कोलकात्याच्या व्हिक्टोरिया वड्याची रेसिपी थेट इंग्लंडचे पंतप्रधान घेऊन गेले

आपला देश हा विविधतेने नटलेला आहे यात काही वादच नाहीत. फक्त आपणच नाही तर परदेशी लोकांनासुद्धा भारताबद्दल तीव्र आकर्षण आहे, कुतूहल आहे. म्हणजे सोशल मीडियावर फिरणारे परदेशी ब्लॉगर जर तुम्ही बघितले तर ती मंडळी प्रचंड उत्साहित असतात भारताबद्दल जाणून घेण्यासाठी. खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्या देशात जितकी श्रीमंती आहे ती इतर कुठेही नाही. तर आज जाणून घेऊया अशाच एका परदेशी माणसाबद्दल आणि त्याच्या कुतुहलाबद्दल.

२०१३ सालची हि गोष्ट. कोलकातामधल्या वर्धन मार्केट जवळ चौहान व्हिक्टोरिया वडा नावाच्या दुकानासमोर काही कार येऊन थांबल्या. सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांच्या संरक्षण असलेल्या कड्यातून एक सुटाबुटातला माणूस खाली उतरला. सुरक्षा रक्षकांचा पहारा एकदम कडक होता. एक उंच इंग्रज अधिकारी खाली उतरला आणि त्यांनी चौहान व्हिक्टोरिया वडा या दुकानाचे मालक अनुराग चौहान यांना निरोप दिला.

चौहान व्हिक्टोरिया वडाचे मालक अनुराग चौहान यांना निरोप मिळाला कि इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन त्यांच्या दुकानाला भेट देऊ इच्छित आहेत.

पहिल्यांदा अनुराग चौहान यांना चेष्टा वाटली कारण एवढ्या छोट्या दुकानात इंग्लंडचा पंतप्रधान का येईल. मग इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन स्वतः आले आणि त्यांनी मूग डाळ वडाची एक प्लेट मागितली. दोन वेगवेगळ्या चटण्यांची चव आणि सोबत मूग डाळ वडा यांचं कॉम्बिनेशन इंग्लंडच्या पंतप्रधानांना फारच आवडलं.

आपल्या खिशातून इंग्लंडच्या पंतप्रधानांनी ३० रुपये दुकानाच्या मालकांना दिले आणि सांगितलं कि हे वडे खूपच चवदार आहेत आणि मला याची चव बेहद्द आवडली. याची रेसिपी आणि चटणी कशी बनवली याची रेसिपी तुम्ही मला द्याल का? दुकानाच्या मालकांनी इंग्लंडच्या पंतप्रधानाला मूग डाळ वड्याची रेसिपी लिहून दिली.

हावडा ब्रिज आणि स्टेशनची पाहणी करण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन हे कोलकातामध्ये ममता बॅनर्जींचे भेट घेण्यासाठी आले होते. पुढे इंग्लंडच्या पंतप्रधानांनी अखिल भारतीय रेडिओ कोलकता केंद्रावर मुलाखत सुद्धा दिली होती.

पुढे अनुराग चौहान यांचा मोठा बोलबाला झाला कि व्हिक्टोरिया वड्याची चर्चा आणि रेसिपी थेट लंडनला पोहचली म्हणून. भारतातल्या मिळालेल्या प्रेमाबद्दल सुद्धा इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी आभार मानले होते. भारतात स्ट्रीट फूडची असलेली क्रेझ हि काय नवीन नाही. बदलत्या काळाप्रमाणे हि स्ट्रीट फूडची फॅशन आज घडीला जबरदस्त पद्धतीने व्हायरल होत आहे. 

फूड ब्लॉगिंग हे आज ज्या वेगाने वाढतं आहे त्या तुलनेत जेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोलकाताच्या एका दुकानांमध्ये आवर्जून जाऊन तिथल्या स्पेशल पदार्थाचा आस्वाद घेतात हि मोठी गोष्ट होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.