ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली की हे “मांजर” का चर्चेत येतं..!!!

ब्रिटनच्या पंतप्रधान सॉरी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला. तिथे देखील शिंदे गटासारखी बंडखोरी झाली. पण आपल्यासारखं एकानी राजीनामा दिला आणि दूसरे लगेच आले अस तिथं होतं नाहीए.

आत्ता तिथे पुढचा पंतप्रधान कोण असेल यासाठी राऊंड सुरू आहेत. यातील दोन राऊंड झालेले असून त्यामध्ये ऋषि सुनक सर्वात पुढे आहेत. त्यांच्यासोबत  पेनी मोरडुएंट (Penny Mordaunt), लिज ट्रस (Liz Truss), केमी बाडेनोक (Kemi Badenoch) और टॉम टुगेनडैट (Tom Tugendhat) यांची नावे देखील चर्चेत आहेत. 

पण आत्ता तिथली प्रोसेस काय आहे? तिथला नवीन पंतप्रधान कोण होईल या गोष्टी सांगणारा हा लेख नाही, लेख आहे एका मांजराशी संबंधित.. 

तर मॅटर असा आहे की, ऋषि सुनक यांच्यासोबत लॅरी नावाचं मांजर देखील या रेसमध्ये चर्चेत आहे. बर हे पहिल्यांदा चर्चेत आलेलं नाहीय. जेव्हा जेव्हा ब्रिटीश पंतप्रधानांवर घर सोडण्याची वेळ आली तेव्हा लॅरी मांजर चर्चेत आलय. बर हे नुसतं चर्चेत येत नाही तर यालाच ब्रिटनचं पंतप्रधान करण्यात यावं अस म्हणलं जातं.. 

काय आहे नेमकी भानगड..

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या शासकिय निवासात राहणाऱ्या या मांजराचं नाव आहे लॅरी. गेल्या १२ वर्षांपासून हे मांजर या निवासात असल्याचं सांगण्यात येत. आणि ब्रिटनचे पंतप्रधान टिकून राहत नाहीत त्यासाठी देखील हेच मांजर कारणीभूत असल्याचं बोललं जातं.. 

आत्ता हे मांजर साधय का तर नाही. त्यांच्याकडे पद देखील आहे. चीफ माऊसर अस त्याच्या पदाचं नाव आहे. गळ्यात बो आहे. जेव्हा डेव्हिड कॅमरॉन ब्रिटनचे पंतप्रदान झाले होते तेव्हा पंतप्रधान निवासात उंदरांची संख्या वाढलेली. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजर या साध्या नैसर्गिक नियमामुळे हे मांजर इथं आलं आणि इथच बस्तान मांडून राहिलं. त्याच्या ११ वर्षांच्या काळात डेव्हिड कॅमरून, तेरेसा मे आणि बोरिस जॉन्सन अशा तीन पंतप्रधानांवर राजीनामा देण्याची वेळ आली. जेव्हा हे लोकं पंतप्रधानपदाची विदाई घेत होते तेव्हा देखील हे मांजर तिथेच कुठेतरी घुटमळत होते. 

बर इतक्यावर कारभार उरकतोय का तर नाही, या मांजराच्या नावावर वेगवेगळे विक्रम देखील आहेत. त्यातला एक विक्रम आहे तो म्हणजे सर्वाधिक राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा विक्रम. 

म्हणजे कसय तर हे मांजर तिथल्या मिडीयामध्ये कायम चर्चेत असतं. जेव्हा कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख ब्रिटीश पंतप्रधानांच्या निवासस्थानी जातो तेव्हा या मांजराला भेटतोच. फक्त इथेही एक घोळ आहे तो म्हणजे या मांजरांन डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली नव्हती. का? तर म्हणे हे मांजर तेव्हा झोपलेलं. 

त्यामुळं जेव्हा जेव्हा ब्रिटीश पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा तेव्हा हे मांजर चर्चेत येत. आत्ताही ते चर्चेत आहे. आत्ता तर तिथले माजी खासदार देखील ट्विट करून सांगायला लागलेत की लॅरी जर पंतप्रधान झाला तर तो बोरीस जॉन्सन यांच्यापेक्षा भारी निर्णय घेईल. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.