दुसऱ्या महायुद्धामुळे तयार झालेली केटीएम भारतात निब्बा लोकांनी फेमस केली..
बाकी काही असो महाराष्ट्रातल्या पोरांना गाडीत भारीच इंटरेस्ट असतो. म्हणजे गाडी पण अशी पळवतात कि एखाद्याचा गाडीच्या आवाजाने घाबरून जीव जाईल. हळूहळू जस जग बदलत गेलं तस तरुणाईची गाड्यांमधली चॉईस बदलत गेली. राजदूत, एम ८० चा काळ जाऊन बुलेट, पल्सर अशा गाड्यांची हवा होऊ लागली.
मात्र मागच्या काही वर्षात एक बाईक आली आणि तिने भारतात मात्र आपली जादू अशी पसरवली कि १० पैकी ३-४ जणांकडे तरी हि गाडी दिसते.
ती बाईक होती केटीएम [ KTM ]
भारतात अत्यंत कमी काळात लोकप्रिय झालेल्या या बाईकची यशोगाथा आज आपण जाणून घेऊया, म्हणजे नक्की काय स्पेशालिटी आहे KTM मध्ये.
जबरदस्त स्पीड आणि आकर्षक लूकमुळे केटीएम भारतात चांगलीच लोकप्रिय झाली. हि अशी बाईक होती जी तरुणवर्गाला आकर्षक आणि मॉडर्न वाटायची. आता हि KTM बाईक एवढी महागही नाही कि गरिबांना परवडणार नाही अगदी खेडोपाडीसुद्धा हि बाईक पोहचली आहे आणि धुरळा करत आहे.
केटीएमची सुरवात झाली ती ऑस्ट्रियापासून. १९९२ मध्ये KTM इंडस्ट्री एजी या कंपनीची सुरवात झाली पण खरी KTM बाईक १९३४ पासूनच तयार व्हायला सुरवात झाली होती. ऑस्ट्रियाच्या जोहान ट्रनकेनपोईज या इंजिनिअरने एका कार रिपेअरिंग दुकानाची सुरवात केली. पुढच्या दोन वर्षात त्याने DKW च्या मोटारसायकल आणि OPEL कंपनीच्या कार विकायला सुरवात केली.
त्यावेळी त्याच्या दुकानाचं नाव होत क्राफ्टफारझयुग ट्रंकेनपोल्झ मॅटीघोफेन ज्याला आपण शॉर्टमध्ये KTM म्हणतो. पुढे वर्ल्ड वॉरची सुरवात झाली आणि ट्रंकेनपोल्झने सैन्यात भाग घेतला. त्यामुळे त्याच्या बायकोने दुकानाची सगळी जबाबदारी सांभाळली. पण ज्यावेळी विश्व युद्ध संपलं तेव्हा रिपेअरिंगच्या कामांमध्ये मंदी आली. त्यामुळे ट्रंकेनपोल्झने स्वतःच्या कंपनीच्या गाड्या बनवण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी ट्रंकेनपोल्झने R१०० हि बाईक बनवली, या बाईकचे बरेचसे पार्ट हे त्याने स्वतःच्या कंपनीत तयार केले होते. १९५३ मध्ये बाईकच प्रॉडक्शन सुरु करण्यात आलं. कंपनीत तेव्हा फक्त २० कर्मचारी होते. दिवसभरात हि २० जणांची टीम ३ बाईक तयार करत असे. हि कंपनी अजून रजिस्टर केलेली नव्हती.
अर्न्स्ट क्रोनरिफ या उद्योजकाने ट्रंकेनपोल्झच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली. तेव्हा कंपनीला क्राफ्टफारझयुग ट्रंकेनपोल्झ मॅटीघोफेन नावाने रजिस्टर करण्यात आलं.
१९५४ मध्ये KTM कंपनीच्या बाईकने ऑस्ट्रियन १२५CC नॅशनल चॅम्पियनशिप रेस जिंकली आणि भरपूर नाव कमावलं.
हळूहळू कंपनीने सायकल सुद्धा तयार करायला आणि विकायला सुरवात केली. पण एक मोठी घटना घडली आणि KTM तोट्यात गेली. अर्न्स्ट क्रोनरिफ या कंपनीत इन्व्हेस्ट केलेल्या उदयॊजकाचं निधन झालं आणि दोन वर्षानंतर लगेचच कंपनीच्या मालकाचं ट्रंकेनपोल्झचं निधन झालं. या मुले कंपनीला मोठं नुकसान झालं.
अशा वेळी ट्रंकेनपोल्झचा मुलगा एरीक ट्रंकेनपोल्झने कंपनीची जबाबदारी उचलली. एरिकच्या काळात कंपनीने पुन्हा नाव कमवायला सुरवात केली याच कारण होतं एरिकच हुशार आणि उत्साही लोकांची एक कमिटी बनवली आणि त्यानुसार कंपनी चालवायला सुरवात केली. KTM कंपनी स्थापन होऊन ४० वर्ष झाले होते याकाळात कंपनीने ४२ वेगवेगळ्या बाईक्स बनवल्या होत्या.
पुढे एरीक ट्रंकेनपोल्झचं निधन झालं आणि कंपनीच्या बऱ्याच बाइक्सचं प्रोडक्शन बंद करण्यात आलं. १९९२ मध्ये कंपनी कर्जत गेली आणि त्यामुळे कंपनीचे चार भागात विभाजन करण्यात आले. पैकी मोटारसायकल बनवणाऱ्या विभागाने आपलं काम सुरु ठेवलं.
१९९४ मध्ये DUKE चं प्रोडक्शन सुरु झालं. हळहळू ऍडव्हेंचर बाईक्स, सुपरमोटो या बाईक्स लोकप्रिय होऊ लागल्या.
२००७ मध्ये बजाजने या KTM च्या बाइकमध्ये लक्ष घातलं. २०१३ पर्यंत बजाज निम्मी पार्टनर झाले होते. KTM ने भारतात आल्यावर मात्र धिंगाणा केला.
पहिल्यांदाच एखाद्या बाईकला इतकी लोकप्रियता मिळाली असेल.
महाराष्ट्राच्या चाकणमध्ये KTM DUKE चं प्रोडक्शन केलं जातं. आज हजारो कोटींमध्ये KTM ची उलाढाल आहे. KTM जितकी भारताने फेमस केलीं तितकी ती कोणीही केली नाही.
हे हि वाच भिडू :
- स्पोर्टबाईक म्हणजे पल्सर इतकं परफेक्ट सेगमेंट राजीव बजाज यांनी तयार केलं …
- अमेरिकेच्या सायकल रेस चॅम्पियनने तिथली पहिली बाईक बनवली, नाव दिलं “इंडियन “
- इलेक्ट्रिक बाईकला लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज का पडत नाही?
- पटणार नाय पण आजही भारतातनं सगळ्यात जास्त एक्स्पोर्ट होणारी बाईक बजाज बॉक्सर आहे