लास वेगास मध्ये जावून शास्त्रज्ञांनी केलं कांड…

विचार करा की काही हजार भौतिक शास्त्रज्ञ, संशोधन आणि विद्यार्थी जगाच्या जुगाराच्या राजधानीत एका कॉन्फरन्सला गेले तर काय होईल ? बरोबर !!! तो आठवडा तिथल्या गॅम्बलिंग व्यवसायासाठी सर्वात खराब आठवडा असेल, पण यामागचं कारण तुम्ही नक्कीच विचार करू शकत नाही अस आहे…

 

1986 मध्ये अमेरिकीन फिजिकल सोसायटी (APS) ची वार्षिक सभा सॅन डीएगो येथे घ्यायची ठरली होती , परंतु तेथील हॉटेल अरेंजमेंट्स मध्ये काहीतरी गडबड झाल्यानें अगदी शेवटच्या क्षणी ही मीटिंग लास – वेगासच्या MGM – Grand या हॉटेलमध्ये घ्यायची ठरली.

पण वेगास मधील त्यावेळच्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या हॉटेलसाठी हा आठवडा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात नुकसानकारक ठरला. त्यांना इतकं आर्थिक नुकसान सोसायला लागलं की ती मीटिंग झाल्यानंतर त्यांनी APS ला पुन्हा कधीही आपल्या हॉटेल मध्येच नाही तर लास वेगास मध्येच येऊ नका अशी विनंती केली.

Screen Shot 2018 03 16 at 3.12.03 PM

आता याप्रकारचे बरेच पिक्चर आपण बघितले आहेत, बरेच किस्से आपण ऐकले आहेत, कशी काही हुशार माणसांची टीम काही तरी ट्रिक वापरून अशा कसिनो मधून पैसा कमवतात. त्यामुळे तुमच्या मनात विचार आला असेल की इथे तर अमेरिकेतले सगळ्यात हुशार असे ४००० शास्त्रज्ञ गोळा झाले आहेत त्यामुळे त्यांना मिळून, काही तरी गणिती ट्रिक्स वापरून अशा कसिनो मधून पैसा मिळवायला कितीसा वेळ लागला असता. पण थांबा इथं प्रकरण वेगळंच आहे…

लास वेगासला जगाच्या जुगाराची राजधानी म्हणण्यामागे कारणे पण तशीच आहेत. इथे येणारा प्रत्येक माणूस हा जुगारात आपलं नशीब आजमवायला येत असतो. इथे दरोरोज कोट्यवधी डॉलर कमावले जातात तर अब्जावधी डॉलर गमावले जातात. लोकांना पैसे मिळवून देण्यापेक्षा लोकांच्या खिशातील पैसा काढून घेण्यावरच इथल्या कसिनोचा धंदा सुरू असतो.

त्यामुळे ज्यावेळी एखादी संस्था आपण वेगासमध्ये कॉन्फरनस घेणार अस जाहीर करते त्यावेळी इथल्या सगळ्या हॉटेलमध्ये दरांबाबत जवळपास युद्धच सुरू होते. जेवढे शक्य होईल तेवढ्या कमी दराने अशा कॉन्फरन्स साठी आपलं हॉटेल द्यायचा प्रयत्न सुरू होतो. कधी कधी हे रेट शहरातील साध्या हॉटेलपेक्षा कमी असतात. यामागे कारण एकच असते की, आपल्या हॉटेल मध्ये राहणारी लोक आपल्या हॉटेलच्या कसिनो मध्ये जुगार खेळतील आणि हॉटेल मॅनेजमेंट का नेमकं माहीत आहे की एकदा माणूस जुगाराच्या टेबलला बसला की हॉटेलचा फायदा करूनच उठतो. यामुळेच अशा हॉटेल्समध्ये जुगाराच्या टेबलवर दारू देखील फ्री मध्ये उपलब्ध केली जाते.

Screen Shot 2018 03 16 at 3.23.17 PM

एवढ्या सोयी या ४००० शास्त्रज्ञ ना देण्यामागे पण MGM grand चा देखील हाच उद्देश होता. पण इथं सगळं उलटंच घडलं. आपलं ज्ञान एकमेकांना दाखवण्यात, आपलं प्रेसेंटशन तयार करण्यात एवढे बिझी राहिलें की ते जुगाराच्या टेबलला बसलेच नाहीत. त्यामुळे ज्या जुगारावर या कसिनोचा अर्थव्यवहार अवलंबून असतो तोच जुगार या शास्त्रज्ञांनी खेळलाच नाही. सगळे टेबल आठडाभर मोकळे होते. त्यावेळी त्या कसिनो मधील वेट्रेस ना एका वाक्यात त्या आठवड्याची कथा सांगितली होती, “की ते प्रत्येकजण ईथे एक शर्ट आणि 10 डॉलरची नोट घेऊन आले होते आणि यातलं काहीच त्यांच्याकडून आठवड्याभरात बदलल गेलं नाही.”

बहुतेक लास वेगास मधील कसिनो मध्ये राहून जुगार न खेळणे हीच सर्वात मोठी चाल या शास्त्रज्ञांनी खेळली असेल.

1 Comment
  1. VIGHNESH says

    Actor Ben Aflect( batman) tya sabhela kay karat hota????

Leave A Reply

Your email address will not be published.