कोल्हापूरकरांनी इंदिरा गांधी यांना स्वतःच्या रक्ताने निवदेन लिहिलं होतं

बेळगाव महाराष्ट्र सीमावाद. असा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षांपासून मार्गीच लागलेला नाही. या प्रश्नामुळे अनेक वाद झाले, हिंसक घटना घडल्या ज्या पार राज्यापासून दिल्लीपर्यंत गेल्या. प्रकरण अजूनही कोर्टात चालूये, अनके समित्या बसवल्या आहेत.  पण १०० टक्के तोडगा आजवर निघालेला नाही.  वादाचा मुद्दा अर्थातच १९५६ साली  देशात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. या रचनेत बेळगाव, कारवार बिदर, भालकी, निपाणी, खानापूरसह बहुसंख्य मराठी भाषिक लोक असणारा भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला.

पण तसं पाहिलं तर या भागात तब्बल ५२ % मराठी भाषिक तर फक्त २३% कन्नड भाषिक आणि बाकी इतर लोक होते. त्यामुळे साहजिकच बहुसंख्येने मराठी भाषिक असणारा हा भाग महाराष्ट्रातच राहावा अशी मागणी होती. पण तरीसुद्धा हा भाग कर्नाटकात गेला. त्यामुळे साहजिकच तिथल्या मराठी जनतेत गोंधळ सुरु झाला. तेव्हापासून या प्रकारावर वाद सुरु आहे. म्ह्णून १ नोव्हेंबर हा सीमाभागात काळादिन म्हणून पाळला जातो. 

त्यात या सीमावादाचा प्रश्न कोल्हापूरकरांचा जास्त जवळचा आहे. कारण कर्नाटकात गेलेला बराच भाग कोल्हापूराचाचं त्यामुळे या प्रकरणावर त्यांचा राग असं साहजिकच आहे. या सीमावादातूनचं अनेक संघटना तयार झाल्या, कोल्हापुरात अनेक नेतेमंडळी तयार आलीत. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी हा मुद्दा तर समोर आणलाच, पण तो खऱ्या अर्थाने उचलून धरला कोल्हापूरकरांनी. 

कायदेशीर, आंदोलनाने, उपोषणाने, अगदी रक्ताने पत्र लिहिण्यापर्यंत या सीमाप्रश्नात कोल्हापूरकरांनी उडी घेतली. म्हणजे किस्सा १९७४ सालचा. ६ एप्रिल १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या पुण्याला येणार होत्या. पुणे विद्यापीठाचा रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने. काही मंडळींनी हीच संधी सीमा कृती समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. इंदिरा गांधी यांना सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी भेटायचे ठरवण्यात आले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन द्यायचा निर्णय घेण्यात आला.

हिंदीमध्ये हे निवेदन लिहिण्यात आले. त्यावर पहिले नाव होते प्रतापसिंह जाधव यांचे. डी. एस. चव्हाण, डी. एस. नार्वेकर, बापूसाहेब पाटील, गोपाळराव माने, गोविंदराव पानसरे, कुरणे आदींची नावे या निवेदनावर होती.

इतर राज्यांना पाटसकर तत्त्व लागू केले. तेच लागू करून सीमा प्रश्न सोडवावा, असे आग्रहाचे आवाहन निवेदनात करण्यात आले होते. तत्कालीन पाटबंधारे मंत्री वसंतरावदादा पाटील यांच्या प्रयत्नाने राजभवनात दुपारी भेटीची वेळ ठरली. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ इंदिराजींना भेटले. त्यांनी निवेदन लक्षपूर्वक वाचले आणि स्वीकारले. 

“यापूर्वी काही अडचणी येत होत्या. त्यामुळे सीमाप्रश्नावर तोडग्याला विलंब झाला. ‘आता हा प्रश्न सोडवण्यासाठी सत्वर विचार करू” असे इंदिराजींनी यावेळी सांगितले. बापूसाहेब पाटील, प्रतापसिंह यांनी त्यांच्याशी सीमाप्रश्नावर सांगोपांग चर्चा केली. या भेटीने सीमाप्रश्न सोडवणुकीच्या प्रयत्नात एक पाऊल पुढे टाकले गेले. प्रश्न जागता राहिला. या भेटीवेळी तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, तत्कालीन केंद्रीय मंत्री र. के. खाडिलकर, मोहन धारिया आदी उपस्थित होते.

सीमाप्रश्नावर ‘पुढारी’च्या माध्यमातून प्रतापसिंहांनी सातत्याने आवाज उठवला. अग्रलेखातून सीमावासीयांच्या व्यथांना तोंड फोडले. वेळोवेळच्या आंदोलनात ते स्वतः अग्रभागी राहिले.

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.