मलिंगा भारतात देखील तितकाच फेमस होता. त्याचे दोन बॉल आपण कधीच विसरू शकणार नाही..

श्रीलंकेचा घातक गोलंदाज लसिथ मलिंगानं नुकताचं आपली निवृत्ती जाहीर केली. मी माझे टी20 चे शूज काढून ठेवत आहे, असे म्हणतं त्यानं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली.

त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही निवृत्ती जाहीर केली. त्यानं म्हंटलं की,

‘मी माझे शूज काढून ठेवतो आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होतोय!  माझ्या प्रवासात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार, आणि पुढील वर्षांमध्ये युवा क्रिकेटपटूंबरोबर माझा अनुभव शेयर करण्यास उत्सुक आहे.

खरं तर, मलिंगानं या आधीच वन डे आणि टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. तो टी-20 सामन्यात खेळताना दिसत होता मात्र त्याने आज क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेत असल्याचं कळवलं.

दरम्यान, श्रीलंकेच्या या वेगवान गोलंदाजांचे जगभरात चाहते होते. त्याच्या चाहत्यांच्या या यादीत तुम्ही आम्हीचं काय तर दिग्गज खेळाडू सूद्धा होते. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना  आता मलिंगाची ओव्हर आहे, हे समजल्यावर जरा धास्तीचं वाटायची.

आपल्या बॉलिंगच्या जोरावर जगभरातल्या चाहत्यांचे मन जिंकणारा मलिंगा सामान्य कुटुंबातलाचं. श्रीलंकेच्या रथगामा  भागात त्याचा जन्म झाला. वडील बस मॅकेनिक होते.

मलिंगा त्याच्या गावाजवळच्या समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळायचा. आपल्या विचित्र बॉलींगसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगावर श्रीलंकेचे माजी खेळाडू चंपक रामानायके यांची नजर पडली. त्यांनी मलिंगाला क्रिकेट क्लबमध्ये आमंत्रित केले आणि तिथूनचं मलिंगाच्या गोलंदाज बनण्याच्या स्टोरीला सुरुवात झाली.

त्याच्या नावावर आज अनेक रेकॉर्ड्स आहेत. जसे की, वन डे सामन्यात 3 वेळा हॅटट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज, 9 व्या विकेटसाठी अँजेलो मैथ्यूज सोबतचा वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड कपचा इतिहासात दोनदा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा, आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू असे बरेच काही.

पण त्याच्यासारख्या अनोख्या बॉलिंगचा रेकॉर्ड क्वचितच कोणी मोडू शकेल. त्याच्या या बॉलींग स्टाईलसाठी त्याला स्लिंगा मलिंगा” असं नाव पडलं होतं.

त्याच्या रेकॉर्डचे किस्से तर सर्वांनाच ठाऊक आहे, पण असाही एक किस्सा आहे जो तो स्वतः कधीही विसरू शकणार नाही. 

तर तो दिवस होता 2 एप्रिल 2011 चा.  मुंबईतलं वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं होतं. ती वर्ल्ड कपची फायनल मॅच होती. सगळ्यांचे डोळे भारताच्या विजयाची वाट बघत होते. भारतीय खेळाडूंच्या फोर आणि सिक्सर वर प्रेक्षकांचा आवाज उंचावत होता. 

आता भारतात मलिंगाचा चाहता वर्गही मोठा आहे. मात्र, यावेळी मलिंगाच्या दोन बॉलने अख्ख्या स्टेडियममध्ये एकचं  शुकशुकाट झाला. ही शांतता इतकी भयानक होती की, मलिंगाच्या सुद्धा  अंगावर काटा आला होता. 

तर मलिंगाच्या पहिला ओव्हरचा दुसरा बॉल. इकडे भारताकडून सेहवाग बॅटिंग करत होता. लेग स्टंपवर बॉल फ्लिक करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पणं स्कीड झाला आणि पॅडवर येऊन लागला. भारताची पहिली विकेट पडली होती.

श्रीलंकेच्या खेळाडूंचा आनंद काही औरच होता, पण वीरू- वीरू म्हणून ओरडणारी पब्लिक एकदम चिडीचूप झाली.

यानंतर सहाव्या ओव्हरचा पहिला बॉल आणि मलिंगाची तिसरी ओव्हर. इकडे मलिंगाच्या बॉलवर सचिन ड्राइव्ह मारणारचं की, मागे संगकाराने कॅच घेतला आणि सचिन आऊट झाला.

या विकेटमूळे सगळ्यांनाचं धक्का बसला होता. कारण हा सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप सामना होता. त्यामुळे आधीच सगळे नाराज होते. त्यात सेंच्युरीच्या तयारीत आलेला सचिन 14 बॉलात 18 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

मलिंगाच्या या दोन बॉलनं भारतीयांचा चेहरा नाराज केला खरा पण शेवटी मॅच भारतानचं आपल्या खिशात घातली आणि वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 

पण, मलिंगाची बॉलिंग सुद्धा कधीही न विसरण्यासााखी होती हे नक्की.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.