एक कानाखाली बसली आणि त्यांच नशिब बदललं..

तुम्हाला आवडणारी सासू कोणती ? काय म्हणतां सासू आवडण्याची व्यक्ती आहे का ?

सासू कशी खाष्टचं पाहिजे. सासूला पाहिलं कि सुनेच्या हातातलं पुजेचं ताट तीनवेळा जमिनीवर पडायला हवं. त्याचा आवाज पाच ते सात वेळा घुमायला हवां. कॅमेरा झुम आउट झुम इन व्हायला हवां. सासूचा चेहरा तिन वेळा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जायला हवां. हे सगळं तुमच्या कॅमेरामॅनने साध्य केलच तर उत्तम सासू पडद्यावर साकारता आली अस म्हणायला हरकत नाही.

आत्ता विचार करा इतकं सगळं तंत्रज्ञानाचं जाळ पसरलेलं नसताना,

ललिता पवार यांनी सासू म्हणून आपली खतरनाक ओळख कशी निर्माण केली असेल. 

ललिता पवार, मराठी आणि हिंदी सिनेमातलं एक नावाजलेलं नाव. त्यांचा आवाज ऐकला की आजही अनेक सुनबाईंना भितीची धडकी भरते. ललिता पवार यांचा जन्म झाला १९१६ साली. दोन वर्षांपुर्वी त्यांच्या जन्मशताब्दी देखील झाली. कुणी फारशी दखल घेतली नाही, ती गोष्ट वेगळी. पण त्यामुळे सिनेमातलं ललिता पवारांच नाव थोडीच विस्मृतीत जाणार आहे. 

ललिता पवार यांची एक अजरामर स्टाईल होती. ती म्हणजे त्यांच्या डोळ्याची. एक डोळा बारीक करुन त्या सुनेला शिव्यांची राखरांगोळी वहायला लागल्या की समस्त थिटरात पिन ड्राप सायलन्स निर्माण होत असे. त्यांचा डोळा हि त्यांची खासियत होती. एखाद्या नटीची भिती वाटू शकते हे ललिता पवारांनी आपल्याला अर्थात सुनबाईंना शिकवलं.

या डोळ्यामागची कथा तुम्हाला माहित आहे का ?

सन १९४२ साली अलबेला फेम मास्टर भगवान यांच्यासोबत त्या एक चित्रपट करत होत्या. 

मास्टर भगवान त्यांच्या कानाखाली मारतात असा तो सीन होता. मास्टर भगवान यांनी पोझिशन घेतली आणि ललिता पवार यांच्या कानाखाली जोरदार थप्पड मारली. याच थप्पडचा मार त्यांच्या डोळ्यावर लागला व त्यांचा डोळा तिरपा झाल्याचं सांगितलं जातं. या घटनेनंतर हिरोईन होण्याचं त्यांच स्वप्न भंगल अस वाटत असतानाच. त्याच डोळ्याने त्यांना एक वेगळीच शैली मिळवून दिली. 

एकदम कडक स्वभावाची सासू ते राजकपूरला आईच्या प्रेमानं जेवू घालणारी केळीवाली असे कित्येक रोल त्यांनी यशस्वीपणे निभावले. राजा हरिश्चंद या सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. राजकपुर आणि त्यांचे संबध इतके चांगले होते की, राजकपुर यांच्या RK स्टुडिओचं उद्धाटन देखील त्यांनीच केलं होतं.मात्र येवढं सगळं असताना त्या अजरामर राहिल्या त्या त्यांच्या डोळ्याच्या स्टाईलने. आजही भांडखोर सासू म्हणून त्यांच नाव अनेक सुनबाई अभिमानानं घेतात ते याचमुळे.  

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.