जीत उसीको मिलेगी जो उसे सबसे ज्यादा चाहेगा- जस्टीन लँगर

द टेस्ट: अ न्यू इरा फॉर ऑस्ट्रेलियाज टीम ही  डॉक्युमेंटरी म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमच्या नव्याने घडण्याची गोष्ट. सँडपेपर कांडानंतर या डॉक्युमेंटरीची सुरुवात होते.

सँडपेपर कांड म्हणजे काय ते बघू.

आफ्रिका ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी  कॅमेरात दिसून आले की बँक्रॉफ्ट सँड पेपरने बॉल घासत आहे. लेहमनने हॅन्डस्कॉम्बला (12 नंबर) पाणी घेऊन पाठवलं आणि बँक्रॉफ्टला सावध केलं.

बँक्रॉफ्टने लगेच सँडपेपर चड्डीत लपवला हे पण कॅमेऱ्यात दिसून आलं.

नंतर कळलं की हे सगळं स्मिथ,वॉर्नर आणि लेहमनच्या प्लॅननुसार झालं. तीन खेळाडूवर बंदी आली. लेहमनने हात झटकले.

शेवटी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाने पत्रकार परिषद घेतली आणि मग लेहमनने राजीनामा दिला.

तसा लेहमन सस्त्यात सुटला.

आता येऊ सँड पेपरकडे. सगळा मीडिया, माजी क्रिकेटर यांनी हेच नाव वापरून चर्चा केली. पण तो पिवळा सँडपेपर न्हवता.

ती पिवळी चिकटपट्टी होती जी बॅटची ग्रीप पात्याच्या तोंडावर चिकटवण्यासाठी वापरली जाते.

तिचा अजून महत्वाचा उपयोग म्हणजे ग्राउंडवर येताना त्या चिकटपट्टीला वाळू चिकटवून आणायची आणि तिने बॉलची एक बाजू सतत घासत राहायचे असे केल्यावर नवा बॉल पण 30 -35 ओव्हर झाल्या की रिवर्स स्विंग होतो.

आता ही टेप प्रत्येक क्रिकेटरच्या किटबॅगमध्ये असते. दरवेळेला अशी टेपची चौकशी करायची म्हणजे अनेक क्रिकेटरना ‘मनस्ताप’ भोगावा लागला असता म्हणून तो सँडपेपरच आहे हे सगळ्यांनी न सांगता मान्य केलं.

आफ्रिकेचा एक माजी बॉलर म्हणायचा की

ऑस्ट्रेलियन बॉलर  25-30 ओव्हर झाल्याकीच बॉल रिवर्स स्विंग करतात यात काहीतरी घोळ आहे.

पण त्याचे कुणी ऐकले नाही. शेवटी ऑस्ट्रेलिया आफ्रिका दौऱ्यावर आल्यावर त्या आफ्रिकन बॉलरने ब्रॉडकस्टर्सशी बोलून काही कॅमेरे फक्त आणि फक्त बॉलवर सेट केले.

आणि लेहमन अँड कंपनी रंगेहात सापडली.

सगळे जग तेव्हा स्मिथ, वॉर्नर, बँक्रोफ्टवर तुटून पडलेलं. जे देश ऑस्ट्रेलियाला मैदानात हरवू शकत नाहीत त्या देशांच्या मीडियाच्या जिभेवर तर मरीआई नाचत होती.

या  कांडामुळे ऑस्ट्रेलियन मीडिया आणि क्रिकेट रसिकदेखील संतापले. आयसीसीने चालू टेस्टमधून तीन प्लेयरला निलंबित केले आणि पुढची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

पण याअगोदरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संबंधित खेळाडूंना वर्षभरासाठी निलंबित केलं.

ऑस्ट्रेलियात एकूणच स्पोर्ट्स कल्चर आणि क्रिकेटची लोकप्रियता इतकी आहे की ऑस्ट्रेलियन कॅप्टन हा पंतप्रधानंतर देशातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे हे सगळं झालं.

यानंतर स्मिथ, वॉर्नरची पत्रकार परिषद आख्या जगाने बघितली. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे

जस्टीन लँगरची कोच आणि निवड समितीचा प्रमुख म्हणून निवड.

लँगरला कामाचे पूर्ण स्वातंत्र्य होतं. दिमतीला हवे तेव्हा हॅडीन, पंटर पॉंटिंग, हेडन, हस्सी, गिलख्रिस्ट, स्टीव्ह वॉ अशी ग्रेट लोकं होती. (श्रीराम नावाच्या भारतीय स्पिन कोचचा पण यात समावेश होता)

जस्टीन लँगरला ज्या लोकांनी खेळताना बघितलं आहे त्यांना लक्षात येईल की त्याची कोच/सिलेक्टर म्हणून का निवड करण्यात आली.

जेव्हा ऑस्ट्रेलियन टीम ऐन भरात होती त्या काळात तो 5/6वर्षे ऑस्ट्रेलियाचा टेस्ट ओपनर होता.

तसे म्हणायला गेलं तर हेडन, वॉ,पँटिंग, बेव्हन, मार्टिन, वॉर्न, मॅकग्रा, गिलेस्पि या सुपरस्टार समोर झाकोळून गेलेला म्हणलं तर हेडन सोबत कसोटीत 5000 पेक्षा अधिक धावांची ओपनिंग पार्टनरशिपचा रेकॉर्ड करणारा.

ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक सर्किटमध्ये सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड पण त्याच्या नावावर आहे.

एकूण लँगर त्याच्या फायटिंग स्पिरीटसाठी प्रसिद्ध होता.

लँगरसमोर सर्वात मोठं आव्हान होते ते म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमची इमेज सुधारणे. ऑस्ट्रेलियन स्पिरिट, विनिंग ऍट एनी कॉस्ट ऍटिट्युडमुळेच स्मिथ आणि त्याचे सहकारी इथपर्यन्त पोहचले होते.

ऑस्ट्रेलियाची टीम म्हणजे सगळ्या क्रिकेट जगाने हेवा करावी अशी टीम होती.

प्रत्येकाचे स्वप्न होते की आपली टीम तशी व्हायला पाहिजे. आपला आताचा कॅप्टन किंग कोहली टिनएजमध्ये असताना ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ चालू होता. त्याच्यावरील ऑस्ट्रेलियाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो.

कोहली इज मोअर ऑस्ट्रेलियन दॅन एनी ऑस्ट्रेलियन

हे डॉक्युमेंटरीमधले ऑस्ट्रेलियन व्यक्तीच्या तोंडचं वाक्य कोहलीचे वर्णन करण्यास पुरेसे आहे.

ज्या कसोटी टीममध्ये गिलख्रिस्ट सातव्या नंबरला बॅटिंगला यायचा त्या टीमचा दर्जा काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

पण सँडपेपर कांडामुळे हे सगळं धुळीला मिळालं.

कोच झाल्या झाल्या लँगरने निश्चित केलं की आपण आपलं मूळ ऑस्ट्रेलियन स्पिरिट नाही सोडणार.

“Banter is OK abuse is not”

हा लँगरचा मंत्र होता. लोकांना तुम्ही आवडला पाहिजे याच्याशी मला देणं घेणं नाही. पण लोकांनी तुमचा, तुमच्या खेळाचा आदर केला पाहिजे असा खेळ तुमच्याकडून घडवून आणणे ही जबाबदारी माझी ही लँगरची स्पष्ट भूमिका.

SAVE 20200424 142228

पुढे कुणाला फारसा माहीत नसलेल्या टीम पेनची कॅप्टनपदी निवड झाली.

ऑस्ट्रेलियाची टीम ट्रान्झिशनच्या फेजमधून जात होती. या अठरा महिन्याच्या कालावधीतच टीम पेन, ऍरोन फिंच, मॅथ्यू वेड, लॅब्युशेन, स्टोनिस, हेड, कोल्टर निल,इ. खेळाडू घडले.

याकाळात  लँगरला प्रामुख्याने बॅटिंग आणि संघाची मेंटेलिटीवरच जास्त  काम करावं लागलं कारण तोपर्यंत स्टार्क, हेझलवूड, कमिन्स हे बॉलर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले सेट झाले होते.

तिघांपैकी दोघे तरी क्लिक व्हायचे उरलेसुरले काम नॅथन लायन करायचा.

6-4-1 हा रुल लँगरने वापरला. 6 दर्जेदार बॅट्समन, 4 दर्जेदार बॉलर आणि एक चांगला विकेटकीपर जो हिटिंग करू शकतो. हे 6 बॅट्समन घडवण्याचे काम लँगरने केलं आहे.

या काळात भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला हरवले. ऑस्ट्रेलियाने भारतात वनडे सिरीज जिंकली तीपण 2-0 असे पिछाडीवर असताना. वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये पोहचली.

सोने पे सुहागा म्हणजे ऍशेस ऑस्ट्रेलियाने राखली.

ऍशेस सिरीज सुरू होण्याअगोदर टीम मिटिंगमध्ये लँगरने सांगितलेलं कि

जीत उसीको मिलेगी जो सबसे ज्यादा उसे चाहेगा.

( डॉक्युमेंटरी इंग्लिश मधेच आहे त्याचा हा बॉलिवूड तर्जुमाँ) या डॉक्युमेंटरीमधील सर्वात बेस्ट क्षण म्हणजे कोहली-पुजाराची बॅटिंग, ऍशेसमधील स्मिथ-बेन स्टोक्सची बॅटिंग, हेझलवूड- स्टार्क-लायनचे काही अविस्मरणीय स्पेल,इ.

मे 2019 मध्ये स्मिथ, वॉर्नर, बँक्रॉफ्ट टीममध्ये परतले.

वॉर्नरने पुनरागमच्या पहिल्या मॅचमध्ये सेंच्युरी मारली. स्मिथने लौकिकाला जागत ऍशेस गाजवली. या डॉक्युमेंटरी मधले माझे आवडते दोनच क्षण होते ते म्हणजे कोहली बॅटिंग करत असताना लँगरला हेल्पलेस बघणे,

लँगरच्या तोंडून किंग कोहलीचे कौतुक ऐकणे.

कारण लहानपणी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना बघणाराला पण हेल्पलेस वाटायचं. ग्रेट ऑस्ट्रेलियन टीममधील एकाला तरी तसे हेल्पलेस बघणे हे लय भारीय.

त्यासाठी किंग कोहलीला लाख लाख धन्यवाद (कलेजा ठंडा पड गया मेरा)

दुसरा क्षण होता स्मिथला मिळलेली स्टँडिंग ओवेशन.

ऍशेसच्या पहिल्या कसोटीत एजबस्टनमध्ये लोकांनी चिटर चिटर म्हणून गोंधळ घातला. पण स्मिथ समाधी लागल्यागत बॅटिंग करत होता. हाच फॉर्म त्याने पूर्ण सिरीजमध्ये कायम ठेवला आणि तो सध्याचा सर्वश्रेष्ठ कसोटी बॅट्समन आहे हे त्याने सिद्ध केलं.

कसोटीमध्ये स्मिथ कोहलीपेक्षा काकणभर सरस आहे हे निश्चित.

(सध्याच्या काळात कोहली वनडे मधील सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे) ऍशेस सिरीजच्या शेवटच्या कसोटीत मात्र ब्रिटिशांनी स्मिथचा ग्रेटनेस मान्य करून त्याला स्टँडिंग ओवेशन दिली. स्मिथने चार कसोटीत 774 रन्स कुटल्या.

ही ऍशेस स्मिथची रिडेम्शन सिरीज म्हणून ओळखली जाणार हे निश्चित.

या व्यतिरिक्त ह्या डॉक्युमेंटरीमध्ये खूप काही आहे.  खेळाडूचे ड्रेसिंग रूममधील वागणं, खेळाडूच्या कुटुंबियांची भूमिका, खेळाडूमधले गट तट, टीम निवड करण्यातील अडचणी, कोचचा रोल इ.इ. लँगर 2022 पर्यंत ऑस्ट्रेलियाचा कोच असेल.

जर याचप्रकारे ऑस्ट्रेलिया खेळत राहिली तर ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ परत येईल आणि याचे श्रेय नक्कीच लँगरला जाईल.

  • अजित देशमुख

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Amar says

    Bahot khub likhe ho👌

Leave A Reply

Your email address will not be published.