पॅरालिम्पिकमध्ये भारताला पाचवे गोल्ड मेडल देत कृष्णा नागरने चमत्कार घडवला आहे.

सद्या चालू असलेलेया टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुन्हा एकदा आपल्या भारताला यश चाखण्याची संधी मिळाली आहे. मिळाली नाही तर मिळवली आहे, तीही आपल्या कृष्णा नगरने !

टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी दमदारपणे सुरू ठेवली आहे हे आपण पॅरालिम्पिक सुरु झाल्यापासून पाहताच आहोत.

बॅडमिंटनपटू कृष्णा नगरने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत १९ वे पदक जिंकले आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेले हे पाचवे सुवर्णपदक असून एकूण पदकांची संख्या पहायची झाली तर तशी टोटल १९ पदके आपण जिंकली आहेत. भारताने पाच सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदके जिंकली आहेत.

कृष्णा नगरने रविवारी टोकियो पॅरालिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या एसएच 6 वर्गात तीन गेमच्या रोमांचक फायनलमध्ये हाँगकाँगच्या चू मान काईचा पराभव करून भारताला जिंकवलं आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी देखील कृष्णाचे अभिनंदन करत, राजस्थानचा पॅरा बॅडमिंटन पटू कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकून, भारताला एक शानदार विजय मिळवून दिला आहे.

अंतिम सामन्याच्या पहिल्या फेरीत कृष्णाने काई मान चूचा २१-१७ असा पराभव केला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये हाँगकाँगच्या खेळाडूने पुनरागमन करत सामना २१-१६ असा जिंकला, पण तिसऱ्या फेरीत भारतीय पॅरा शटलर कृष्णा नगरने जबरदस्त पुनरागमन करत २१-१७ ने विजय मिळवला आणि सामना १-१  ने जिंकला सुवर्ण पदक मिळाले.

टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक गेम्सचा शेवटचा टप्पा चालू आहे आणि  भारतीय खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस चमकतच आहे.

यावर्षीच्या पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात ही स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिक ठरली आहे, कारण भारताने या खेळांमध्ये आतापर्यंत केवळ १२ पदके जिंकली होती, परंतु आता भारताने एकाच पॅरालिम्पिकमध्ये दीड डझनहून अधिक पदके जिंकली आहेत. हि निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे.

भारताला ५ वे सुवर्ण मिळवून देणारे हे कृष्णा नगर कोण आहेत ?

कृष्णा नगर हा मुळचा राजस्थानच्या जयपूरचा असून तो अवघ्या २२ वर्षांचा आहे.

दोन वर्षांच्या कोवळ्या वयात, त्याच्या कुटुंबाला हे समजले की कृष्णा इतर मुलांप्रमाणे वाढत नाही…त्याची वाढ खुंटली आहे.

जेव्हा त्याने शाळेत प्रवेश घेतला तेव्हा तो त्याच्या वर्गमित्रांनी खेळलेल्या बहुतेक खेळांचा भाग होऊ शकला नाही कारण त्याची शारीरिक स्थिती. पण पुढे जाऊन त्याला आपले क्षेत्र दिसले आणि त्यात त्याने मेहेनत करायला सुरुवात केली. त्याचं झालं असं कि,

कृष्णाची काहीच वर्षांपूर्वी बॅडमिंटनशी ओळख झाली. त्याच्या चुलत भावाने कृष्णाला सुमारे सहा वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. बॅडमिंटन हे कृष्णासाठी एक करमणूक होते. पण हळहळू त्याने २०१७ मध्ये या खेळाला  गांभीर्याने घेत गेला आणि २०१८ मध्ये भारतीय पॅरा संघाचा भाग म्हणून आपला प्रवास चालू केला.

कृष्णा दररोज सुमारे १० तास ट्रेनिंग घेतो.

टोकियोमध्ये पॅरालिम्पिक गेम्समध्ये बॅडमिंटनचा समावेश केल्याने, कृष्णाने त्याच्या पहिल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये पोडियम फिनिशिंगकडे फोकस करत  आणखी मेहनत करायला सुरुवात केली होती आणि अजूनही करतोच आहे.

पॅरा-बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएस 6 मध्ये त्याला जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले होते. आणि त्याने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी कृष्णा नगर जागतिक स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. कांस्य – आशियाई पॅरा खेळ, जकार्ता २०१८, कांस्य – जागतिक पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप, बेसल २०१९ मध्ये,  रौप्य – BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप बासेल २०१९ मध्ये (दुहेरी), सुवर्ण – थायलंड पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय २०१९, सुवर्ण – दुबई पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय २०२१,

तो सध्या त्याच्या श्रेणीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. जर आपण सध्याची कामगिरी पाहिली तर ते लवकरच पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवू शकतो हे मात्र नक्कीच.

बॅडमिंटनलाच आपले आयुष्य मानणारा कृष्णा दिवसभर कोर्टवरच असतो. त्यामुळे त्याला कुटुंब आणि मित्रांसोबत घालवण्यासाठी वेळच नसतो असं तो वारंवार सांगत असतो…आणि सोबत हमखास म्हणतो कि, ” ठीक आहे. बॅडमिंटन हेच माझे आयुष्य आहे आणि आता फक्त पॅरालिम्पिक महत्त्वाची आहे”

आणि त्याने केलेल्या त्यागाची आणि मेहेनतीचं फळ म्हणजे आजचा त्याचा आणि भारताचा विजय आहे !

हे हि वाच भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.