लालूंनी अडवाणींना धमकी दिली, “तुमची रथयात्रा बिहारमध्ये कशी येते हे बघतोच !”

१९९० ची गोष्ट. राममंदिरच्या मुद्द्याने अख्खा देश पेटला होता. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा रथ अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुसाट सुटला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा जिथे जाईल तिथे त्यांचे जंगी स्वागत होत होते.

भाजपाचा हा अश्वमेध कोण रोखणार यामुळे सगळे विरोधक भांबावले होते. अखेर ते शिवधनुष्य उचललं बिहारचे तेव्हाचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी. एकदा दिल्लीमध्ये भेट लालकृष्ण अडवाणी यांची भेट झाली तेव्हा लालू त्यांना म्हणाले होते,

“आप दंगा फैलाने वाला यात्रा निकालेंगे तो हम चूप नही बैठेंगे. बहोत परिश्रमसे हमने बिहारमै भाईचारा कायम किया है. अगर आप ये दंगा फैलाने वाला यात्रा निकालेंगे तो हम छोडेंगे नही. “

लालकृष्ण अडवाणी तेव्हा खूप आत्मविश्वासात होते. त्यांनी लालून स्पष्ट सांगितलं,

“देखता हू की कौन माई का दुध पिया है जो मेरा रथ रोकेगा.”

लालू कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी आपल्या बिहारी भाषेत त्यांना उत्तर दिलं,

“मैने मां और भैंस दोनोंका दुध पिया है. आईये बिहार मै बताता हुं.”

नुकत्याच आलेल्या ‘गोपालगंज टू रायसीना’ या आपल्या आत्मचरित्रात लालूप्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवानींचा रथ कसा अडवला याचा किस्सा सांगितलं आहे. ते म्हणतात,

लोक मला विचारत असतात कि तुम्ही लालकृष्ण अडवाणींना अटक का केली?????  तर उत्तर  साध आहे देश वाचवायला.

लालकृष्ण अडवाणींची रथ यात्रा जेव्हा बिहारमध्ये आली तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते, एक की त्याना सन्मानाने जाऊ देणे आणि दुसरा म्हणजे केंद्रातल्या जनतादलाच्या व्हीपी सिंगच्या सरकारची आहुती देणं. यात मी विकल्प निवडला देश वाचवण्याचा ! कारण भारतातील लोक जेव्हा देशाचा इतिहास वाचतील तेव्हा म्हणतील,

” लालूने केंद्रातील सरकार न वाचवता देश आणि संविधान वाचवल”

सोमनाथ ते अयोध्या जाणारी हि यात्रा मंडल शिफारशी ला प्रतिक्रिया म्हणून पुढे आली  “मंडल विरोधात कमंडल” अशी  घोषणाच यात होती जर का अडवाणीजींचा रथ बिहारमध्ये आला असता तर सांप्रदायिक हालचाली वाढल्या असत्या. यामुळे तो रथ थांबवण जास्त गरजेचं होत. मग मी नियोजन केल.

अडवाणी आपले साथीदार हावडा रेल्वेने पाटण्याला येणार होते. लालूंनी अडवाणीना दिलेल्या धमकीमुळे भरपूर मिडिया देखील त्यांच्यासोबत पाटण्याला येणार होती. ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर जशी प्रवेश करेल तशी अटक करायची असं ठरल होतं. पण दुर्दैवाने ही योजना लिक झाली आणि काम फसल.

आता माझ्या लक्षात आलं की फार काळजीपूर्वक योजना करावी लागणार आणि त्यात फारच थोड्या लोकांना सामील करावे लागेल.

पाटण्यात अडवाणी ज्या गेस्ट हाऊस मध्ये राहत होते तिथे अटक करायची असा फायनल झाल. तोपर्यंत अडवाणी समस्तीपूरला जाऊन पोहचले. तिथं सर्किट हाऊस मध्ये राहण्याचा त्यांचा इरादा होता.

आदल्या रात्री मी स्वत:वर नियंत्रण ठेऊ शकलो नाही. मी रात्री सुमारे २ वाजता सर्किट हाऊस मध्ये फोन केला.फोन कर्मचाऱ्याने उचलला त्याला कोण बोलताय हे कळू नये यासाठी मी मैथिली भाषेत स्थानिक वृत्तपत्राचा रिपोर्टर गोनू झा बोलतो आहे अस खोटच सांगितल. त्याला विश्वास बसला असावा. अडवाणी बद्दल विचारले असता त्याने सांगितले की ते झोपी गेले आहेत . त्यांचे समर्थकहि गेले आहेत याची त्याने पुष्टी केली. मला हीच खात्री करायची होती की जेव्हा पोलीस त्याच्या अटके साठी जातील तेव्हा गर्दीचा सामना करायला लागू नये

लालकृष्ण अडवाणी सोबत असणाऱ्या  मीडियाने एक दिलासा, कि त्यांनी  रात्री पाटण्यात  राहण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही मीडिया वाले मला भेटलेही. त्यापैकी काहीजण अडवाणी आणि भाजपच्या जवळ होते पण मी त्यांना  सांगितले ,

” माझा अडवाणींना अटक करण्याचा कोणताही हेतू नाही.”

पुढच्या दिवशी लालकृष्ण अडवाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मसनजोर गेस्ट हाऊसमध्ये पोहचले. तेव्हा मी त्यांना फोन केला आणि सांगितलं,

“सर तुम्हाला अटक करणं  गरजेच आहे. कृपया, माझ्याबद्दल मनात कसलाही राग धरू नका. डॉक्टर,कुक आणि इतर सर्व सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत .”

ते  मसनजोर गेस्ट हाऊसमध्ये बऱ्याच काळापर्यंत होते. जेव्हा मी जेव्हा त्यांना  भेटायला गेलो  तेव्हा मी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला . मी गाडी ऐवजी सरकारी हेलिकॉप्टर वापरा असा आग्रह धरला. जरी मी त्यांचा राजकीय  विचारधारेच्या विरोधात असलो तरी आम्ही शत्रू नाही .

हे ही वाच भिडू.