1965 च्या युद्धात आपण लाहोर जिंकलो असतो पण लष्करप्रमुखांनी एक चुक केली..

‘आदत से मजबूर’ असं म्हणतो ते पाकिस्तानच्या बाबतीत अगदी खरं आहे बघा. तसं तर मी आपल्या देशाची तुलना पाकिस्तानसोबत अज्जिबात करणार नाहीये परंतु एक साम्य दोन्ही देशात आहेच..ते म्हणजे दोन्ही देशांच्या सवयी.

दोन्ही देशांनी आपल्या सवयीमुळे युद्ध तर हरलेच परंतु आपल्या सवयीपुढे त्यांना हात टेकवावे लागले होते.

पाकिस्तानचं बोलायचं झालं तर,ओवरकॉन्फिडेंस नडतो ते पाकिस्तानी मान्य च करेनात.

“हार कर भी जितने वालों को बाझीगर केहते है ! तो, जितके भी हारनेवालों को क्या केहते है? हे तर आपला शाहरुखने सांगितलेच नाही. असो ..

मुद्द्याचं बोलायचं झालं तर, इतिहासातील एक युद्ध भारत जिंकुनही हरला होता !

भारतीय सैन्याने पाकिस्तानबरोबरच्या १९६५ च्या युद्धात पाक सैन्याला लाहोरच्या बाहेर हुसकावून लावलं होतं परंतु युद्धाच्या वेळी भारतीय लष्कर प्रमुख जयंतो नाथ चौधरी यांच्या एका चुकीमुळे भारताला पाकिस्तानशी तडजोड करावी लागली आणि पाकिस्तानमधला जिंकलेला काही भाग पाकिस्तानला परत करावा लागला. 

हे सगळ झालं ते पाकिस्तान च्या ओवरकॉन्फिडेंसमुळे आणि भारत समझोता मध्ये कमी पडल्यामुळे.

तसं तर भारत-पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत ४ युद्ध झालीत. पहिलं १९४८, मग १९६५, १९७१ मध्ये झालेलं बांग्लादेश मुक्ति संग्राम आणि शेवटचं १९९९ मध्ये कारगिल युद्ध. अभिमानाची गोष्ट म्हणजे चारही युद्ध आपण जिंकलोत.

परंतु त्यातलं १९६५ मधील युद्ध म्हणजेच ज्यात दोन्ही देशांमध्ये एक समझोता झालेला तो म्हणजे ताश्कंद करार !

परंतु याच करारात आपल्याकडून म्हणजेच आपल्या लष्करप्रमुखांकडून एक चूक झाली आणि आपण लाहोर गमावलं.

याचदरम्यान देशावर अन्न-धान्याच्या तुटवड्याचे संकट आले होते, आधीच देशाची आर्थिक परीस्थिती  कमकुवत होती, त्यात अजून एक आव्हान म्हणजे चीनशी झालेल्या लढाईला फक्त तीन वर्षे उलटली होती.

चीनसोबत झालेल्या पराभवानंतरही भारतीय सेना स्वतःचे मनोबल वाढवित होती. तेवढ्यात मे – जून १९६५ या महिन्यात पाकिस्तानने गुजरातमधील कच्छच्या रणवर हल्ला केला. कच्छचा हा भाग सीमा विवादात येत नव्हता त्यामुळे पाकिस्तानने या क्षेत्रावर हल्ला करण्याचा सबंधच नव्हता.

एव्हढंच नाही तर या हल्ल्यात पाकिस्तानने भारतातील कंजरकोट हा परिसर ताब्यात घेतला.

यानंतर भारतावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला पाकिस्तानशी करार करावा लागला. त्याअंतर्गत भारताने पाकिस्तानला ७५ चौरस मैलांची जमीन द्यावी लागली होती त्यामुळे देशभरात ज्यामुळे पंतप्रधान शास्त्री यांच्यावर खूप टीका झाली.

आधीच चीनच्या युद्धातल्या जखमा ताज्या होत्या त्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान आणि परराष्ट्रमंत्री झुल्फेकर अली भुट्टो यांनी तर्क लावला की काश्मीर काबीज करण्याची  अशी संधी पुन्हा मिळणार नाही.

१ सप्टेंबर १९६५ रोजी ऑपरेशन ग्रँड स्लॅमचा भाग म्हणून पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरच्या छंब  येथे भारतीय सैन्यावर तोफांनी हल्ला सुरु केला. यासाठी पाकिस्तानला चीनकडून पूर्ण पाठिंबा मिळत होता. पण यावेळी रशिया आणि अमेरिकेशी चीनचे संबंध चांगले नव्हते, म्हणूनच ते थेट युद्धात भाग घेत नव्हते.

यानंतर भारतीय सैन्याने पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून अधिकृतपणे युद्ध सुरु केले.  लाहोर आणि सियालकोटला टार्गेट करत भारताने प्रत्युत्तर दिले. आणि मग २२ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली.

या युद्धामध्ये भारताने पाकचा १९०० चौ किमी भूभाग जिंकला, तर भारताचा  ५४० चौ किमी पाकिस्तानच्या ताब्यात गेला. भारतीय सैन्याने पाक सैन्याला लाहोरच्या बाहेर काढले परंतु युद्धाच्या वेळी भारतीय लष्कर प्रमुख जयंतो नाथ चौधरी यांच्या चुकीमुळे भारताला पाकिस्तानशी तडजोड करावी लागली.

जिंकलेले सर्व क्षेत्र पाकिस्तानला परत करावे लागले त्यात लाहोर हि होते.

याबाबतीत तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या डायरीत भारतीय लष्कर प्रमुख जयंतो नाथ चौधरी यांच्या चुकीबद्दल लिहिले होते.आरडी प्रधान यांच्या “१९६५ वॉर, द इनसाइड स्टोरी: डिफेंस मिनिस्टर वाई बी चव्हाण्स डायरी ऑफ इंडिया-पाकिस्तान वॉर” या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख सापडतो.

२० सप्टेंबर रोजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी लष्करप्रमुखांना विचारले की,

जर युद्ध आणखी काही दिवस चालू राहिले तर भारताला काय फायदा होईल?

लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना सल्ला दिला कि, आर्मीजवळील दारूगोळा जवळपास संपत आलाय, त्यामुळे यापुढे युद्धे लढणे भारतासाठी चांगले नाही. त्यामुळे रशिया आणि अमेरिकेच्या पुढाकाराने सीएसफायरचा प्रस्ताव भारताने स्वीकारला पाहिजे”  आणि शास्त्रीजींनी त्यांचे ऐकले आणि प्रस्ताव स्वीकारला .

पण नंतरच्या पाहणीत असे दिसून आले की,  भारतीय सैन्याच्या दारूगोळा संपलाच नाही. फक्त २०% दारुगोळा खर्च झाला होता. जर भारताने ठरवले असते तर तेवढ्या दारूगोळ्यात पाकिस्तान मिटे पर्यंत युद्ध केलं असतं. परंतु सेना प्रमुखांनी चुकीची माहिती दिल्यामुळे हे होऊ शकले नाही

बरं सैन्यप्रमुखांच्या चुका इथेच संपत नाहीत.

करारापूर्वी भारतीय सैन्य लाहोरच्या बाहेर पोहचले देखील होते, भारतीय सैन्य सहजपणे सियालकोट आणि लाहोर ताब्यात घेऊ शकले असते परंतु सेना प्रमुखांनी शास्त्री यांना असे करण्यास रोखले.

२३ सप्टेंबर रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली तरीही सीमेवर तणाव कायम होता. मध्यस्थी करण्यासाठी रशिया पुढे आला आणि ताश्कंदमध्ये करारासाठी शास्त्री आणि जनरल अयूब खान यांना बोलविण्यात आले. करारामध्ये पाकिस्तानने  काश्मीरवर भर देण्याची इच्छा होती. परंतु शास्त्रीजींनी त्यांचे काहीच चालू दिले नाही आणि १० जानेवारी १९६६ रोजी करारावर सह्या झाल्या.

त्यांच्या मनाला एक गोष्ट खात होती कि, करारामुळे भारतीय सैन्याने युद्धात जिंकलेले महत्त्वपूर्ण भाग सोडून द्यावे लागणार होते. आणि आता देशाला काय उत्तर द्यावे याचीही चिंता त्यांना लागलेली होती.

या करारानंतर त्याच रात्री एक पार्टी ताश्कंद मध्ये ठेवण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी शास्त्रीजी वापस परतणार होते परंतु रात्रीतूनच त्यांची तब्येत अचानकच बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.