१९६५ च्या युद्धात शास्त्रींनी दिल्लीच्या सुरक्षेसाठी RSS ची मदत घेतली होती….

काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून सध्या विस्तव देखील जातं नाही. राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांची आजवरची विधान ऐकल्यास आपल्याला त्याचा सहज अंदाज येऊ शकतो. अगदी अलीकडंच उदाहरण द्यायचं झालं तर राहुल गांधी यांनी आरएसएसला आता संघ परिवार म्हणणार नसल्याचं म्हंटलं होतं. त्याआधी त्यांनी केलेल्या एका विधानासंबंधी न्यायालयात केसं देखील दाखल झाली होती.

मात्र इतिहासात काही प्रसंग असे देखील येऊन गेले आहेत जेव्हा काँग्रेसनं स्वतःहून पुढाकार घेत संघाची मदत मागितली होती, किंवा संघानं देखील अनेकदा काँग्रेसच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला होता. यात अगदी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंपासून ते इंदिरा गांधींपर्यंतच्या पंतप्रधानांचा समावेश होतो.

गोष्ट आहे १९६५ सालची जेव्हा तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना मदत मागितली होती आणि संघाच्या खांद्यावर दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली होती. 

११ सप्टेंबर १९६५. भारत पाकिस्तान युद्ध ऐन भरात होते. पाक सैन्याला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी आर्मीला पंजाबमधून सीमा पार जाण्याचे आदेश दिले होते. भारतीय लष्कराचे पहिले चिलखती दल सियालकोटच्या भागात जाऊन पोहचले देखील होते. भारतीय रणगाडे पाकिस्तानी शेतात घुसून तिथल्या उसाचा फडशा पाडत होते. लाहोर जिंकणे जिंकणे त्यांचं टार्गेट होतं.

अमेरिकेने पुरवलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, पॅटन रणगाडे घेऊन अतिआत्मविश्वासाने भरलेल्या पाकिस्तानने साधारण ऑगस्ट मध्ये भारतात घुसखोरी केली होती.

प्रत्यक्ष युद्धादरम्यान वजिराली येथून १३५ रणगाडे, २४ पॅटन टॅंक आणि १५ शर्मन रणगाडे असलेले पाकिस्तानी कॅव्हिलरी दल फिल्लोराच्या दिशेने चालून आले होते. शिवाय पाकिस्तानी एअरफोर्स हवेतून मारा करतच होते.

अशा बाका प्रसंगावेळी अख्खा देश आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभा होता. केवळ संरक्षणमंत्री असलेले यशवंतराव चव्हाणचं नाही तर पंतप्रधानांसहित सगळ्या सरकारचं लक्ष या युद्धावर होते.

मात्र त्यावेळी बाहेरच्या आक्रमणावेळी अंतर्गत अशांतता डोकं वर काढण्याची शक्यता होती. तसचं त्यामुळे पोलिसांवरचा ताण देखील वाढणार होता. ही गोष्ट लक्षात घेऊन लाल बहादूर शास्त्रींनी देशहितासाठी पार्टी लाईनच्या बाहेर जात निर्णय घेण्याचं ठरवलं.

त्यांनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना मिटिंगसाठी आमंत्रण पाठवलं. आणि या मिटिंगमध्ये त्यांनी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नियमित ठेवण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांची मदत मागितली. यात मुख्य जबाबदारी होती दिल्लीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणं. 

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोळवलकर गुरुजींनी स्वयंसेवकांना दिल्लीच्या सुरक्षेची आणि वाहतुकीची जबाबदारी हातात घेण्याची आदेश दिले.

संपूर्ण युद्ध प्रक्रियेदरम्यान संघानं पोलिसांना पूर्णपणे मदत केली. दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि सुरक्षेवर कोणताही परिणाम होऊ दिला नव्हता.

एवढंच नाही तर शास्त्रींच्या आवाहनावरून स्वयंसेवकांनी सीमेवर जाऊन जवानांना जेवणाचं देखील वाटप केलं होतं.

या गोष्टीचा उल्लेख डॉ. हरिश्चंद्र बर्थवाल यांनी आपल्या द आरएससःएन इंट्रोडक्शन या पुस्तक करुन ठेवला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या आत्मकथेमध्ये देखील लिहून ठेवलं आहे की, नेहरुंच्या नंतर शास्त्रींनी देखील कधीही जनसंघ आणि आरएसएसच्या वैचारिक शत्रुत्व बाळगलं नव्हतं. ते गुरुजींना नेहमीच राष्ट्रीय मुद्द्यावर सल्ला मागत असतं.

पुढे १७ दिवसांमध्ये भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला मागं सरकावं लागलं. पाकिस्तानची अवस्था बघून युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राला मध्यस्थी करावी लागली. २३ सप्टेंबर १९६५ रोजी दोन्ही देशांच्या मध्ये युद्ध विरामची घोषणा झाली. पाकिस्तानला हरवतं भारतानं युद्ध जिंकलं होतं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.