व्हाय शुड बॉईज हॅव्ह ऑल द फन ? बायकांच्या लघुशंकेसाठी पण नवी सोय आलीय.

कोणी कोणी मराठी पिक्चर नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे बघितलाय. ज्यांनी ज्यांनी तो पिक्चर बघितलाय त्यातला मुख्यमंत्र्याच्या बायकोचा तो डायलॉग अख्खा पिक्चर संपेपर्यंत लक्षात राहील असाच आहे. आपल्या नवऱ्यासोबत दौऱ्यावर निघालेली ती मिसेस मुख्यमंत्री म्हणते,

पुरुषांचं आपलं कूट बी उभारलं की सुरु हुतंय. बायकांसाठी पण रस्त्यारस्त्यानं मुताऱ्या काढा.

कसलं भन्नाट होत हे माहिताय का तुम्हाला ? पण शेवटी पिक्चरच म्हणायचा तो. तो पिक्चर बघून आपली पुरुष मंडळी आदर्श घेतील तो कसला. त्यामुळं आजवर ना बायकांसाठी रस्तोरस्ती मुताऱ्या निघाल्या, ना कुणी बायांची दखल आजवर घेतली.

पण व्हाय शुड बॉईज हॅव्ह ऑल द फन…बराबर ना ?

आता बायकांच्या लघुशंकेसाठी पण नवी सोय आलीय. हैत तिच्या मायला… बाया बी आता उभारून सुरु हुणार. कानाला ऐकायला कसकसचं वाटलं ते, पण खरंच हाय ते. 

२०१९ मध्ये सुरु झालेलं हे बायकांच्या उभ्यानं लघुशंकेच प्रस्थ आज भारतातल्या उच्चभ्रू वर्गात पोचलंय. पण सुरुवात परदेशातच झाली होती. कारण असलं काहीतरी भन्नाट परदेशी लोकंच करतात. तसा तो अलिखित नियम आहेच म्हणायचा.

हं तर कुठं होतो आपण ? उभ्यानं लघुशंका करायच्या इतिहासावर.

तर ऑस्ट्रिया मधल्या स्त्रियांना घाणेरडे टॉयलेट्स वापरायला लागत होते. आता तिथं इंडियन टॉयलेट तर असणार नाही. आपलं सगळं कस अधांतरी वरवर असतंय. तस त्यांचं नाही. त्यांच्याकडं कमोड सिस्टीम असल्यानं त्यांना सगळे कार्यक्रम आपले बसूनच उरकावे लागतात. तर ते जे कमोडच फ्लॅप असतंय, त्याच्यावर पुरुषांनी उभ्यानं लघुशंका केल्यानं शिंतोडे उडायचे. साहजिकच या बायांना घाणीचा सामना करायला लागत होता.

अशातच एक संस्था या बायांच्या मदतीला देवासारखी धावून आली. त्या संस्थेचं नाव ग्रीन पार्टी.

या संस्थेने बायांसाठी काय करता येईल, यासाठी बऱ्याच शकली लढवल्या. त्यातून उभं राहून लघुशंका करता आली तर ? हा पर्याय पुढं आला. ग्रीन पार्टीने त्यावेळी पर्चटोल्डसड्रॉफ शहरात दर शनिवारी नाश्त्याला जमलेल्या बायांना गोळा करून उभं राहून कशी लघुशंका कराल याविषयीच मार्गदशन द्यायला सुरुवात केली. आता या ट्रेनींगमुळं तिकडं लोकांच्यात, खास करून गड्यांच्यात या चर्चा होऊ लागल्या, कि हे कस काय शक्य आहे ?

तर या ग्रीन पार्टीन एका किटच्या मदतीनं हे प्रशिक्षण द्यायला सुरु केलं होत. या किट मध्ये एक नळी होती. जी फक्त लावली की काम झालंच म्हणून समजा. आणि एकदा वापरलं की नळी फेकून द्यायची. एवढं सोप्प होत ते. 

Urinette portative

त्यामुळं महिलांना अगदी कुठं ही प्रवास करता येऊ लागला. या अफलातून गोष्टीची जगभर चर्चा झाली. आणि मग बरेच किट बाजारात यायला लागले. सगळ्या कंपन्यांच्या नुसत्या या आयडियेवर उड्या पडल्या. परदेशात हे किट झपाझप खपायला लागले. आणि परदेशातले पुरुष बायकांवर जळायला लागले. 

Peebuddy Stand And Pee Reusable Portable Urinal Funnel For Women (1 Unit) &  Paper Based Disposable Female Urination Device for Women - : Amazon.in:  Health & Personal Care

आता भारतात अजूनही या किटचा म्हणावा तसा प्रसार नाही झाला. पण निदान निदान शिकलेल्या आणि कमोडवर बसणाऱ्या बाया हे किट घ्यायला लागल्यात. सध्या हे किट ऑनलाईन मिळत.

थोड्या दिवसांनी हे किट मेडिकलच्या काचेच्या कप्प्यात दिसेल. आणि मेडिकलवाले दादा जसं स्टेफ्री हळूच कागदात गुंडाळून देतात तस ते उभं राहून लघुशंका करायचं नळकांड कागदात गुंडाळून देऊ लागतील.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.