कोल्हापूरात गेला तर टापरून तांबडा-पांढरा वरपाय ही १० हॉटेल भारीयत

कोल्हापूरकरांच्या रांगड्या स्वभावाप्रमाणे इथलं खाद्यप्रेम सर्वपरिचित आहे. मटण प्रेमींसाठी कोल्हापूर तर स्वर्ग समजला जातो. तांबडा – पांढऱ्या रस्साशिवाय इथली खाद्यपरंपराच पूर्ण होत नाही. नवीन येणाऱ्यांना तांबड्या पांढऱ्या रस्साचं तर आकर्षण असतेच मात्र इथल्या मटणाची चव त्यांना भुरळ पाडणारी असते. 

कोल्हापुरात जाणार असाल या दहा हॉटेल मधील थाळी नक्कीच ट्राय करा. झणझणीत चवीमुळे ही हॉटेल्स राज्यभर फेमस आहेत. 

१) हॉटेल महादेव प्रसाद

मटण मसाला, मटण फ्राय आणि चिकन मसाला या तीन थाळी महादेव प्रसाद हॉटेल मध्ये मिळतात. थाळीत तांबडा, पांढरा रस्सा बरोबर सोलकढी दिली जाते. इथं थाळीत फक्त चपाती मिळते. 

खास कांदा, लसूणची चटणी वरून घरगुती मसाला तयार केला जातो. १९९८ मध्ये गणेश शिंदे यांनी  महादेव प्रसाद हॉटेल सुरु केले.  

पत्ता – हिंद मंडळ चौक, पाण्याचा खजिना, कोल्हापूर hotel mahadev

२) हॉटेल परख

१९९४ मध्ये सुरु झालेल्या हॉटेल परखची मटण थाळी फेमस आहे. त्या बरोबर तांबडा पांढरा रस्सा, अंडा करी, पुलाव दिला जातो. इथं मटण थाळी, चिकन मसाला थाळी, मटण फ्राय थाळी अशा ४ प्रकारच्या थाळी मिळतात. घरी तयार करण्यात आलेला मसाला आणि चटणीचा वापर करून हॉटेल परख मध्ये मटण, चिकन बनवलं जाते. 

संदीप पाटोळे आणि अनिल पाटोळे हे दोघे भाऊ हॉटेल परख मागच्या २८ वर्षांपासून चालवत आहेत.  

पत्ता – कावळा नाका, कोल्हापूर  

parakh

 ) मालन घरगुती खानावळ

मोठ्या हॉटेलसोबत कोल्हापूर मध्ये घरगुती खानावळीत मटण, चिकन खाण्यासाठी गर्दी होते. पेठ परिसरात असणाऱ्या अनेक खानावळी आजही नॉनव्हेजसाठी फेमस आहेत. मालन घरगुती खानावळ त्यापैकीच एक. 

४० वर्षांपूर्वी सुरु मालन घरगुती खानावळ सुरु झाली. इथं जेवायला गेलात तर मालन स्पेशल मटण थाळी ट्राय करा. या थाळी सोबत चिकन मसाला प्लेट, फ्राय मटण, अंडा करी, खिमा तांबडा, पांढरा रस्सा आणि चपाती देण्यात येतो. त्याचबरोबर स्पेशल मटण मसाला, मटण फ्राय, चिकन थाळी, रक्तमुंडी, मासा फ्राय मिळतो. मालनच्या एका मटण थाळीत दोन जण आरामात जेऊ शकतात. 

मालन खाणावळीचे मालक आहेत आनंद भाऊ जाधव. एसटी महामंडळातील नोकरी सांभाळून आनंद जाधव यांनी खानावळ सुरु केली होती.  

पत्ता – शिवाजी पेठ, कोल्हापूर 

malan

४) हॉटेल कृष्णा 

कोल्हापूर मध्ये मिळणाऱ्या इतर हॉटेलच्या तुलनेत इथं वेगळ्या पद्धतीचं मटण मिळत. हॉटेल कृष्णाची वैशिष्ट्य म्हणजे लोणी मटण आणि चॉप्स मटण थाळी. लोणी मटण थाळी बरोबर एक प्लेट लोणी मटण,  तांबडा, पांढरा रस्सा, अंडा करी, बिर्याणी आणि सोलकडी देण्यात येते. याच बरोबर मटण फ्राय, खर्डा मटण, मटण ड्राय, चिकन मसाला अशा थाळी इथं मिळतात. थाळीत चपाती, भाकरीचा ऑप्शन असतो.

घरी करण्यात आलेला ओला मसाल्यात हॉटेल कृष्णा मधील पदार्थ तयार करण्यात येतात.

पांडुरंग साळुंखे यांनी हॉटेल सुरु केले होते. आता त्यांची चौथी पिढी हॉटेल व्यसायात आहे.  

पत्ता – आझाद चौक, कोल्हापूर

५) हॉटेल दौलत

हॉटेल दौलतच्या स्पेशल थाळीत चिकन मटण फ्राय, तांबडा, पंधरा रस्सा, अंडा करी, सुक्क मटण आणि सोलकढी देण्यात येते. तर स्टाटर म्हणून सुरमई मासा देण्यात येतो. या थाळीची किंमत २८० रुपये आहे. चिकन थाळी, मटण फ्राय अशा थाळ्या हॉटेल दौलत मध्ये मिळतात. वाळलेलं खोबर, खडा मसाला, बॅडगी मिरची वापरून घरीच मसाला तयार करण्यात येतो.

२००० साली राजेंद्र पाटील यांनी हे हॉटेल सुरु केले आहे. 

पत्ता – मंगळवार पेठ, कोल्हापूर 

WhatsApp Image 2022 05 03 at 11.05.49 PM

६) देहाती 

देहाती मध्ये मटण मसाला, मटण फ्राय, चिकन फ्राय या थाळ्या फेमस आहे. यासोबत सुक्क मटण, तांबडा, पांढरा रस्सा, दही कांदा देण्यात येतो. चपाती किंवा भाकरी दिली जाते. इथं थाळी सोबत सोलकढी देण्यात येत नाही. हॉटेल देहाती मध्ये सुक्क खोबर वापरून मसाला तयार करण्यात येतो आणि त्याचा वापर मटण, चिकन बनविण्यासाठी करण्यात येतो.       

अमर बागी यांनी या हॉटेलची सुरुवात ९ वर्षांपूर्वी केली होती.

पत्ता – कावळा नाका, कोल्हापूर 

dehati 1

७) हॉटेल न्यू सुदिन

हॉटेल सुदिन मध्ये  मटण मसाला, चिकन मसाला आणि मटण फ्राय या तीन थाळी आणि स्पेशल थाळी मिळते. स्पेशल थाळीत मटण आणि चिकन फ्राय, खिमा, अंडा करी, सोलकढी, तांबडा पांढरा रस्सा असतो. स्पेशल कांद्यापासून तयार करण्यात आलेल्या मसाल्यापासून चिकन, मटण करण्यात येत. 

१९८३ मध्ये मध्ये हॉटेल सुदिन सुरु करण्यात आले. त्याचे मालक सुनील आणि नितीन सावंत आहेत. 

पत्ता – मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, कोल्हापूर

sudin

८) शेतकरी ढाबा

गावरान पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या चिकन, मटण इथली खासियत आहे. इथली मटण भाकरी थाळी स्पेशल आहे. त्यात सुक्क मटण, तांबडा, पांढरा रस्सा, भाकरी दिली जाते. याच बरोबर गावरान चिकन, अंडा करी अशा ३ प्रकारच्या थाळी इथं मिळतात.

तेजपत्ता, लवंग, खोबरे असे ७० पदार्थ वापरून मसाला तयार केला जातो. तो वापरूनच चिकन, मटण तयार केलं जात. 

चंद्रशेखर इंगोले हे शेतकरी ढाब्याचे मालक आहेत त्यांनी तो १९९८ सुरु केला होता.  

 पत्ता – फुलेवाडी

९) हॉटेल माणिक

हॉटेल माणिक मध्ये घरगुती पद्धतीने जेवण बनविले जाते. माणिक स्पेशल थाळी यात चिकन, सुक्क मटण, अंडा करी, सोबत तांबडा पांढरा रस्सा आणि त्यासोबत पुलाव देण्यात येतो. मटण फ्राय, मटण मसाला, चिकन थाळीत मसाला आणि फ्राय या थाळ्या मिळतात.

बननराव पाटील या हॉटेलचे मालक असून हे हॉटेल १९७२ मध्ये सुरु करण्यात आले होते. 

पत्ता – साकोली कॉर्नर,  शिवाजी पेठ कोल्हापूर. 

manik 1

१०) हॉटेल रामदुत

हॉटेल रामदूत मध्ये मटण फ्राय, मटण मसाला, अंडाकरी थाळी फेमस आहे. तिखट मसाल्यात तयार होणारे चिकन, मटण फेमस आहे. थाळी सोबत सुक्क मटण आणि तांबडा पांढरा रस्सा देण्यात येतो. मांसाहारी क्वालिटी हिच आमची स्पेशालिटी अशी टॅग लाईन हॉटेल राजदूतकडून वापरण्यात येते.

देवकर यांनी हे हॉटेल सुरु केले आहे. 

पत्ता – स.म लोहिया हायस्कुल जवळ, कोल्हापूर 

 

ramdut

कोल्हापूर मधील अजून काही  हॉटेल तुमच्या आवडीचे असलतील तर कमेंट करून नक्की सांगा.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.