रोजगारावर ॲक्शन प्लॅन देणारा राज्यातला पहिला उमेदवार सापडला… 

राज्यातल्या निवडणुकीचा सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता. शेती, रोजगार, उद्योगात वाढ की पाकिस्तान, कलम ३७०. तुम्ही कोणत्या गटाचे आहात त्यावरून तुमचा मुद्दा क्लियर असेल. त्या मुद्यावर तूम्ही मत देणार देखील असाल,

पण विषय खूप साधा आणि सोप्पाय.

म्हणजे कस आमदाराला शेती क्षेत्रासंबधीत निर्णय घेण्यास वाव असतो. आमदार मतदारसंघातल्या रोजगारीवर उत्तर देवू शकतो. पण आमदार कधीच पाकिस्तानसोबत युद्ध हवं की नको यावर मतदान देवू शकत नाही. इतकच काय तर कलम ३७० हटवण्याचा जो निर्णय झाला त्यात एकाही आमदाराला आपलं मत वापरावं लागलं नाही. 

त्यामुळे आमदाराला जे अधिकार असतात त्याच मुद्दावर निवडणुका व्हाव्यात या मताचे आम्ही आहोत.

आत्ता आम्ही आहोत तरुण. जॉब लागत नाही म्हणून आम्हीच स्वत:च बोलभिडू काढून बसलोय. आत्ता सांगा आमच्यापेक्षा बेरोजगारीवर अधिक हक्कानं कोण बोलू शकतय का?

म्हणून आम्ही काय केलं तर राज्यात बेरोजगारीवर कोण बोलतय? कुणाकडे ॲॅक्शन प्लॅन आहे याची माहिती घेण्यास सुरवात केली. तेव्हा कोल्हापूरच्या ऋतूराज पाटलांच नाव आलं. आईशप्पथ खरं सांगतो पण तिथे तर गटातटाच राजकारण चालतय. तस म्हणलं तर एकमेकांची डोकी भडकवून किंवा भावनिकतेच राजकारण करून देखील चांगली मते मिळवतात येतात. अशा मतदारसंघात देखील विकासकामांवर ॲक्शन प्लॅन मिळतोय म्हणल्यानंतर आमचे डोळे टवकारले.

फोनाफोनी केली आणि ऋतूराज पाटलांचा ॲॅक्शन प्लॅन मिळवला. 

त्यात पहिलच वाक्य होतं, 

२०२४ ची निवडणूक लढविताना पाच वर्षात मी किती जणांना रोजगार मिळवून दिला, याची यादी घेवूनच तुमच्यासमोर येईल.

आत्ता बोलणारे तर खूपजण आहेत. प्रत्येक विरोधातला बेरोजगारीवर काहीतरी करणार म्हणून सांगतोय आणि सत्तेतला बेरोजगारी नाही म्हणून सांगतोय. पण या सर्व गोष्टीत बेरोजगारीवर नेमकं काय करणार विचारलं की, करुया म्हणून प्रत्येक उमेदवार वेळ मारून नेतोय. म्हणून आम्ही ऋतूराज पाटलांच्या संपुर्ण मॉडेलचा सातबारा मांडायचं ठरवलं.

पहिला मुद्दा होता तो इन्क्युबेशन सेंटरचा. 

आत्ता हा काय मॅटर असतोय तर स्टार्टअप करणाऱ्यांना चांगलच माहिती असेल. कोल्हापूरच्या संदर्भातनं सांगायचं झालं तर समजा तुमच्या डोक्यात एखाद्या स्टार्टअपची आयड्या आहे. जस की कोल्हापूरी चप्पलांना वेगळ्या स्वरुपात ऑनलाईन विकायचं आहे. आत्ता अशा फक्त आपल्याकडे आयड्याच असतात.

पण ऋतूराज म्हणतात त्या प्रमाणे, 

कोल्हापूरात इन्क्यूबेशन सेंटर झालं तर अशा आयडीया असणारे लोक तिथं येतील. एकाच जागेवरून सर्वजण काम करू शकतील. एकमेकांच्या आयड्या वापरता येतील पण तांत्रिक खर्च, अर्थसहाय्य, मार्गदर्शन हे सगळं अशा सेंटरच्या मार्फत होईल. त्यात पुढे हॅकेथॉन मार्फत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न सोडवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देखील मिळणार आहे.

उद्योग उभा करण्यासाठी काय लागतं..? 

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास. अरे भिडूंनो ते मागाहून येत. आधी लागतं ते म्हणजे शॉप ॲक्ट लायसन्स, पॅनकार्ड, आधार कार्ड, बॅंकेत अकाऊंट, GST व income tax बद्दल माहिती.

आपल्याकडं जिद्द, चिकाटी असते पण विदाऊट GST नंबर. अशा वेळी काय होतं नसतय. ऋतूराज पाटलांच्या योजनेत आम्हाला सर्वात चांगली गोष्ट दिसली ती म्हणजे, उद्योग सहाय्यता केंद्र स्थापन करुन प्रत्येक केंद्रावर एक उद्योग मित्र उपलब्ध करुन देण्यात येणार. असा माणूस तुमचा GST नंबर कसा काढायचा इथपासून शॉप ॲक्ट लायसन्सपर्यन्त सर्व काही सांगणार.

इतक्यावर न थांबता इथूनच बॅंकेच्या लोनसाठी प्रपोजल तयार करणं, बिझनेस प्लॅन तयार करणं देखील चालणार. खरंच सांगायचं तर हल्ली डोकं खूप असतं पण साधी PPT करता येत नाही. अशा वेळी उद्योगमित्र असल्याल बरंच आहे.

रिव्हर्स मायग्रेशन बेनिफिट. 

आत्ता हे काय नविन. कारण हे आम्ही पहिल्यांदा ऐकतोय. त्याचा काय फायदा म्हणून डिटेल वाचल्या तेव्हा समजलं की आंध्रात जगनमोहन रेड्डीने लोकल पोरांना ८० टक्के आरक्षण देवून जो राडा केला तसाच हा प्रकार आहे. पण त्याच्या दोन पावलं पुढची सिस्टिम आहे ही. ऋतूराज पाटील म्हणतात की,

पुण्या मुंबईतून जास्तीत जास्त कंपन्या कोल्हापूरात याव्यात म्हणून निवडून आल्यावर अशा कंपन्यांना रिव्हर्स मायग्रेशन बेनिफिट देता येतात का त्यावर प्रयत्न करणार आहे.

त्यातलीच एक गोष्ट विचार करण्यासारखी होती ती म्हणजे, 

कोल्हापूरात येवून भुमिपुत्रांना रोजगार दिला तर अशा कंपन्यांना घरफाळा किंवा तत्त्सम टॅक्समध्ये सवलत देण्यात येईल.

कंपन्याच्या पुढे जावून आम्हाला घ्या म्हणून आंदोलन करण्याऐवजी इथे जो लोकल टॅक्स कमी करण्याचा पर्याय दिलाय तो भारी आहे. कारण त्यामुळे लोकल पोरांना नोकऱ्या देण्यात कंपन्याचा पण फायदा होईल. शिवाय कोल्हापूरात स्वस्तात काम होतं, कॉस्टिंग कमी पडतं असा प्रचार करुन कोल्हापूरात अधिकाधिक उद्योगधंदे आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचं देखील ऋतूराज पाटलांनी सांगितलं आहे.

येस केंद्र. 

ऋतूराज पाटलांच्या मते त्यांच्या मतदारसंघातील तरुण सध्या काय करतात याचा अभ्यास त्यांनी स्वत: केलेला आहे. मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे तरुण आहेत. पण त्यांच्यासोबतीनेच अनेक तरुण असेपण आहेत जे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतात पण पास होत नाहीत. पण ते हूशार असतात. त्यांच्या हूशारीचा वापर इतर क्षेत्रात करता येईल यासाठी हे येस केंद्र उभारण्यात येणार आहेत. इथे फिनिशिंग स्कूलमार्फत छोटछोटे कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

कोल्हापूरात आयटी पार्क : काम करायचं कोडिंगच अन् खायचं मटण घरचं.  

खूप दिवसांपासून आयटी पार्क चर्चेत आहे. सध्या कोडिंग डोकोडिंग करत हिंजवडीच्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत दोन तासांनी नांदेड सिटीत पोहचण्यापेक्षा टेम्बलाईवाडीतून अर्ध्या तासात घरात तांबडा पांढरा मारून रंकाळ्यावर बसता येईल. सांगली, सातारा, कोल्हापूरमधून मोठ्या प्रमाणात युवक पुण्यामुंबईत आहेत.

कोल्हापूरात आयटी पार्क उभा करून चांगल्या कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अस ऋतूराज पाटलांच मत आहे.

आत्ता आमच्यासारख्यांसाठी सर्वात भारी गोष्ट, फ्रीलान्सर्स क्लब. 

चोवीस तास एकाच कंपनीबरोबर रहायचं हे आत्ता चालत नाही. म्हणजे कसं, बोलभिडूतून फोन आला तर आम्ही लेख लिहून देतो आणि एका लेखाच्या बदल्यात ते आम्हाला पैसे देतात. (किती ते त्यांनाच विचारा) तर अस काम करताना बसायचं कुठ हा प्रश्न असतो. आपल्यासारखी लोकसत्ता, पुढारी, लोकमत अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वेळेनुसार कुठेही काम करणाऱ्या लोकांचा प्रश्न असतो हक्काची जागा.

अशा लोकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी फ्रीलान्सर्स क्लब सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातले अस्सल भिडू तिथे जमण्याची आशा व्यक्त करतो.

मातीचं काय..? 

सगळ्यात मोठ्ठी गोष्ट आहे शेतीची. शेतीच काय करायचं. सगळे उद्योगच काढल्यावर विकाय लागतंय काय? प्रश्न साहजिक आहे पण टेन्शन नाय. यात ऋतूराज म्हणतायत की शेतीपूरक उद्योग आणि ते पण लोकल मुलांनीच उभा करावेत म्हणून मी प्रयत्न करणाराय. फुड प्रोसेसिंग, पॅकेजिंग पासून वेगवेगळे उद्योग आहेत. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या देखील आहेत त्यांनी गोडावून इथे कोल्हापूरात उभा करावीत म्हणून आम्ही प्रयत्न करणाराय.

आत्ता हे सगळं करताना कोल्हापूरात उद्योगच नाहीत की काय असा प्रश्न पडेल.

अहो  गुऱ्हाळापासून फ्रॉन्ड्री पर्यन्त लय काही काही करायची इथली परंपरा आहे. पण कसय काळाच्या ओघात गायब झालं तर परत ओरडत बसायची वेळ येईल. म्हादबा मिस्त्रीपासून बाबुराव पेंटरांपर्यन्तची माणसं या मातीत होवून गेली. अशीच अजून माणसं या मातीत तयार व्हावीत म्हणून कोणतरी प्रयत्न करत असेल तर स्वागतच आहे की.

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Digambar says

    Saglech mhantat mi nivdun aalya var he karto te karto
    Pan hi lok aadhi ka karat nahit.kaka aaya 13 varshe aamdar aahet ch ki.mag ka kele nahi job sathi kahi.
    Fakt paisa sathi college aani hospital kadali
    3 varshapasun nivdnukichi tayari chalu keli hoti mag plan karun kitibjananna KAMALA lavale

Leave A Reply

Your email address will not be published.