प्रत्येक घरातील एक माणूस देशासाठी शहिद : महाराष्ट्रात आहे शहिदांच गाव. 

जवळपास असणाऱ्या कित्येक गोष्टींची माहिती आपणास नसते. म्हणजे सैनिक टाकळी सारखी काही मोजकी गावे सोडली तर इतर गावांबद्दल फारशी माहिती छापून देखील येत नाही. साहजिक अशा गोष्टी आपल्या नजरेस पडत नाहीत म्हणल्यानंतर आपणास माहिती असण्याचा संबध देखील येत नाही. 

सहसा माहित नसणाऱ्या एका जवळच्या गावाबद्दलची माहिती आज आम्ही सांगणार आहोत. हे गाव जास्त लांब देखील नाही आपल्याच कोकणात आहे. अर्थात आपल्याच महाराष्ट्राच्या मातीतलं शुरवीर शहिद सैनिकांच गाव आहे. 

ते साल होतं १९१४ चं. ब्रिटीश सत्ता होती पण तेव्हा देखील इथले तरुण सैन्यात भरती होत होते. या गावात ग्रामपंचायत होण्यासाठी १९४१ साल उजडावं लागलं होतं, तर १९१४ साली या गावची संख्या किती असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. १९१४ साली या गावातून एक दोन नाही तर तब्बल ५२ सैनिक सैन्यात होते. १९१४ साली झालेल्या युद्धात या ५२ सैनिकांपैकी सात जण शहिद झाले. याच सात सैनिकांच्या शुरगाथा सांगणारे रणस्तंभ या गावची शोभा वाढवतो. 

कुडाळ तालुक्यातील सरंबळ अस या गावाच नाव. सरंबळ, नाईकवाडी आणि तळेगाव या तिन्ही गावामध्ये एक ग्रामपंचायत आहे. पाण्याचं प्रमाण मुबलक असल्याने या गावात बारमाही शेती आणि मासेमारीचा व्यवसाय चालतो. कार्ली नदिच्या पात्रामुळे या हे गाव तसे सधन म्हणून ओळखले जाते. जय किसानचा नारा जोपासणाऱ्या या गावाने जय जवानचा नारा देखील तितक्याच आत्मविश्वासाने संभाळला आहे. 

गावचा इतिहास त्या सात शहिद शुरवीर सैनिकांपासून त्यानंतर या गावातील प्रत्येक घरातील एक ना एक व्यक्ती सैन्यात सहभागी झाली आहे. नुसती सहभागी नाही तर प्रत्येक घरातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीने देशासाठी रक्त सांडण्याचं कर्तृत्व निभावलं आहे. 

२००८ साली भारतीय लष्करामार्फत भारतीय सैन्यामार्फत ऑपरेशन रक्षक राबवण्यात आले होते. लष्कर ए तोयब्बा च्या तीन अतिरेक्यांना यावेळी कंठस्नान घालण्यात आलं होतं. भारतीय जवानांना लष्कर ए तोयब्बाचा चीफ कमांडर हफीज हमाजा याची टिप मिळाली होती. झालेल्या या कारवाईत या गावचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल मनीष कदम शहिद झाले होते. त्यांना किर्तीचक्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी गावातून सैन्यात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी फाऊंडेशनची निर्मिती केली.

अस हे शूरवीरांची परंपरा जपणार गाव आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीत आहे. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.