लक्ष्य सिनेमा ही खरं तर फरहान अख्तरची स्वतःची लाइफस्टोरी होती.

एक तुमच्या आमच्या सारखा तरुण मुलगा. दिवसभर रटाळपणे बसून राहणे. डीव्हीडी वर सिनेमे बघणे, बापाचे पैसे खाणेपिणे गाड्या चैनी यावर खर्च करणे. एवढच त्याच काम. त्याचे बाकीचे मित्र एमबीए करतोय तर कोण युपीएससी परीक्षेची तयारी करतंय, सगळ्यांना आपण पुढे काय करायचं आहे हे क्लियर आहे. खुद्द त्याची गर्लफ्रेंड अगदी पाळण्यातून ठरवून आल्याप्रमाणे जर्नलीजमच्या मागे लागली आहे. पण त्याला आपण पुढे काय करणार हे ठाऊक नाही आहे. असच आयुष्य काढ म्हटल तरी तो तयार आहे पण बापाचे रोजचे टोमणे सहन होत नाहीत म्हणून काही तरी कराव लागणार. तुमच्या लक्षात आलच असेल भिडू तुम्हाला लक्ष्यची स्टोरी सांगतोय. पण तसं नाही.

17724ea83bd71f8ec82ba9a330ec2002

ही स्टोरी स्वतः फरहान अख्तरची आहे.

फरहान अख्तर हा फेमस गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा. आई सुद्धा पटकथाकारचं. त्याचे आजोबा, पणजोबा , खापर पणजोबा हे सगळे सुप्रसिध्द शायर होते. त्याचं अख्खं कुटुंब साहित्याशी जोडलेलं. तो लहान असताना त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला.

या गोष्टीचा परिणाम म्हणा किंवा रक्ताचा गुण पण फरहान आधी पासून बंडखोर होता. शाळेत देखील त्याची गणती वांड आणि वाया गेलेला अशी व्हायची. याच गुणामुळे त्याला कॉलेजमधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्याच शिक्षण निम्म्यात संपलं. पुढे करायचं त्याला माहित नव्हतं. त्याच्या मित्रांचा एक ग्रुप होता. यामध्ये होते अभिषेकबच्चन, आदित्य चोप्रा, ह्रितिक रोशन, करण जोहर. यापैकी बऱ्याच जणांनी लहानपनीच ठरवलेलं की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे. त्या दृष्टीने तयारी देखील सुरु केली होती.

फरहानला माहित नव्हतं की आपल्याला नेमक काय जमत?

आईवडिलांप्रमाणे लिहायला जमत नाही, तेवढ आपलं वाचन नाही हे त्याला कळत होतं.  दिग्दर्शन,अक्टिंग वगैरे विचार देखील त्याने केला नव्हता. वशिल्याने काही सिनेमाच्या सेट वर असिस्टंट म्हणून त्याला पाठवण्यात आलं. पण तेही त्याला जमलं नाही. दिवसभर सिनेमा पाहण्यात वेळ घालवणे एवढचं तो करायचा. डाय हार्ड हाइंग्लिश सिनेमा त्याने पंचवीसवेळा पाहिलेला, शोलेची तर त्याने किती पारायणे केली होती त्याला देखील ठाऊक नव्हते. अतिशय डिप्रेशनचा तो काळ होता. जवळचे सगळे मित्र दुरावले होते. वडिलांशी खूप काही बोलण व्हायचं नाही पण ते एकमेव व्यक्ती होते जे या सगळ्यात त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते.

पण बाकी सगळ्याच एकमत होतं की फरहानच्या आळशी व धरसोड वृत्तीने त्याची वाट लागलेली आहे. त्याच्या आयुष्याला ‘लक्ष्य’ उरलेलं नाही.

अखेर त्याच्या आईने त्याला धमकी दिली आता काही केलं नाही तर घरातून बाहेर काढणार. मग त्याने सहज गंमतीमध्ये आपल्या आयुष्यातल्या काही घटना , आठवणी लिहायला सुरवात केली आणि यातूनच दिल चाहता हैची स्क्रिप्ट तयार झाली. and REST IS HISTORY.

दिल चाहता है सुपरहिट झाला. या सिनेमाने फक्त फरहानचं नाही तर अख्ख्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीला बदलून टाकलं. ज्यांनी एकेकाळी फरहानला वेड्यात काढलं होतं, त्याचा नंबर डिलीट केला होता. ते सगळे परत फरहान कसा आपला बेस्ट फ्रेंड आहे हे दाखवत परत आले. फरहान साठी हा अनुभवचं वेगळा होता. ज्या ह्रितिकने दिल चाहता है ला नकार दिला होता तोच मागे लागून फरहानचा पुढचा सिनेमा लक्ष्य करत होता.

लक्ष्यमध्ये फरहानने आपल्या सारख्याच दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या तरुणाचे चित्र उभा केले. वडिलांच्या पैशावर आळशी आयुष्य जगणारा करण शेरगिल सिनेमाच्या पहिल्या हाफमध्ये अपघाताने इंडियन मिलिटरी अकॅडमीला निवडला जातो, पण तिथेही खूप दिवस टिकत नाही. तिथूनही पळून आल्यावर गर्लफ्रेंडने केलेल्या अपमानामुळे त्याच आयुष्य बदलतं. तो परत जातो.

सिनेमाचा दुसरा हाफ पूर्णपणे कारगिल युद्धावर आधारित आहे. एका दिशाहीन तरुणापासून देशासाठी लढणारा इंडियन आर्मीचा ऑफिसर हे ट्रान्सफोरमेशन ह्रितिकने सुंदररित्या दाखवलं. 

शेवटची लढाई, ह्रतिक आणि त्याच्या वडिलांच्यातला इमोशनल सीन, त्याचा आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड पण युद्धपत्रकार म्हणून आलेल्या प्रिती झिंटा यांच्यातला प्रसंग असू दे अथवा अमिताभचा कर्नल दामले, ओम पुरी ,अमरीश पुरी यांचे छोटे छोटे पण परिणामकारक प्रसंग ,जावेद अख्तरनी बऱ्याच वर्षांनी परत स्क्रिप्ट रायटिंग मध्ये पहिल्याच प्रयत्नात आपली जादू दाखवून दिली. याशिवाय काश्मीर मध्ये खरोखरच्या आर्मीसोबत केलेलं शुटींग, शंकर एहसान लॉयची  कर्णमधुर गाणी विशेषतः अंगावर शहारे उभा करणारा कंधो से मिलते है कंधे हे सगळंचं यापूर्वी कधीही न पाहिलेलं असं होतं.

MV5BNmU0NzYyYjMtYTE2OC00NDNiLThiMzYtMzg2MjJhNGY5MjU0XkEyXkFqcGdeQXVyMTE4NTEyNzA@. V1

हा युद्धपट असूनही त्यात जोरजोरात बोललेले भडकाऊ डायलॉग नव्हते. उगीचचं घुसडलेली गाणी नव्हती, अतिरजित साहसीपणा नव्हता. पण तरी भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात परिणामकारक साहसीपट म्हणून याला ओळखले जाते. ह्रितिक पासून ते प्रिती झिंटा पर्यंत सगळ्यांचीची अॅक्टिंग भारी झाली होती. पण एवढ असून ही हा सिनेमा चालला नाही.

पुढे अनेक वर्षांनी फरहान अख्तरला विचारण्यात आलं की लक्ष्य मधली एक गोष्ट तुला आज बदलावीशी वाटली तर तू कोणती बदलशील? त्याने एक क्षणही वाया न घालवता उत्तर दिलं, “प्रेक्षक”

त्याकाळच्या प्रेक्षकांना हा सिनेमा झेपलाच नाही. पण फरहान म्हणतो या सिनेमाने माझ्यासह या फिल्मशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम केला. शेवटी ह्रितिक १४००० फुट उंचीच्या शिखरावर झेंडा रोवतो तिथे मलाही माझ्या जगण्याचा खरं अर्थ सापडला. बाकी यश अपयश याचा काही फरक नाही पडत.

आज लक्ष्यला पंधरा वर्षे पूर्ण झाली. पण आजच्या पिढीतील कित्येकजण फरहानच्या लक्ष्यहीन नायकाशी स्वतःला जोडू पाहतात. कित्येकजणांना आपल्या आयुष्यात लक्ष्य मिळवण्याची प्रेरणा या सिनेमाने दिली.काही वर्षापूर्वी फरहान जेव्हा डेहराडूनच्या मिलिटरी अकॅडमी मध्ये गेला होता तेव्हा तिथले ७०% अधिकारी म्हणाले की लक्ष्य बघूनच आम्ही इथे आलो. तेव्हा त्याला खरोखर आपलं लक्ष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.