकत नाहीत हे मूलं 10 ते 12 वर्ष झाले कंपनीची ग्रोथ करत होती आज त्यांना कडून कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू केली आहे आज ती मुले job less आहेत काय भेटलं ज्यांनी कंपनीसाठी रक्ताचं पाणी केलं त्याच हे फळ मिळालं HR VP कडून

  6. Bhalchandra Hebalkar says

    लेख छान. पण कांही चुका आहेत. गांधी हत्येनंतर लोक जेंव्हा कारखाना जाळण्यास आले तेंव्हा शंकरभाऊ किर्लोस्कर होते. पपा पुण्यास होते. शंकरभाऊंनी खुप सुरेख भाषण केले. त्यामुळेच हा कारखाना वाचला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी उद्योग सुरु केले ते संपुर्ण मेक इन इंडियाच होते. त्यामुळे त्यांचे क्रेडिट कोणी घ्यायचे प्रश्न नाही. पण त्यावेळी या
    उद्योगांना फुकट जमिन देणारे बाळासाहेब पंतप्रतिनिधी औंध हेही तितकेच कौतुकास प्राप्त आहेत. ओगले व किर्लोस्कर यांना फुकट जमिन देणार्यांची निदान आठवणतरी यांच्या पुढच्या पिढीने ठेवावी एवढीच अपेक्षा .

  7. Yuvaraj says

    Great laxmanrao sir

  8. Yuvaraj says

    Great laxmanrao sir
    We salute to Mr. Laxmanrao Kirloskar

  9. Pankaj Borade says

    Complete information about company.

Leave A Reply

Your email address will not be published.