पहिल्या पिक्चरमध्ये राम आणि सिता एकच होते.

एका तिकीटात डब्बल मज्जा देणारे सिनेमे म्हणून डब्बल रोल असणाऱ्या सिनेमांकड पाहिलं जातं. ‘गोपी किशन’ सिनेमातला ‘मैरे दो-दो बाप’ म्हणणारा मुलगा आठवला की डब्बल मज्जेचा नेमका अर्थ स्पष्ट होईल. तर याच डब्बल रोलची मज्जा देणाऱ्या सिनेमांची सुरवात करण्याचं श्रेय देखील दादासाहेब फाळकेंनाच दिलं जातं.

दादासाहेब फाळकेंचा राजा हरिश्चंद्र हा सिनेमा १९१३ साली रिलीज झाला होता. ‘राजा हरिश्चंद्र’ नंतरचा पुढचा प्रोजेक्ट म्हणून फाळकेंनी ‘लंका दहन’ फिल्म करायचं ठरवलं होतं. रामायणातील लंका दहनाचा प्रसंगावर हा सिनेमा आधारित होता. सिनेमातील सीतेचा रोल करण्यासाठी एक स्त्री कलाकारच घ्यावी अस दादासाहेबांच मत होतं, पण त्या काळात स्त्रीपात्र मिळणं अशक्य असायचं म्हणून राजा हरिश्चंद्र सिनेमात तारामतीची भूमिका करणाऱ्या अण्णा साळुंखेनाच सीतेची भूमिका करण्यासाठी सांगण्यात आलं.

त्यानंतर दूसरा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे रामाचा रोल कोण करणार ? आण्णा साळुखेंच रुप पाहून रामाचा रोल देखील फाळकेंनी आण्णा साळुंखेनाच दिला.

CHANDRAKANT PUSALKAR

लंका दहन सिनेमा पडद्यावर आला तेव्हा मात्र दादासाहेब फाळकेंना स्वप्नात देखील वाटली नव्हती अशी गोष्ट झाली,  फाळकेंचा लंका दहन बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. हा सिनेमा इतका चालला की सिनेमागृहात साठलेली चिल्लर बैलगाडीतून दादासाहेबांच्या घरी येवू लागली. १९१७ सालात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दहा दिवसात ३५ हजार रुपयांच कलेक्शन केलं होतं. यावरुन लंका दहन सिनेमाच्या लोकप्रियतेचा अंदाज येवू शकतो.

या सिनेमानं कलेक्शन बरोबर अजून एक गोष्ट जन्माला घातली ती म्हणजे सुपरस्टार नावाची. आण्णा साळुंखे हे या सिनेमातून सुपरस्टार झाले. विशेष म्हणजे आण्णा साळुंखे त्या काळचे लोकप्रिय हिरो आणि लोकप्रिय हिरोईन दोन्ही होते. पडद्यावर होणारं राम आणि सीतेचं दर्शन घेण्यासाठी अनेकजण भाविकांप्रमाणे रांगा लावत असत. हे दोन्ही रोल अजरामर करणारं आणि भारतीय सिनेमात पहिला डब्बल रोलच रंगवणारे म्हणून आण्णा साळुंखेचं नाव अभिमानानं घेतलं जातं.

हे ही वाच भिडू –