प्युअर आर्य वंशाच्या इच्छेसाठी जर्मनीहून भारतातल्या या गावात मुली रात्र घालवण्याठी येतात

आर्य कोण होते.. बेक्कार झपाटलेला प्रश्न आहे हा.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांनी आर्य लोकांबाबत मांडलेली मते ते हिटलर ने आर्य वंशीय असण्याच्या अभिमानातून केलेले नरसंहार इथपर्यन्त अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला इंटरनेटवर आर्य अस सर्च केल्यानंतर पहायला मिळते. 

अशीच माहिती शोधत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट सापडू शकते ती गोष्ट म्हणजे लडाखमध्ये असणारी आर्यन व्हॅली. तुम्ही आर्यन व्हॅलीची नेमकी भानगड शोधायला गेला तर बरेच लेख, बऱ्याच डॉक्युमेंटरी तुम्हाला पहायला मिळतील. यातली सर्वात चांगली डॉक्युमेंटरी म्हणजे,

द अचतुंग बेबी -इन सर्च ऑफ प्युरिटी.. 

या डॉक्युमेंटरीमध्ये जे दाखवलंय त्याबद्दल आपण बोलूच पण त्यापूर्वी आर्यन व्हॅलीची नेमकी भानगड काय आहे ते सांगतो.. 

लडाखच्या लेह पासून १६३ किलोमीटरच्या अंतरावर धा, हानू, दारचिक, गहानू अशी चार गाव आहे. इथे राहणाऱ्या लोकांना ब्रोगपा किंवा ड्रोगपा म्हणून ओळखलं जातं. 

या लोकांच्या वेगळं काय आहे हे समजून घेण्यासाठी तूम्ही खाली दिलेला फोटो पाहू शकता. 

Screenshot 2022 05 26 at 9.19.08 PM

सर्वसामान्यांपेक्षा अधिक उंची, निळे डोळे, चेहरेपट्टी, गोरा रंग हे सगळं अगदी वेगळं. सौंदर्याबद्दलचे जे सर्वसामान्यांचे निकष असतात त्यात अगदी वरचा नंबर लागणारे हे लोक. हे लोक मुळचे लडाखचे लोकं किंवा जम्मू काश्मिरमध्ये असणाऱ्या लोकांपेक्षाही अधिक वेगळे दिसतात. 

याच लोकांना जगातले एकमेव प्युअर आर्य म्हणले जाते… 

हे लोक कुठून आले याबद्दल ठामपणे कोणालाच सांगता येत नसलं तरी अलेक्झांडरच्या सैन्यासोबत ते गिलगिटमध्ये आले व तिथून हे लडाखच्या या भागात येवून राहिले अस तिथले स्थानिक सांगतात. अलेक्झांडरचे वंशज म्हणवून घेणाऱ्या या लोकांचा असा दावा आहे की जगाच्या पाठीवर तेच एकमेव आर्यवंशीय लोक म्हणून उरले आहेत.. 

चार गावांमध्ये जेमतेम पाच ते सात हजार लोक राहतात. यांच्या चालीरिती, परंपरा देखील वेगळ्या आहेत. त्यामुळेच अनेक अभ्यासक इथे येत असतात. पण मुळातच आर्यच कोण होते, ते होते का नव्हते अशा अनेक गोष्टींवर गृहितकच असल्याने सोबतच प्युअर आर्य लोकांचे जिन्स, DNA उपलब्ध नसल्याने हे खरे आर्य अस सांगणारी कोणतीच फुटपट्टी नाही… 

पण ही गोष्ट इथे संपत नाही तर इथून सुरू होते… 

प्युअर आर्य असण्याच्या या गोष्टीमुळे जगभरातून विशेषत: जर्मनीतून अनेक मुली इथे येतात. एक रात्र इथल्या तरुणांसोबत घालवतात. गर्भवती होतात आणि पुन्हा जर्मनीला जातात. प्युअर आर्य वंश जन्माला घालण्याच्या नादातून या मुली आर्य व्हॅलीत येत असतात. 

द अचतुंग बेबी -इन सर्च ऑफ प्युरिटी.. 

या डॉक्युमेंटरीमध्ये देखील हेच दाखवण्यात आलंय. जर्मनीतील मुलगी इथे येत राहते. आर्य तरुणांसोबत एक रात्र घालवते व त्याचं मुल घेवून ती जाते. इथे असणारे बरेच तरुण जर्मन मुलींसोबत रात्र घालवतात. काहीजण सांगतात की त्या मोबदला देतात. तर काहीजण दिलेला मोबदला कबूल करत नाही. 

पण त्यामुळे इथे आर्य पर्यटन मात्र विकसित झालं आहे. या गावांचा कमाईचा स्त्रोतच हा आहे. 

इथल्या लोकांचा प्रमुख धर्म हा तिबेटियन बौद्धीझम आहे. काही तरुणांनी मुस्लीम धर्माचा देखील स्वीकार केला आहे पण त्यांच्यासाठी त्याहूनही महत्वाचं आहे आपलं आर्य असणं. 

खालील लिंकवर क्लिक करुन या संबंधित काही अजून काही डॉक्युमेंटरी तुम्ही पाहू शकता.

 हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.