४ पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या प्रियांका गांधींच्या लाडक्या नेत्यानं पक्ष सोडला.

नेतेमंडळी आणि त्यांची पक्षांतर हा रोजचाच विषय झालाय. त्यात निवडणूका म्हंटल्यावर पक्षाने जर तिकिट दिले नाही तर नेतेमंडळी पक्षांतर एक स्ट्रॅटेजी म्हणून वापरतात. आता त्यांना दुसऱ्या पक्षात मान मिळतो ना मिळतो हा वेगळा प्रश्न आहे.

पण, नेत्यांच्या पक्षांतराच्या या खेळानं पक्षांचं मात्र नुकसान होत. त्यात जेव्हापासून केंद्रात भाजपने सत्ता मिळवलीये, तेव्हापासून काँग्रेसला मोठा फटका बसलाय. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी बाहेरचा रस्ता पकडलाय. यात पक्षासोबत पिढ्यानपिढ्या असणाऱ्या घराण्यांचा सुद्धा सामावेश आहे.

यातचं आता आणखी एक नाव जोडलं गेलयं. ते म्हणजे त्रिपाठी घराणं.

गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांच्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे संबंध आता संपले आहेत. कमलापती त्रिपाठी यांचे पणतू ललितेशपती त्रिपाठी यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या ललितेशपती यांनी सर्व पक्षीय पदाचा राजीनामा देत म्हटले की,

पक्षाकडून त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे, यामुळे त्यांनी काँग्रेसला निरोप दिला आहे.

१० सप्टेंबर रोजी जेव्हा उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी लखनऊ दौऱ्यावर आल्या होत्या, तेव्हा ललितेशपती त्रिपाठी प्रियंका गांधीना भेटले. यावेळी त्यांनी आपली खदखद प्रियांका गांधींच्या कानावर घासली. मात्र इतक्या दिवसानंतरही काहीचं फरक दिसून न आल्याने त्रिपाठी यांचा काँग्रेसशी मोहभंग झाला आणि त्रिपाठी कुटुंबाचा अनेक दशकांपासून काँग्रेसशी असलेला संबंध ललितेश यांच्या राजीनाम्याने कायमचा तूटला.

काँग्रेस सोडल्यानंतर ललितेश समाजवादी पक्षात सामील होतील अशी अटकळ बांधली जात होती, परंतु त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात सामील होण्याचा विचार केला नसल्याचे सांगितले. ललितेश म्हणाले कि, ‘मी लहानपणापासून काँग्रेशिवाय कुठलीच विचारधारा पाहिली नाहीये, ना त्यांच्याबद्दल विचार केलाय. हे कोणत्या कुत्र्यासारखं नाही कि, आज ही विचारधारा आणि उद्या दुसरी विचारधारा. माझ्या मनात आणि आता आणि मला वाटत या देशाच्या आत्म्यात काँग्रेस आहे. सोबतच ते पुढे म्हणाले कि,

‘सध्या कोणत्याही पक्षात सामील होण्यास प्राधान्य नाही. भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी ते आपल्या लोकांशी बोलतील. आमच्या कामगारांसोबत बैठक घेऊन यावर चर्चा केली जाईल.’

खरं तर, इंदिरा गांधींच्या काळात ललितेशपती त्रिपाठी यांचा उत्तर प्रदेशात दबदबा असायचा. ललितेशचे पणजोबा कमलापती त्रिपाठी १९७१ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सुमारे अडीच वर्षे या पदाचा कार्यभार पाहिला. १९७३, १९७८, १९८०, १९८५ आणि १९८६ मध्ये काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार झाले.  यूपीच्या सीएमपासून ते केंद्र सरकारमधील मंत्र्यापर्यंत त्यांनी बाजी मारली होती. पूर्व उत्तर प्रदेशात ते कॉंग्रेसचा ब्राह्मण चेहरा मानले जात होते. 

त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा मायापती त्रिपाठी यांनी काँग्रेससाठी काम केले. उत्तर प्रदेशात  काँग्रेसची घसरण होत असताना मायापती  यांनी अखिल भारतीय किसान मजदूर वाहिनीची स्थानापा केली. पण कॉग्रेसची साथ सोडली नाही. यानंतर राजेश पती त्रिपाठी यांनीही कॉग्रेसमध्ये काम केले. त्रिपाठी घराण्याचा हा राजकीय वारसा ललितेश त्रिपाठी यांनी सांभाळला होता आणि आता त्यांचा काँग्रेसचा मोहभंग झाला आहे

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ललितेशपती त्रिपाठी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाला पूर्वांचलमध्ये मोठा धक्का बसला आहे. ते २०१३ ते २०१७ पर्यंत मिर्झापूरच्या मदिहान विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढवली होती, पण ती जिंकू शकली नाही. ते काँग्रेसकडून उत्तर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते, परंतु अखेर त्यांनी राजीनामा दिला होता.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.