जगात फेमस असलेल्या लेडी ऑफ स्मेलची हत्या अत्तराच्या मार्केटमध्ये अजूनही चर्चिली जाते…

मोनिका घुरडे. महाराष्ट्राच्या नागपूरमधील रहिवासी. वडील रिटायर्ड जज होते. मोनिकाचं उच्च शिक्षण मुंबईत झालं होतं. तिला फोटोग्राफीचं प्रचंड वेड होतं. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तिला काहीतरी वेगळं करायचं होतं.

मोनिकाला देश विदेशातील अत्तरांचा शौक जडला होता. मुंबईतल्या जेजे इन्स्टिट्यूटमध्ये फोटोग्राफीचा कोर्स तिने पूर्ण केला होता. फोटोग्राफीचं शिक्षण घेत असताना मोनिकाला अत्तरांचा अभ्यास तोंडपाठ झाला होता. नुसत्या अत्तराच्या सुवासावरून ती सांगायची कि हे कुठल्या कंपनीचं अत्तर आहे.

२००४ साली मोनिका फोटोग्राफी आणि अत्तर यांचा अभ्यास करत होती. पुढे बेंगळुरूमध्ये प्रेमविवाह करून तिने आपला अत्तराचा व्यवसाय सुरु केला. लग्न झाल्यावर काही दिवसांनी या दाम्पत्याला वाटलं कि बेंगळुरू ही राहण्यासाठी योग्य जागा नाही म्हणून ते तिथून शिफ्ट झाले आणि चेन्नईला जाऊन राहू लागले. पण चेन्नईमध्ये सुद्धा त्यांचं मन रमल नाही तेव्हा त्यांनी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला.

२०११ साली त्यांनी गोव्याला राहण्याच ठरवलं.

गोव्यामध्ये त्यांचं जीवन चांगलं चालू होतं. याच काळात मोनिकाने आपला अत्तराचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवला. हा व्यवसाय इतका वाढवला कि परदेशातून सुद्धा त्याची मागणी वाढली. इंटरनॅशनल फेम आणि लेडी ऑफ स्मेल म्हणून मोनिका घुरडेची ओळख होऊ लागली. मिंट, एल्डेकोर, वोग अशा प्रसिद्ध मॅगेझीनवर मोनिकाच्या बातम्या झळकू लागल्या.

२०१६ साली फोटोग्राफीमध्ये एक्सलन्स अवॉर्डसुद्धा मोनिका यांना मिळाला. भारतातून थेट इंग्लंडमध्ये त्यांनी झेप घेतली आणि लेडी ऑफ स्मेल ओळख जगभर पसरवली.

अत्तराच्या व्यापाराने आणि प्रसिद्धीने या जोडप्यामध्ये वितुष्ट आलं आणि कसलाही गाजावाजा न करता ते वेगळे झाले. पतीच्या जाण्याने फारसा फरक मोनिकाच्या आयुष्यात पडला नाही.

पुढे मोनिका यांनी MO नावाने अत्तराची एक लॅब सुरु केली. २०१६ मध्ये मोनिकाने गोव्यात एक भला मोठा फ्लॅट घेतला. पण इथून सगळं चित्र बदललं. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी फ्लॅटमध्ये मोनिकाच्या हत्या झाल्याचं पोलिसांना आढळून आलं.

तर यामागे अजून एक मॅटर आहे.

ज्या फ्लॅटमध्ये मोनिका राहत होती त्या सोसायटीचा वॉचमन राजेश कुमार सिंगला मोनिका सोबत एकतर्फी प्रेम झालेलं होतं. या गार्डने मोनिकाच्या गाडीची सफाई करत असताना गाडीत ठेवलेली छत्री चोरली होती.

छत्री चोरल्याचा आरोपामुळे सोसायटी कमिटीने त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. मोनिकावर एकतर्फी प्रेम असल्या कारणाने तो मोनिकाच्या प्रत्येक वस्तू स्वतःजवळ बाळगू इच्छित होता.

छत्री चोरल्याच्या आरोपात जेव्हा राजेश कुमार सिंहला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तेव्हा त्याने मोनिकाचा बदला घ्यायचा म्हणून तिच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि अगोदर बलात्कार करून तिची हत्या केली आणि तो तिथून फरार झाला.

पण अगदी काही दिवसातच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. गोवा पोलिसांनी अगोदर रिपोर्ट लिहून घेतली आणि प्रकरण वाढू नये म्हणून जास्तीत जास्त तपास केला. तेव्हा राजेश कुमार सिंग आरोपी म्हणून आढळला आणि त्याला अटक करण्यात आली.

मोनिका घुरडे यांची ओळख विदेशातही होती, त्यांच्या मृत्यूमुळे परदेशातही हळहळ व्यक्त केली गेली होती. फक्त भारतातच नाही तर आजही परदेशातल्या अत्तराच्या बाजारात मोनिका घुरडे अर्थात लेडी ऑफ स्मेलची चर्चा होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.