भल्याभल्यांना पुरून उरणाऱ्या लालू यादवांना चक्क एकदा भुताने छळलं होतं

बिहारचं राजकारण म्हणलं कि आधी डोळ्यासमोर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव येतात. बिहारच्या राजकारणात चांगलेच वावरणारे, भल्याभल्यांना पुरून उरणारे लालू प्रसाद यादव यांच्या आयुष्यात अनेक भले, बुरे प्रसंग आलेत. पण एक प्रसंग असा होता त्याला वाईट म्हणावं कि काय म्हणावं आता ते तुम्हीच ठरवा.

त्यांच्या आयुष्यात त्यांना अशा एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते कि, तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल.

त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना त्यांनी स्वतः त्यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या ‘गोपालगंज से रायसीना’ या पुस्तकात सांगितले आहे.

भल्याभल्यांना चीतपट करणारे लालू एकदा भुताला घाबरले होते, ऐकून नवल वाटलं असेल पण एकदा खरंच त्यांच्यासोबत असा एक एक किस्सा घडलेला…हा किस्सा त्यांच्या बालपणातील आहे. लालू यादव यांचे बालपण गावातच गेले. त्यांच्या वयाच्या इतर मुलांसोबत ते खूप मस्ती करायचे.

लालूंच्या यांच्या सांगण्यानुसार, उन्हाळ्याच्या काळात गावात भोजपुरी लोकं प्रेमकथा गात असत. गावातील माणसे आणि मुले मन लावून ते ऐकत असत. त्यांच्या गावातील एक वयस्कर काका हे गाणे म्हणायचे. रात्रीचे जेवण झाल्यावर लोकं इथे बसून मजा लुटत, एन्जॉय करत असायचे.

लालू देखील अनेकदा हे गाणे ऐकण्यासाठी जात असत. पण एकदा असे काही घडले की, जे त्यांच्या आठवणीत कायमचे कोरले गेले. सोर्थी बिर्जभर म्हणजेच हे गाणे हे ऐकत असताना लालू यादव यांना झोप लागली. ते तिथेच जमलेल्या भाताच्या पेंढ्याच्या ढिगाऱ्यावर झोपले होते.

त्या म्हाताऱ्या काकांचे गाणे कधी संपले आणि लोकं आपापल्या घरी कधी निघून गेले हे लालूंना कळलेच नाही.

अचानक मध्यरात्री लालूंना दोन मुलांनी येऊन झोपेतून उठवले आणि आमच्या सोबत चल म्हणून लालूंना पुढे घेऊन चालायला लागले. लालूं नेमके झोपतेच होते, पेंगत पेंगत चालत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, लालू खूप झोपेत होते त्यामुळे ते त्या मुलांना ओळखू शकले नव्हते, ती दोन मुलं त्यांना स्मशानभूमीकडे नेत होते, तेवढ्यात लालू लघुशंकेसाठी थांबले. तोपर्यंतहि त्यांनी त्या दोन मुलांचे चेहरे पाहिले नव्हते. तेवढ्यात त्या रस्त्यावरून गावातले एक म्हातारे आजोबा जात होते, ज्यांना गावात तपेसर बाबा म्हणत असायचे.

त्या दोन मुलांना ते म्हातारे काका येतांना दिसताच ते दोन्ही मुले पळून गेली आणि दिसेनाशी झालीत. त्यानंतर अर्धवट झोपेतले लालू आपल्या घरी परतले.

दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर त्यांनी आपल्या गावातल्या मित्रांना विचारले की ते रात्री कुठे घेऊन जात होते ? पण त्यांच्या प्रत्येक मित्रांनी उत्तर दिलं कि,

आम्ही तर आमच्या घरी जाऊन झोपून गेलेलो.

मित्रांचे उत्तरे ऐकून लालू तपेसर बाबांच्या घरी गेले आणि त्यांना रात्री काय झालं? ते कुणासोबत चालत होते त्याबद्दल बद्दल विचारलं.

तेंव्हा तपेसर बाबा म्हणाले, ते तर रात्री कुठेही बाहेर निघाले नव्हते. आता मात्र लालू यांना मात्र काही सुचेना, दरारून घाम फुटला. आपल्यासोबत आपलं कुणीच नव्हतं तर मग ती दोन मुले कोण होती ? ज्यांची चेहरे मी पाहिले नव्हते. बरं तो आलेला तिसरा व्यक्ती कोण होता ज्याच्यामुळे ती दोन मुलं माझा पिच्छा सोडून पळून गेली ? हे सगळे त्यांना भीतीदायक वाटत होते.

शेवटी ते हे सगळे प्रश्न घेऊन ते त्यांच्या आईकडे आले. काल रात्री झालेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. झालेलं सगळं सांगितल्यावर त्यांच्या आईला सगळी कल्पना आली. त्या म्हणाल्या,

‘तुझ्या मित्र म्हणून आलेली मुलं भूत असावीत आणि तपेसर बाबाच्या रूपाने काही चांगल्या आत्म्याने तुला त्या भुतांपासून वाचवले असावं.’

लालू यादव यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी गावकऱ्यांनी एक छोटेसे प्रार्थनास्थळ बनवले होते. तेंव्हापासून लालू प्रसाद जेंव्हाही त्यांच्या गावी जातात तेव्हा तिथे पोहोचल्यावर ते त्या मंदिरात डोके टेकवूनच येतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.