लालूंमुळेच प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाला फुल स्टॉप लागलाय

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर नेहमीच चर्चेचा विषय असतात. काही दिवसांपूर्वी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांना महत्त्वाची भूमिका दिली जाणार  अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशावर जी २२ गटाने व्यक्त केलेली नाराजी आणि त्यावरून काँग्रेस विरोधी सुरू झालेला रोष  त्यामुळे पक्षांतर्गत वेगळेच राजकारण सुरू झालं होतं.  त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चा बंद झाल्या.

त्यानंतर अलीकडेच त्यांच्या पंजाब काँग्रेसमधील प्रवेशाबाबत जोरदार भाषणबाजी झाली. म्हणजे सरळरित्या  पक्ष प्रवेश होत नाही तर इकडून-तिकडून हालचाल करून का होईना, पण  पक्षाशी जोडलं जावं असाचं  काहीसा प्लॅन.

 तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले होते की, त्यांना एआयसीसीचे पंजाब प्रभारी हरीश चौधरी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांना निवडणुकीची रणनीती बनवण्याची जबाबदारी देण्यात यावी, असा सल्ला दिला होता.

त्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलं की, प्रशांत किशोर यांच्याबाबतचा निर्णय हायकमांडकडून घेतला जाईल.

आता पंजाब काँग्रेसच्या मदतीने का होईना पण  प्रशांत किशोर यांना काँग्रेसची जोडले जाण्याची ही रणनीती याआधीही आखली गेली होती.

म्हणजे यंदाच्याचं मार्च महिन्यात पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर हे त्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काँग्रेसमध्ये सामील झाल्याची घोषणा केली होती. आपल्या या कामासाठी प्रशांत किशोर यांनी १ रुपया मानधन  घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

मात्र, महिन्याभरातचं म्हणजेच ऑगस्टमध्ये प्रशांत किशोर यांनी पदाचा राजीनामा दिला होता.  त्यामुळे त्या वेळीही प्रशांत किशोर यांचा काँग्रेस  प्रवेश अडला.

या दरम्यान, आता नवीन चर्चांना उधाण आलंय की,  प्रशांत किशोरांच्या काँग्रेस प्रवेशावर लालूप्रसाद यादव यांच्यामुळे फूलस्टॉप लागलाय. 

एका वृत्तसंस्थेच्या डिबेट दरम्यान म्हंटलं गेलं की, प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये फ्री हँड हवा होता, पण लालू यादवांना ते कसं मान्य असेल बरं, कारण त्यांना आपल्या मुलाच्या अर्थात तेजस्वी यांच्या नेतृत्वाला कोणतेही आव्हान द्यायचं नाहीये.

 आता काँग्रेसला सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकणं भाग आहे. कारण लालू  प्रसाद यादव बिहारमधील यूपीए सरकारचा कोणत्याही काँग्रेस नेत्यापेक्षा जास्त बचाव करू शकतात.  अशा स्थितीत लालू यादव यांनी प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेस हायकमांडला फारशी अनुकूल प्रतिक्रिया पाठवली नाही आणि बिहारमधील काँग्रेस राजदला नाराज करायचं नाहीये.  त्यामुळेच काँग्रेसने प्रशांत यांचा प्रवेश पुढे ढकलला असल्याचे बोलले जात आहे.  

यासोबतच प्रशांत किशोर यांची अस्थिरता सुद्धा  पक्षात प्रवेशाचा मोठा अडसर असल्याचे बोलले जातयं. कारण त्यांना कोणतााही थेट राजकीय अनुभव नाही, एकदा ते पंतप्रधान मोदींसाठी निवडणूक पाहतात, नंतर नितीशकुमारांकडे जातात, तिथे होत नाही तर तामिळनाडूमध्ये एमके स्टॅलिनसोबक कान करतात. नुकताच  त्यांनी  पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनिती आखली. आता शरद पवार आणि अखिलेश यांच्याशी बोलत आहेत. 

हो आता त्यांचा हा व्यावसायिक करार आहे, ज्याला ते आपल्या राजकीय अनुभव म्ह्णून जोडत आहेत.  त्यांच्यात वैचारिक सातत्य नाही. त्यामुळे हायकमांड सोबतच काँग्रेसमधल्या नेतेमंडळींना सुद्धा त्यांच्या भूमिकेवर डाउट १०० टक्के आहे. 

या सगळ्याच गोष्टींमुळे काँग्रेस हायकमांडला प्रशांत किशोर यांना पक्ष प्रवेश देऊन कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.