आता कुलभूषण जाधव सुद्धा पाकिस्तान कोर्टाला चॅलेंज करणार

३ मार्च २०१६ हा दिवस क्वचित कोणी भारतीय विसरू शकेल. कारण याचं दिवशी भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्याने बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानच्या दाव्यानुसार त्यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपात  अटक करण्यात आलीये. 

पण भारताकडून हा दावा सतत फेटाळण्यात येतोय. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या म्हणण्यानुसार, कुलभूषण जाधव निवृत्ती घेउन आपल्या व्यवसायाच्या  निमिताने इराणला गेले होते. तिथेचं पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे अपहरण करण्यात आलं.

यांनतर २०१७ पासून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. पाकच्या लष्करी न्यायालयानं त्यांना हेरगिरीच्या आणि दहशतवादाच्या आरोपाखाली मृत्यूदंड सुनावला. ज्यांनंतर भारतानं आंतराष्ट्रीय न्यायालयाची दार ठोठावली. 

भारताने आरोप केला कि,  पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सलर दिला नाही. तसेच जाधव यांच्याविरोधातल्या खटल्याला सुद्धा आव्हान दिलं. याप्रकरणी जेष्ठ वकील हरिश साळवे यांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस (ICJ) मध्ये कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली. याप्रकरणी सुनावणी अजूनही सुरुचं आहे. 

पाक हर प्रकारे कुलभूषण यांना अडकवण्याचा प्रयत्न करतंय. असाच प्रयत्न पाकिस्तानने पुन्हा एकदा केला. मात्र न्यायालयानं कुलभूषण यांच्या बाजूने कौल दिला. पाकिस्तानच्या संसदेत कुलभूषण यांना पाकिस्तानातील न्यायालयात अपील करण्याचा अधिकार देणारं विधेयक पास करण्यात आलं. यामुळे कुलभूषण आता उच्च न्यायालयात त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात अपील करू शकणार आहेत. 

याआधी,आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचा उशीर न  करता भारताला कॉन्सुलर अॅक्सेस देण्यास सांगितले होते.

हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात म्हटले की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा निकाल आणि शिक्षेचे प्रभावीपणे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करावा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला विलंब न करता भारताला कॉन्सुलर ऍक्सेस देण्यास सांगितले होते. 

सोबतच लष्करी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना योग्य मंच उपलब्ध करून द्यावा, असे आयसीजेने आपल्या निर्णयात म्हटले आहे. ज्याच्यावर नुकताच सुनावणी झाली आणि कुलभूषण यांना दिलासा मिळाला. 

आता कुलभूषण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते मूळचे महाराष्ट्रातील सातारचे. १९८७ मध्ये राष्ट्रीय रक्षा अकादमीत प्रवेश घेतला आणि १९९१ पासून भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी जवळपास १४ वर्षे सेवा  केली आणि त्यानंतर अकाली सेवानिवृत्ती घेतली.

आपल्या सेवानिवृत्ती नंतर त्यांनी इराण मध्ये व्यवसाय सुरू केला होता.आणि याच आपल्या व्यवसायाच्या निमित्त्ताने ते पाकिस्तानला गेले होते, मात्र त्यांना पाकने अटक केली. पाकिस्तानचा म्हणणं आहे की, बलुचिस्तान येथे कुलभूषण जाधव हे भारताची गुप्तहेर एजेंसी रॉ चे कर्मचारी आहेत. म्हणून त्यांच्यावर हेरगिरी आणि दहशतवादाचे कलम लावून अटक करण्यात आली. 

अटक केल्याच्या एक महिन्याच्या आत कुलभूषण जाधव यांची बाजू न ऐकून घेता पाकिस्तानच्या मिल्ट्री कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पण न्यायालयाचा आदेशानुसार पुढची सुनावणी होत नाही तो पर्यन्त कुलभूषण जाधव यांच्या फाशी वर स्थगिती देण्यात आलीये.

भारताची मागणी आहे कि, खोट्या आरोपावर आणि चुकीच्या पद्धतीने कुलभूषण जाधव यांना पकडण्यात आले आहे आणि म्हणून त्यांना लवकरात लवकर सोडण्यात आले पाहिजे.

दुसरीकडे भारत आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तावर दबाव आणतोय. याची भडास म्ह्णून पाकने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आईला त्यांना भेटण्याची परवानगी दिली,पण त्यांच्या कडून खूप सक्ती दाखवली. कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला हातातील बांगड्या, टिकली आणि इतर आभूषणे काढायला लावले होते. शिवाय त्यांना फक्त हिंदीची बोलण्याचीचं सक्ती केली, आणि त्यांच्या संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले. 

पाकिस्तान एवढे प्रयत्न करत तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल मात्र कुलभूषण यांच्या बाजूनेच लागतो. आता या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. 

हे ही वाचा भिडू . 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.