शेतीत कृषी पर्यटन करता येत हे देशाला महाराष्ट्राने सांगितलं

नुसती शेती करणे परवडत नसल्याने हल्ली त्याला इतर व्यवसायाची जोड देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.  कुकुट, शेती पालन, मधमाशी पालन, दुग्ध व्यवसाय सारख्या गोष्टी शेतकरी करत आहेत. याच बरोबर शेतकरी अजून एक व्यवसायाकडे वळल्याचे पाहायला मिळते. ते म्हणजे शेती कृषी पर्यटन केंद्र.  सुरु झाले आहेत. 

शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय यामुळे उभा राहिला आहे. मागच्या काही वर्षात हा व्यवसाय चांगला नावारूपाला आला. पर्यटना बरोबर इथे लग्न सारख्या गोष्टी होत आहे. शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थैर्य या जोड धंद्यातून मिळत आहे. कृषी पर्यटन ही संकल्पना ही तशी नवी आहे. आपल्या आजोबा-वडलांना विचारून बघा ते म्हणतील की, मागच्या १०- १५ वर्षात पासूनच हे ऐकायला मिळतंय त्यापूर्वी हे नव्हतं. 

आज अनेकांच्या तोंडात कृषी पर्यटन शब्द बरासचा रुळाला आहे. मात्र, कधी पासून शेती पर्यटनाला सुरुवात झाली, कोणी केली हे पाहूया.     

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ गावात कृषी पर्यटनाला सुरुवात झाली. नेरळ गावात भडसावळे यांची ५५ एकर शेत आहे. इथूनच देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र सुरु झाल्याचे सांगितलं जात. 

स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ भडसावळे हे नेरळचे. त्याची इच्छा होती की, आपल्या मुलानं परदेशात जाऊन उच्चं शिक्षण घ्यावं. आर्थिक परिस्थिती नसतांना सुद्धा त्यांनी शेखर भडसावळे यांना अमेरिकेला  पाठविले. 

शेखर यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर इन फूड सायन्स टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केलं. तिथे त्यांना एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा लागली होती. मात्र, त्यांच्या वडिलांनी पत्र लिहून भारतात परत येण्यासाठी सांगितले.  

नोकरीसाठी नाही तर तिकडचे राहणीमान, पाहण्यासाठी अनुभव घेण्यासाठी परदेशात शिक्षणासाठी पाठविले असल्याचे सांगत,भारतात येऊन इथल्या लोकांसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या.    

शेखर भडसावळे हे १९७६ मध्ये भारतात आले. 

जमाना बदलाय, तंत्रज्ञान आलंय, संकरित बी बियाणे आलंय तरीही शेती करणे अजूनही जिकरीचे बनले आहे. शेती करणे आताही चॅलेंजींग आहे. यापूर्वीतर ते जास्त होत. त्यामुळे अमेरिकेतून परत आल्यावर भेडसावळे यांना काय करावं हे कळत नव्हते. एक दीड वर्ष विचारतंच गेला.

शेवटी त्यांनी मुंबई गाठली आणि हापकीन इन्स्टिट्यूटला काही करता येईल का म्हणून भेट द्यायला गेले. तेथे त्यांना एक सायंटिस्ट भेटले आणि तुम्ही एका गावात राहता. तिथे मोठे जंगल आहे. त्या जंगलातील साप पकडून त्यांचे विष गोळा करा आणि ते आम्हाला पाठवा. त्याचे चांगले पैसे तुम्हाला मिळतील. हापकीन मध्ये सापाच्या विषापासून औषध बनविले जायचं. 

शेखर भडसावळे यांना ही संकल्पना आवडली. १९८२ मध्ये त्यांनी सापाचे विष काढून ते विकायला सुरुवात केली. हे सगळं दोन तीन वर्ष सुरु होत. ही नवीन संकल्पना असल्याने आजूबाजूची तसेच फिरायला येणारे लोकं कुतूहलाने सापाचे विष कसे काढण्यात येते म्हणून पाहायला येत होती. 

लोकं त्यापूर्वी कधीही शेत बघायचं म्हणून येत नव्हती. 

शेती मातीशी संबंध नसलेले लोकं सापाला पाहण्याच्या निमित्ताने शेतात येऊ लागले तसे त्यांना शेती बद्दल त्यांच्या मनात उत्सुकता वाढीला लागली. शेतातल्या मातीच्या घरात राहता येईल का ? ताज्या  भाज्या मिळतील का ? शेतीतील तलावात पोहता येईल का ? असे प्रश्न शेखर यांना विचारले जाऊ लागले.

त्यामुळे शेखर भडसावळे यांच्या लक्षात आलं की, शहरी भागातील लोकांचा कल हा ग्रामीण जीवनाकडे जास्त आहे. त्यांना ग्रामीण पद्धतीने राहायला आवडते. मात्र, हे सगळं सुरु असतांना फॉरेस्ट विभागाची शेखर भेडसावळे यांना नोटीस आली. सापाचं विष अशा प्रकारे काढणे बेकायदेशीर असल्याची ही नोटीस आली होती. त्यामुळे भेडसावळे यांनी सगळे साप सोडून दिले आणि ते काम थांबवलं. 

मात्र, त्या दोन वर्षात शहरी भागातील हजारो लोकं त्यांच्याशी जोडले गेले होते. ती लोक सुट्यांमध्ये येऊ लागली होती. ना तिथे हॉटेल, कुठले रिसॉर्ट ना खानावळ मात्र लोक नियमित पणे येऊ लागली होती.  भेडसावळे यांच्या शेतीला भेट द्यायची, भाज्या घेऊन जायची, थांबायचे त्यामुळे इतर लोक यायला सुरुवात झाली. 

भेडसावळे यांचा शेती हाच व्यवसाय होता. त्याला इतर जोड कुठल्याच व्यवसाय नव्हता. वेगळं मिळतंय म्हणून त्यांच्या शेतात लोकं परत परत येऊ लागली होती. पैसे देऊ लागली. आणि शेतातल्या घरात राहण्याची इच्छा बोलून दाखवू लागली.

१९८५ पासूनचे भेडसावळे त्याला कृषी पर्यटन म्हणू लागले होते  

१९९० ला मात्र शेखर यांना कळून चुकले ही कृषी पर्यटन ही वेगळी ऍक्टिव्हिटी आहे. यातून पैसे चांगले मिळतात. यामुळे ही गोष्ट इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यामुळे शेखर यांनी शेतकरी आणि सरकारला कृषी पर्यटना हा जोड धंदा होऊ शकतो हे सांगितले. 

नंतर राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी सगुणा बागेत येऊन प्रोत्साहन घेतलं. आपल्या भागात जाऊन कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे. 

कृषी पर्यटनाची सुरुवात अमेरिकेतून नोकरी सोडून भारतात शेती करण्यासाठी आलेल्या शेखर भडसावळे यांनी केल्याचे सांगण्यात येत.

त्यांना महाराष्ट्र्र शासनाचा कृषिरत्न आणि कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा सगुणा बागेस भेट दिली होती. कृषी पर्यटन केंद्र असणाऱ्या शेतकऱ्यानं केंद्र, राज्य सरकाराच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.