युपीच्या लखीमपूर खेरीमध्ये शीख समुदाय कुठून आला ?

लखीमपूर हिंसाचार घटनेचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असणार. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसून आलेलं कि,जी चारचाकीचा चालक हा शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाताना दिसतोय. आणि या हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा देखील या वाहनात होता, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. मात्र आशिष मिश्रा याला अजून चौकशीसाठी बोलावलं ना आरोपी घोषित केलं ना अजून लखीमपूरच्या या हिंसाचारात मृत पावलेल्या शिखांना न्याय मिळाला.

लखीमपूर खेरी घटनेत मारले गेलेले जे चार शेतकरी आहेत ते म्हणजे नछतर सिंह, लव्हप्रीत सिंग, दलजीत सिंग आणि गुरविंदर सिंग. हे सर्व शीख शेतकरी कुटुंबातील होते जे नंतर या प्रदेशात स्थलांतरित झाले.  उत्तर प्रदेशातील तराई भागात राहणारे बहुतेक शीख कुटुंब, ज्यांचा लखीमपूर खेरी हा देखील एक भाग आहे, विभाजनानंतरच या भागात हे शीख समुदाय स्थायिक झाला होता. सुरुवातीपासूनच हा समुदाय शेती व्यवसायात गुंतलेला आहे.

लखीमपूर खेरी जिल्ह्यात संपूर्ण उत्तर प्रदेशातील शीखांची सर्वात मोठी लोकसंख्या आहे, त्यापैकी बहुतेक शेतकरी समुदायाचे आहेत. २०११ मध्ये जी जनगणना झाली होती त्यानुसार, उत्तर प्रदेशातील शिखांची एकूण लोकसंख्या ६, ४३,५०० इतकी आहे आणि या एकूण लोकसंख्येपैकी ९४,३३८ शीख हे लखीमपूर खेरी जिल्ह्यात स्थायिक आहेत. या जिल्ह्यात ते अल्पसंख्यांक आहेत, आणि तेथील एकूण लोकसंख्येच्या केवळ २.६३ टक्के भाग आहेत.

तरी सुद्धा हा समुदाय तेथील शिखांच्या एकूण समुदायातला महत्वाचा हिस्सा मानला जातो. यानिमित्ताने हे जाणून घेणे महत्वाचे आहे कि, उत्तर प्रदेश राज्यातल्या या शिखांचे मूळ काय? त्यांचा इतिहास काय आहे ?

जसं कि इतिहासातील महत्वाची घटना म्हणजे, देशाची फाळणी. याच फाळणीनंतर, शीख मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशात स्थलांतरित झाले आणि तेराई पट्ट्यातील विविध जिल्ह्यांत वास्तव्यास आले आणि कालांतराने इथेच स्थायिक झाली. एवढ्या मोठ्या संख्येने हा समुदाय इथे वास्तव्यास असल्यामुळे या भागाला ‘मिनी पंजाब’ म्हणून ओळखले जाते.

हा ‘मिनी पंजाब’ म्हणून ओळखला जाणारा तराई पट्टा हा नेपाळ सीमेवरील हिमालयाच्या दक्षिणेकडील दलदलीचा प्रदेश आहे जो पश्चिमेस सहारनपूरपासून पूर्वेला कुशीनगरपर्यंत पसरलेला आहे आणि त्यात नैनिताल, पीलीभीत, रामपूर, बिजनोर आणि लखीमपूर खेरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि

पण इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली मासिकात आणखी एक संदर्भ सापडतो तो म्हणजे, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, शीखांचे हे स्थलांतर स्वातंत्र्याच्या आधी येथील जमीन नापीक झाली होती. पण नंतर या जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ होत गेली आणि शीख शेतीसाठी प्रेरित होत येथे स्थाईक झाले.

काही संदर्भानुसार, या भागात शीख शेतकऱ्यांची पहिली वस्ती १९५२ मध्ये स्थापन झाली होती.

पंजाब मधील स्थलांतरीत लोकांना प्रत्येक कुटुंबांना १२ एकर शेत जमीन देण्यात आली. त्याचं लोकांना हि जमीन दिली गेली ज्यांची त्या जागेवर आधीच काही एकर जमीन होती,

शीख समुदायाचे अभ्यासक सांगतात कि, १९४७ मध्ये भारत आणि पंजाबच्या विभाजनानंतर काही लोकांना पंजाब आणि यूपीचा काही भाग भरपाई म्हणून मिळाला. ज्यांना पश्चिम पंजाब मधील त्यांची जमीन सोडावी लागली होती.  अशा प्रकारे पंजाबी लोक आणि शीख समुदायांना येथील जमिनीवर मालकी हक्क मिळाला तो कायमचाच !

याच दरम्यान, कनिष्ठ जातीचे शीख, राय शीखांमध्ये समाविष्ठ झाले, कारण त्यांनाही स्वतःची जमीन नसल्याने ते येथील कामगार दलात सामील झाले. काही रायसिखांनी शीखांच्या कनिष्ठ जातीच्या समुदायाच्या धर्माच्या संगनमताने थराई आणि बक्सासारख्या स्थानिक जमातींकडून जमीन खरेदी केली, जे मूळचे रहिवासी होते.

२०१९-२० वर्षांत संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात लखीमपूर खेरी हे कृषी उत्पादन क्षेत्रात सर्वात मोठे योगदान देणारे होते.

या वर्षांत राज्याच्या कृषी, मत्स्यव्यवसाय आणि वनीकरण क्षेत्रात १२, ४१४.४० लखीमपूर खेरी जिल्ह्याचे  कृषी उत्पादनात सर्वाधिक योगदान आहे. आणि यात या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी तितकीच मोठी भूमिका निभावली.

८०-९० च्या दशकात ‘दहशतवाद्यांच्या ऑपरेशनचे केंद्र’ म्हणून ओळखले जायचे.

जरी उत्तर प्रदेशच्या या तराई भागात राहणारे अनेक शीख कुटुंबे फाळणीनंतर, या भागात स्थलांतरित झाले तरी त्यांना संशयाने पाहिले गेले.

१९८६ मध्ये, कथित दहशतवादविरोधी कारवाईचा भाग म्हणून या परिसरातील ६.५  लाख शीख कुटुंबांवर पोलिसांनी छापे टाकले होते. त्या छाप्यांमध्ये आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर काहीही आढळले नसले तरी, त्या भागातील शीख शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या वीर बहादूर सिंग यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन यूपी सरकारवर त्यांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून वागवल्याचा आरोप केला होता.

१९९० दशकापासून या प्रदेशातून अनेक हिंसक घटनांची नोंद झाली आहे, ज्यात पीलीभीतमध्ये घडलेली कुख्यात चकमकीचा देखील समावेश आहे. या चकमकीत यूपी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १० शिखांना मारलं होतं.

येथील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आहेत.

उत्तर प्रदेशातील शीख शेतकरी ३ कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षी पासून सुरु असलेल्या  शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक भाग आहेत.

उत्तर प्रदेशातील शीख शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस पिकवतात, जे राज्याचे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते, तर भात आणि गहू ही येथील मुख्य अन्न पिके आहेत. इतर पिकांमध्ये बाजरी, मका, रेपसीड आणि मोहरी यांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ऊस लागवडीवर एक प्रकारचे कृषी संकट निर्माण झाले आहे. हे संकट प्रामुख्याने तीन मुद्द्यांभोवती फिरते – बराच काळ न वाढलेला भाव आणि शेतीच्या खर्चात मोठी वाढ. त्यामुळे येथील शेतकरी या मोठ्या आंदोलनाचा भाग अएत. पण हिंसाचाराच्या घटनेमुळे सर्वांना माहिती झाला आहे.

खरं तर, उत्तर प्रदेशातील शीख लोकसंख्या ही तराई क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वोट बँक मानली जाते आणि त्यांची संख्या प्रदेशातील दोन्ही बाजूंनी निवडणूक निकालांना झुकवण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे राजकीय पक्ष न्याय आणि हक्कांच्या पलीकडे जाऊन या समुदायांना आणि मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देतात का ते पाहणे महत्वाचे आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.