मारुतीने डिलरशिप देण्यास नकार दिला होता, आता ते स्वतः इतरांना डिलरशिप देतात.

असे अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील जे आपल्या गरिबीला, दारिद्रयाला हत्यार बनवत आयुष्याची लढाई लढत असतात. असेच उदाहरण म्हणजे लक्ष्मणदास मित्तल…! त्यांच्यावरही अनेक आर्थिक संकटं आली होती. त्यात डोक्यावर कर्जाचं ओझं अशा अडचणीत ते लहानाचे मोठे झाले…

त्यावेळी लक्ष्मणदास मित्तलच्या आयुष्यात अंधःकाराशिवाय काहीही नव्हते, त्यांच्यासोबत असं कुणी शिक्षित समजूतदार व्यक्ती नव्हता कि, कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवून आधार देईल किंव्हा कुणी मार्गदर्शन करेल. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत: च्या आयुष्याची कहाणी लिहिली…अशी कहाणी जी  ज्यात अफाट संपत्ती आणि कीर्ती असेल ..

हो आयुष्यात इतके यशस्वी झाले कि जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत ते सामील झाले.

लक्ष्मण दास मित्तल हा एक भारतीय उद्योजक आहेत, ते सोनालिका समूहाचे मालक आणि अध्यक्ष आहेत. तो भारतातील ५२वे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे सदस्य आहेत.

लक्ष्मण दास मित्तल यांचा जन्म पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यात भिंडरकला गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील हुकुम चंद शेती धान्य बाजारात ब्रोकर म्हणून काम करायचे. पण त्या कामातून कुटुंबाचा खर्च भागेना म्हणून सतत ते नातेवाईक आणि मित्रांकडून कर्ज घ्यायचे.

अशा प्रकारे हळूहळू त्याचे कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबून जात होते.

परंतु वडिलांनी सुरुवातीपासूनच शिक्षणाला महत्त्व दिलं म्हणून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच लक्ष्मण दास यांना शिक्षणासाठी प्रेरित केलं.

लक्ष्मण दास यांनी शासकीय महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. पुढे त्यांनी “पंजाब युनिव्हर्सिटी” मधून मास्टर डिग्री पूर्ण केली, इंग्रजी साहित्यात सुवर्णपदकही मिळवले, परंतु इतका अभ्यास करूनही लक्ष्मणदास मित्तल यांना चांगली नोकरी मिळू शकली नाही.

१९५६ मध्ये जेव्हा भारतात विमा उद्योग सुरू झाला आणि एलआयसीच्या पहिल्या सरकारी विमा कंपनीचा पाया घातला गेला. आणि याच बरोबर मित्तल यांनीही आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आणि नेहमीप्रमाणे येथेही त्यांनी आपल्या परिश्रमांच्या जोरावर चांगले काम केले आणि काही वेळातच त्याला फील्ड ऑफिसर म्हणून प्रमोशन मिळाली नाही.

त्यामुळे त्यांना भारतातील वेगवेगळ्या राज्यात जाण्याची संधी मिळाली.

आता त्यांच्या आयुष्यात गाडी चांगली चालली होती, परंतु त्यांच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग लोकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यातच जात गेला, त्यानंतर त्याने जे काही उरले ते वाचवले, त्यांना  माहित होते की ही नोकरी आयुष्यभर असली तरी त्यातून ते काहीही साध्य करू शकणार नाहीत कारण सर्व कमाई कर्जाची परतफेड करण्यातच जाईल म्हणून ते विचार करू लागले.

आपल्या अनुभवाद्वारे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये भेटीं दिल्यामुळे त्यांना एक गोष्ट समजली की अद्याप शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक उपकरणांची बाजारात कमतरता आहे आणि बाजारात जे काही उपकरणे उपलब्ध आहेत ते शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत.

याच विचारात त्यांनी मोठं धाडस केलं आणि कृषी यंत्रे बनविण्याचा कारखानाच उघडला, परंतु तीन वर्षांतच त्यांना हा कारखाना बंद करावा लागला आणि त्याचबरोबर त्यांना मोठ्या अडचणींचा सामना  करावा लागला. त्याने आपल्या कमाईतून केलेली बचत तसेच इतर लोकांच्या कर्ज फेडण्यात गेली आणि हे सर्व होऊनही लक्ष्मण दास यांनी हिंमत हरली नाही.

यावेळी पुन्हा उभे राहण्याच्या इच्छेने लक्ष्मणदास मित्तल यांनी “मारुती” कंपनीची डीलरशिप घेण्यास अर्ज केला, परंतु त्यांचा अर्ज मान्य केला नाही.  शेवटी एकदा त्याने पंजाब विद्यापीठातील शेतकऱ्यांसाठीचे धान्य व पेंढा वेगळे करण्याचे एक मशीन पाहिले आणि त्यातून त्यांची कल्पना पुढे आली.

त्यानंतर ते होशियारपूरला आले आणि पुन्हा नव्याने बिझिनेसमध्ये उडी मारण्याची तयारी केली. 

 यावेळी मात्र त्यांनी केलेल्या मेहनतीचा मोबदला घेतला आणि आठच वर्षांत त्यांची सोनलिका मळणी जगात ओळखली गेली. 

त्यांनी तयार केलेल्या थ्रेसरचे यश पाहून शेतकरी बांधवांनी त्यांना मागणी केली कि, त्यांच्यासाठी ट्रॅक्टर उत्पादन करणारा कारखाना तयार करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी दरात चांगले ट्रॅक्टर मिळतील. लक्ष्मणदास मित्तल यांनाही शेतकर्‍यांच्या सूचना आवडल्या. १९९४ मध्ये त्यांनी सुरुवात केली आणि  ट्रॅक्टर बनवण्याचा कारखाना उघडला. त्यांनी दोन प्रकारचे ट्रॅक्टर बनवण्याचे काम सुरू केले, 

१९९५ मध्ये भोपाळच्या प्रयोगशाळेच्या चाचणीत त्यांच्या कारखान्यात बनवलेल्या ट्रॅक्टरचा अहवाल सकारात्मक आला.

परंतु ट्रॅक्टर निर्मितीसाठी पैशांची अडचण होती, परंतु शेतकरी बांधवांच्या आग्रहाने त्यांनाही या कामातील भवितव्य दिसले. या कारणास्तव, त्यांनी त्यांच्या जवळच्या व्यापाराशी बोलणं केलं जेथे त्याने व्याजाशिवाय पैसे देण्याचं मान्य केले.

त्यानंतर लक्ष्मण दास मित्तल यांनी जालंधर रोडवर सुमारे २२ कोटींचा “सोनालिका ट्रॅक्टर” चा कारखाना उघडला, जिथे त्यांचे १९९६ मध्ये पहिले ट्रॅक्टर बनले आणि बाजारात दाखल झाले.

यशाच्या यशानंतर लक्ष्मण दास मित्तल यांनी मागे वळून पाहिले नाही आणि आज त्यांचा “सोनालिका” ब्रँड (ट्रॅक्टर आणि थ्रेशर) जगातील ७४ देशांमध्ये निर्यात केला जातो, त्याचबरोबर त्यांचा प्लांट जगातील ५ देशांमध्ये स्थापन करण्यात आला आहे.

लक्ष्मण दास यांना मारुतीने डीलरशीप नाकारले, आज त्यांची कंपनी सोनालिका लोगोला डीलरशिप देते.

लक्ष्मण दास यांची वैयक्तिक संपत्ती १७००  कोटींपेक्षा जास्त आहे आणि जगातील काही अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश आहे.

हे हि वाच भिडू :

 

1 Comment
  1. SWAPNEEL BOPARDIKAR says

    Very Nice Sir!!!!

Leave A Reply

Your email address will not be published.