पंजाबमधल्या एका माणसामुळं कुंभमेळ्यातल्या १ लाख फेक टेस्टिंगचा घोटाळा समोर आला

उत्तराखंड कुंभमेळा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. ज्या प्रायव्हेट लॅबला कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर रँडम टेस्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती, त्यावर फेक टेस्टिंगचा आरोप करण्यात आलाय. यानंतर बऱ्याच प्रायव्हेट लॅबसुद्धा खोट्या टेस्टिंगच्या आरोपात सापडल्यात. ज्यामुळे  उत्तराखंड सरकारने  कुंभमेळ्या दरम्यान घेतलेल्या फेक टेस्टिंगच्या आरोपावर चौकशी सुरू केलीये.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कुंभमेळ्याचा आयोजन करण्यात आलं होत

खरं तर, २ महिन्यांपूर्वी म्हणजेच १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात  आलं होत. ज्यावेळी संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत होता. याच्या आयोजनावरून रावत सरकारवर टीकाही झाल्या. मात्र, मेळ्या दरम्यान हरप्रकारे  काळजी घेतली जाईल, असं हायलाईट करून सरकारनं या आयोजनाला परवानगी दिली होती. ज्यात देशभरातील लाखो भाविक हरिद्वार, टिहरी आणि पौडी जिल्ह्यात पोहचले होते.

यांनतर प्रकरणांच्या वाढत्या संख्येदरम्यान उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कुंभमेळ्या दरम्यान दररोज ५० हजार टेस्टिंगचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत राज्य सरकारने एकूण आठ एजन्सींना टेस्टिंगचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी या एजन्सी आणि २२ प्रायव्हेट लॅबने मिळून चार लाख कोरोना चाचण्या घेतल्या होत्या, ज्यात अँटिजन टेस्टवर जास्त  भर देण्यात आला होता. या सरकारी प्रयोगशाळा देखील होत्या. यातल्या १ लाख चाचण्यांतले फक्त  १७७ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  ज्यानंतर  चाचण्यांमुळे आता नवा वाद निर्माण झालाय.

पंजाबातल्या माणसान केला फेक टेस्टिंगचा भंडाफोड 

या फेक टेस्टिंगचा खुलासा  तेव्हा झाला, जेव्हा पंजाबात राहणाऱ्या एका व्यक्तीनं इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ला मेलद्वारे तक्रार दिली. त्याच्या म्हणण्यानुसार तो कुंभ मेळ्यादरम्यान आपल्या घरीच होता, पण तरी त्याच्या मोबाईलवर मॅसेज आला कि, कोरोना टेस्टिंगसाठी त्याचं  सॅंपल घेतलं गेलय. त्यामुळे  त्याच्या आधार आणि मोबाईल नंबरचा फेक टेस्टसाठी चुकीचा वापर केला जातोय.

हा धक्कादायक प्रकार  समोर येताच आईसीएमआरनं या प्रकरणाची दखल घेत  उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही  माहिती कळवली.

त्यानंतर अधिकाऱ्यानं  कुंभमेळ्यामध्ये टेस्टिंगची जबाबदारी घेणाऱ्या प्रायव्हेट लॅबच्या रिपोर्ट्सची तपासणी केली. जेव्हा सुरुवातीलाच केलेल्या तपासात  लॅबकडून लोकांना फेक रिपोर्ट्स देण्याची माहिती समोर आली, तेव्हा अधिकाऱ्यानं त्याच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले.

यानंतर  चौकशीत समोर आलेला प्रकार हैराण करणारा होता. चार लाखांपैकी १ लाख कोरोना टेस्टिंगचा  रिपोर्ट हा फेक होता, जो प्रायव्हेट एजन्सीच्या मदतीनं तयार केला होता. एकाच फोनवरून एक- दोन नाही तर ५० जणांचं रजिस्ट्रेशन केलं गेलं होत, तर एकच अँटिजन टेस्ट किट ७०० जणांच्या टेस्टिंगसाठी वापरली गेली होती. 

एवढंच नाही घराचे पत्ते नाव तर मनाने ठोकली होती. कोणाचा पत्ता घर क्रमांक ५६, अलिगड, तर कोणाचा घर क्रमांक ७६, मुंबई असा होता. तर  हरिद्वारमधल्या ‘घर क्रमांक ५’ या एका एकाच घरातून तब्बल ५३० सॅंपल गोळा केल्याचं समजतंय. यावेळी खोट्या मोबाईल नंबरचा सुद्धा वापर केला गेलाय, ज्यात मुंबई, अहमदाबाद,  कानपूर अश्या १५ पेक्षा जास्त ठिकाणच्या लोकांनी एकच मोबाईल नंबर दिलाय.

सॅंपल  गोळा करणारे विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर

एका अधिकाऱ्यानं  सांगितलं कि, ज्या एजन्सीला टेस्टिंगचे सॅंपल  गोळा करण्याची जबाबदारी दिली गेली होती. त्यातले २०० जण तर राजस्थानमधले  विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर होते. ज्यांनी कधी हरिद्वारचं तोंडपण बघितलं नव्हतं.

दरम्यान, वादग्रस्त प्रकारच्या चौकशीसाठी सध्या हरिद्वार जिल्हा दंडाधिकारी सी रविशंकर यांनी मुख्य विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत केली आहे. ते म्हणाले की,

‘सध्या ज्या प्रायव्हेट लॅबचा तपस केला जातोय, त्याच्या सविस्तर अहवालानंतर कुंभमेळ्यात टेस्टिंग करणाऱ्या बाकीच्या लॅबचीही चौकशी  केली जाणारे. त्यामुळे नोटीस येईपर्यंत सगळ्या एजन्सींचे पैसे थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत.  समितीला १५ दिवसांत अहवाल सादर करावा लागणार आहे. आणि फेक रिपोर्ट  खरे असल्यास  जबाबदार असणाऱ्यांवर  एफआयआर नोंदवून  कारवाई केली जाईल.

एकूणच या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या लाखो साधूंच्या जीवाशी खेळ झाला असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.