लालबागच्या राजाची निर्मितीच एका नवसातून झालीय…

सर्व इच्छा पूर्ण करणारा नवसाचा गणपती म्हणलं कि आपल्या नजरेसमोर येतो तो सर्व महाराष्ट्राचा लाडका. दरवर्षी  दर्शनासाठी लोक लालबागला गर्दी करतात. गणेशोत्सवाच्या दिवसात दररोज सरासरी १५ लाखांहून अधिक लोक लालबागच्या राजाला भेट देतात. लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत रूढ आहे.

लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली तीही मुळ नवसाने !

लालबागच्या राजाची स्थापना होण्यामागे एक मोठा इतिहास आहे. 

मुंबईत दादर आणि परळला लागून असलेला लालबाग परिसर. त्याकाळी मुंबईकरांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे गिरण्या. या परिसरात गिरणी कामगार तसेच लहान मोठे दुकानदार आणि मच्छीमार या भागात राहत होते. १९३२ मध्ये पेरू चाळ बंद झाल्याने मच्छीमार आणि दुकानदाराची कमाई थांबली होती.

सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला. १९३२ मध्ये चाळ बंद करण्यात आली आणि स्थानिक जे मच्छीमार आणि विक्रेते होते, त्यांनी गणपती घेण्याची आणि त्याला त्या जागी बसवण्याची शपथ घेतली.

लालबागचा मच्छिबाजार उघड्यावर बसायचा, तेव्हा तिथल्या कोळीणींनी नवस केला की आम्हाला आमचा मच्छीबाजार बांधून मिळाला, तर त्या जागेत गणपती बसवू.

त्यावेळचे नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉक्टर व्हि. बी कोरगावकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु ए राव, यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्याबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. एकेकाळी पेरू चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात लालबागचा राजा मंडळ १९३४ मध्ये स्थापन करण्यात आले.  त्यांनी एक समिती स्थापन केली, आणि या समितीने १९३४ मध्ये पहिल्यांदा लालबागचा राजा होडी वल्हवनाऱ्या दर्यासारंग च्या रूपात मच्छीमारांच्या वेशात स्थापन झाला!

ह्या मच्छीबाजारातच आता देशभरात पोहोचलेल्या लालबागच्या राजाची मूर्ती बसते, ते ११ दिवस बाजार पूर्णपणे बंद असतो.

हळूहळू लालबागच्या गणपतीच्या वैभवाची चर्चा अगदी लांब लांब पर्यंत पोहोचली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली. हळूहळू लालबागचा गणपतीला एक नवीन नाव आणि ओळख मिळाली ‘लालबागचा राजा’ !. त्याची लोकप्रियता इतकी जास्त आहे की अक्षरश: लालबागच्या गणपतीचा अभिमान कोणत्याही राजापेक्षा कमी नाही.

दरवर्षी भक्तांची प्रचंड गर्दी जमत आहे. काळानुसार लालबागच्या राजाच्या सजावटीचे स्वरूप बदलत आहे मात्र लोकांच्या विश्वासाचे स्वरूप तेच आहे.

१९३४ पासून आतापर्यंत सर्व मूर्तींचे वैशिष्ट म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती आजपर्यंत एकच कुटुंब बनवते.

लालबागच्या राजाची सुमारे वीस फूट उंच गणपतीची मूर्ती हि लालबाग मध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील शिल्पकाराने हे बनवल्या आहेत. गेल्या आठ दशकांपासून लालबागच्या परिसरात राहणारे  कांबळी कुटुंब लालबागचा राजाची मूर्ती बनवत आहेत.

कांबळी कुटुंबातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे ७५ वर्षांचे रत्नाकर कांबळी यांनी हे २० फुटाच्या गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे कौशल्य आपल्या वडिलांकडून शिकले आहे. रत्नाकर कांबळीचे वडील महाराष्ट्रात भटकंती करतांना शिल्पकला करायचे. पण ते इकदा लालबागला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. सध्या या कुटुंबातील तिसरी पिढी हे काम करत आहे.

आज या कुटुंबाच्या कलाकारीशिवाय  लालबागचा राजाच्या दरबारची कल्पनाही करता येणार नाही.

१९४८ ते १९६८ या काळात मंडळाने काही चांगल्या प्रथा सुरू केल्यात त्यापैकीच म्हणजे, मंडळातर्फे व्याख्याने आयोजित केली जातात, ग्रंथालय उपक्रम राबविले जातात.  तसेच नेत्र शिबीर, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर यांसारखी शिबिरे आयोजित केली आहेत. या प्रथा आजतागायात चालू आहेत.

हे हि वाच भिडू :

 

1 Comment
  1. nilesh says

    Wrong information provided. 1934 pasun fakt Kambli kutumbanech nahi tar kiti tari murtikarani lalbaugcha raja ghadvlay.

Leave A Reply

Your email address will not be published.