कोल्हापूरकरांचं लाडकं गोकुळ दूध आता भारतीय नौसेनेला पुरवलं जाणार

आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या अशी एक म्हण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचलित आहे. गोकुळची स्थापना झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ.

फक्त राजकियदृष्ट्याच गोकुळ चर्चेत असतं का ? तर नाही…

शुद्ध प्रतीचे दूध आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन ही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची वैशष्ट्य. गोकुळ दूध संघाने या वैशिष्ट्यांच्या बळावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मानाचं स्थान मिळवलय.

यात अजून भर पडली आहे म्हणजे, गोकुळचे सिलेक्‍ट टेट्रापॅक यु.एच.टी दूध आता भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार झाला आहे. कोल्हापूरसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. त्यानुसार टेट्रापॅक दुधाच्या पहिल्या २२ हजार लिटर्सची पहिली बॅच भारतीय नौदल सेनेच्या कारवार कर्नाटक इथं पाठविली आहे.

उच्‍च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्‍ट टेट्रापॅक नव्‍याने उत्‍पादित केलेले तसेच सामान्‍य तापमानामध्‍ये १८० दिवस टिकणारे गोकुळ ब्रॅण्‍डचे सिलेक्ट टेट्रापॅक दूध हे नवीन उत्‍पादन प्रथमच भारतीय नौदल सेनेच्‍या कर्नाटक येथील कारवार या सेंटरला २ लाख ६७ हजार लिटर्स दूध पुरवठा आपल्‍या संघामार्फत होणार आहे.

आजच हे गोकुळच नंदनवन फुलण्यासाठी बऱ्याच नेत्यांनी मेहनत घेतली होती.

दूरदर्शी नेते आनंदराव पाटील यांच्या संकल्पनेतून गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यात १९६३ साली पाया रचला. १६ मार्च १९६३ रोजी ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. आनंदराव पाटील-चुयेकर आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होते.

याला कारण अर्थातच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईला गोकुळकडून होणारा दुधपुरवठा. गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी गोकुळचे मुंबईत येण्यासाठी अतुलनीय सहकार्य केले.

वर्गीस कुरियन यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरामोहरा बदलला. कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर योजना मंजूर झाल्याने, गोकुळचे आणि पर्यायाने कोल्हापूरचे रुपच बदलून गेले.

दररोज जवळपास ४ हजार ८०० च्या आसपास असलेल्या दुध संस्थेच्या माध्यमातून जवळपास १३ लाख लीटर दूध संकलित केले जाते. यामधील तब्बल ५ लाख लीटर दूध मुंबईसाठी जाते. आणि हेच सर्वांत मोठे राजकीय संघर्षाचे कारण आहे. कारण हा दुध पुरावठा करण्यासाठी ९० च्या आसपास टँकर आहेत. दोन हजारांवर कर्मचारी वृंद असलेल्या गोकुळची वार्षिक उलाढाल २१०० कोटींच्या घरात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातला सर्वात मोठा दूध संघ म्हणून गोकूळकडे पाहिले जाते. प्रत्येक १० दिवसाला दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिले देणे,पशुखाद्य देणे,दिवाळीला लाभांश देणे असा परतावा गोकुळकडून दिला जातो. मुंबईत सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातून गोकुळ दूध संघ दुधाची गरज पूर्ण करतो. या दूध संघावर वर्चस्व ठेवल्यास अनेक निवडणुकांत अगदी गावापासून ते मुंबईतपर्यंत राजकीय ताकद वाढते.

गोकुळची वार्षिक उलाढाल २१०० कोटी तर आज गोकुळकडे ७ लाख लीटर क्षमतेचा अत्याधुनिक शित केंद्र आहे. दूध संघ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहे. गोकुळ दूधसंघाचा स्वतःचा पशु खाद्य कारखाना आहे.

हे ही वाच भिडू

 

 

English Title:  Kolhapur District Co-operative Milk Producers Association i.e. Gokul’s milk will now be available to the Navy. An agreement has been reached to supply select Tetrapack milk to the Indian Navy. According to the agreement, milk will now be supplied to the Navy. Meanwhile, the first round of 22,000 liters of Tetrapack milk has been sent to Karwar today. The specialty of this Tetrapack milk is that it does not spoil for 180 days at a normal temperature. This has made it possible for Indian Navy personnel to have easy access to milk.

Web title: Kolhapur’s Famous milk brand Gokul will now Supply milk to the Indian navy

Leave A Reply

Your email address will not be published.