शिक्षण पुर्ण करण्यासाठी कोमल मागील एक वर्षांपासून कॅब चालवत आहे…

तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी असायला हवी.  आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळं चिडचिड करतो. एखाद्या पराभवानं खचून जातो. नशिबाला दोष देत बसतो. आमच्या हातात काहीच नाही म्हणत आयुष्यभर कुथत बसतो. आमच्याकडं काहीच नाही म्हणत आपल्या स्वप्नापासून भटकतो.

मात्र 19 वर्षांची कोमल असा विचार करणाऱ्या लोकांपैकी नाही. खचून जाणारी, स्वप्नांपासून दुर पळणारी नाही. आपल्या स्वप्नांमागे धावणारी आहे.

कोण आहे कोमल.

कोमल सध्या 12 वी मध्ये शिकत आहे. तीचं वय 18 वर्ष आहे. आपलं शिक्षण पुर्ण करण्यासाठी कोमल गेल्या 1 वर्षापासून चंडीगडमध्ये उबर कार चालवत आहे. त्या पैश्यातून ती आपलं शिक्षण पुर्ण करतेय.

कोमलची ही संघर्ष कहाणी एका फेसबुक युझरमुळे समोर आली. त्या युझरचं नाव आहे ऑलिव्हीया.

काही दिवसापुर्वी ऑलिव्हीया यांनी प्रवासासाठी कॅब बुक केली. ती कॅब कोमलची होती. कॅबमध्ये ओलिविया यांनी कोमलशी गप्पा मारल्या. उतरल्यानंतर त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलेली ही पोस्ट व्हायरल झाली आणि कोमलची संघर्षमय कहाणी जगासमोर आली.

ऑलिव्हीया यांनी पोस्टमध्ये लिहिल्या नुसार,

कोमल म्हणते, मला अजून काॅलेजमध्ये जायचं आहे, खुप शिकायचंय. माझ्या वडिलांचा शिकायला आणि कार चालवायला विरोध आहे. पण मी कोणाचच ऐकत नाही. मला आयुष्यात खुप काही करायचं आहे. सध्या पण करतेय आणि भविष्यात सुद्धा करायचंय. लोकं काय म्हणतात याकडे मी अजिबात लक्ष देत नाही.

या पोस्टच्या शेवटी ऑलिव्हीयाने लिहिलं आहे की,

मी कोमलची फॅन झालेय. तीला माझ्या परिनं पाहिजे तेवढी मदत करेन आणि शेवटपर्यंत तिच्यासोबत राहीन. तीची ही पोस्ट 7 हजार पेक्षा लोकांनी शेअर केली आहे. 20 हजार पेक्षा जास्त लोकांनी त्यावर रिअॅक्शन दिल्या. तर हजारो लोकांनी त्यावर कमेंट दिल्या आहेत.

आपण शिकावं, आयुष्यात काहीतरी करावं, यासाठी संघर्ष करणाऱ्या कोमलची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. नवनाथ मासाळ says

    प्रिय, बोलभीडू मला तुमची हि पोस्ट खूप आवडली व कोमल मुली विषयी अजून माहिती हवी आहे जर का तुमची इच्छा असेल तर त्या फेसबुक यूजर ओलिव्हियाजीं चा फेसबुक अकाउंट मिळेल का? बोलभीडू!
    प्रतिक्रया अवश्य द्यावी
    आपलाच बोलभीडू कार्यकर्ता????

Leave A Reply

Your email address will not be published.