फक्त एका पिक्चरमुळे इंदिरा गांधींच्या लेकाला तिहार जेलमध्ये जावं लागलं होत

इंदिरा गांधी सरकारच्या काळात देशात लागू झालेला २१ महिन्यांचा आणीबाणीचा काळ प्रत्येकाला माहितेय. या दरम्यान, बऱ्याचं बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. एवढंच नाही तर बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांवरही बंदी घालण्यात आली होती.

या बंदी घालण्यात आलेल्या चित्रपटात गुलजार यांच्या ‘आंधी’ आणि अमृत नाहटाच्या ‘किस्सा कुर्सी का’ सारख्या चित्रपटांचा सामावेश होता.

भगवंत देशपांडे, विजय काश्मिरी आणि बाबा मांजगावकर यांचा ‘किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमृत नाहटा होते, जे तीन वेळा खासदार देखील होते.

आणीबाणीमध्ये प्री- सेन्सॉरशिपमुळे चित्रपटांची आधी समीक्षा केली जायची आणि नंतर रिलीजसाठी मान्यता दिली जायची. ‘किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट समीक्षकांना आक्षेपार्ह वाटला आणि चित्रपट निर्मात्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. या नोटीसमध्ये ५१ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर आणीबाणीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

पुढे आणीबाणीचा काळ संपल्यानंतर १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. नव्या सरकारमध्ये संजय गांधी आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांच्यावर ‘किस्सा कुर्सी का’ चित्रपटाच्या मूळ प्रिंट जाळल्याचा आरोप होता. आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या शाह आयोगालाही इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी या प्रकरणात दोषी आढळले होते. कोर्टाने त्यांना २ वर्षे १ महिन्यांची शिक्षा सुनावली होती. पण संजय गांधी एक महिनाच या तुरुंगात राहिले. 

आता चित्रपटाच्या मूळ प्रिंटचं जाळल्याने चित्रपटाशी संबंधित सगळ्यांचेच मोठे नुकसान झाले होते. चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी नुकसान भरपाईची मागणीही केली होती. पण ती नुकसान भरपाई काही मिळाली नाही. पण निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा शूट करायचं ठरवलं आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही आहे. आणीबाणी संपल्यानंतर ‘किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट पुन्हा तयार करण्यात आला.

१६ फेब्रुवारी १९७८ ला प्रदर्शितही करण्यात आला.  जो त्यावर्षातला हिट चित्रपट मानला गेला. चित्रपटाने चांगली कमाई केली.

‘आंधी’ चित्रपटावरही बंदी

‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाव्यतिरिक्त गुलजारच्या आंधी चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटावर बंदी घालण्यात आली कारण सरकारला वाटले की, हा चित्रपट इंदिरा गांधींवर आधारित आहे. मात्र, याचा विषय पूर्णतः वेगळा होता. नंतर चित्रपटावरून बंदी उठवण्यात आली.

गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. १३ सप्टेंबर १९७५ ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट इतका चालला कि,  लोकांनी या चित्रपटाला सुपरहिट बनवलं.  आज भारताच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ‘आंधी’ चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.