इंग्लंडच्या लेबर पार्टीनं मोदींच्या फोटोविरोधात मत मागून आपला उमेदवार निवडून आणलाय…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले टॉप सेलिब्रेटी आहेत. जगात कधी कुठं त्यांच्या नावाचं गुणगान होईल तर कधी त्यांच्यावर मुक्ताफळं उधळली जातील सांगता यायचं नाही. आता ब्रिटन मध्ये तर चक्क मोदींच्या विरोधात मत मागितल्याचा प्रकार घडलाय.

याच फोटोवर आता मोठा वाद उफाळून आलाय. आणि उदारमतवादी पक्षावर जगभरातून टीका होऊ लागलीय. 

तर झाल असं की, जूनच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडच्या उत्तर भागात पोटनिवडणुका लागल्या होत्या. उत्तर इंग्लंमधल्या बॅटले आणि स्पेनच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी वादग्रस्त साहित्य वापरण्यात आलं होतं. यातल्या लेबर पार्टीने प्रचाराच्या साहित्यात काही पत्रक छापली होती.

या पत्रकांमध्ये मोदींचा आणि बोरिस जॉन्सन यांचा हस्तांदोलन करतानाचा एक फोटो होता. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. जॉन्सन हे २०१९ च्या जी-७ संम्मेलनामध्ये मोदींना भेटले होते.

यावर खाली लेबर पार्टीने एक मॅसेज दिला होता. त्याचा अर्थ होता भारताच्या पंतप्रधान मोदी यांच्यापासून आपल्या देशाला लांब राहावं लागेल. म्हणजे त्यांनी लिहिलं होत कि, जर त्या भागातल्या लोकांनी कोंजर्वेटिव्ह पार्टीला म्हणजे बोरिस जॉन्सन यांच्या पार्टीला मतं दिली तर त्यांना असेच फोटो बघावे लागतील. पण आम्हाला मत दिलं तर असे फोटो बघायची वेळ तुमच्यावर येणार नाही.

“टॉरी (या) खासदारांची (कन्झर्व्हेटीव्ह पक्षाच्या खासदारांसाठी वापरला जाणार शब्द) चिंता करु नका ते तुमच्या पक्षात नाहीयत,” (Don’t risk a Tory MP who is not on your side) असं म्हटलं आहे.

थोडक्यात त्यांनी मोदींना विरोध करून मत मिळवायचा प्रकार केला होता. हे वाक्य वंशभेद करणारं आणि सामाजामध्ये भेदभाव करणारं असल्याची टीका झाली. पण विशेष म्हणजे या ठिकाणी विरोधी पक्षाने विजय मिळवला.

आता हा वाद जगासमोर कसा आला

तर ब्रिटनच्या संसदेमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी विरोधी पक्षाचे नेते केर स्टारामर यांना प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पत्रकाचा जाब विचारला. तसंच जॉन्सन यांनी लेबर पार्टीच्या नेत्यांकडे ही पत्रकं मागे घेण्याची मागणी केली. 

या निवडणुक प्रचाराच्या पत्रकावरुन ब्रिटनमध्ये वाद शिगेला पोहचला. लेबर पार्टीच्या अनेक नेत्यांबरोबर भारतीयांनीही याचा विरोध केला आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे उद्योजक तसेच पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख सदस्य असणाऱ्या मनोज लाडवा यांनीही या पत्रकावर नाराजी व्यक्त केलीय.  ते म्हणतात,

“हे फार हैराण करणारं आहे की लेबर नेते कीर स्टारमर यांनी लेबर पार्टीकडून प्रचारासाठी छापण्यात आलेल्या आणि वंशवादाला पाठिंबा देणाऱ्या तसेच भारताविरोधात असणाऱ्या पत्रकाचा निषेध केला नाही. हा मुद्दा पंतप्रधान जॉन्सन यांनीच उपस्थित केलाय,”

या पत्रकावर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही टीका केलीय. भारतीयांनी हे पत्रक विभाजन करणारं आणि भारताविरोधी असल्याचं म्हटलयं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.