“ऐ मेरे वतन के लोगों” हा आवाज कोणाचा ?

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघांनी चंद्रावर पाऊल ठेवलं फरक फक्त इतकाच कि पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने ठेवलं.

पहिलं वाक्य हे असच बोनसं. सध्याचा मुद्दा आहे तो आशा भोसलेंनी लता मंगेशकरांवर केलेली टिप्पणी. इतर वेळी लता मंगेशकर आणि आशा भोसले असणाऱ्या या दोन बहिणींच्या वादाबद्दल चर्चा चालू झाली की ती लता आणि आशा इथपर्यन्तचं चालते हे विशेष.

वादाचं कारण म्हणजे दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत सुधीर गाडगीळांनी त्यांनी विचारलं

“ऐ मेरे वतन के लोगों हे गाणं कुणाचं?”

त्यावर आशा भोसले म्हणाल्या, “काही गोष्टी घेण्यात नाही तर देण्यात आनंद असतो”.

झालं त्यावरुन नेहमीप्रमाणे आशा भोसले ग्रेट की लता मंगेशकर ग्रेट याबद्दल चर्चा झडू लागल्या. लतां मंगेशकरांनी आपल्या आवाजात प्रयोग केले नाहीत. त्या नेहमीच एकाच पठडीतलं गाणी गात राहिल्या इथपासून ते आशा भोसले यांनी कशाप्रकारे वेगवेगळ्या गाण्यांसोबत प्रयोग केले यांसारखे नेहमीप्रमाणे दाखले दिले जावू लागले.

Screen Shot 2018 09 07 at 5.19.44 PM
facebook

मुळात हा असलेला नसलेला वाद पुन्हा वरती येण्याचं कारण म्हणजे “ऐ मेरे वतन के लोगों हे गाणं”. आज ही हे गाणं प्रत्येकांच्या मनात देशप्रेम जागवतं. आत्ता वादाला सुर फुटलेत तर आपण जाणुन घेवुयातच की नक्की काय झालं होतं त्या सुरांच !

“ऐ मेरे वतन के लोगों” गाण्याची आयडिया कोणाची होती !

पहिल्यांदा गायलं गेलं ते दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमच्या कार्यक्रमात. २७ जानेवारी १९६३  ला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १९६२ च्या भारत चीन युद्धाचा मोठ्ठा फटका भारतीयांना बसला होता. हिंदी चिनी भाई भाईचा नारा ओसरुन गेला होता. लक्षात राहिलं होतं ते म्हणजे या युद्धात झालेली जिवीतहानी आणि वित्तहानी.

यातूनच मदर इंडियाचे डायरेक्टर महेबुब खान यांनी भारतीय सैन्याच्या मदतीसाठी फंड आयोजित करण्याच्या कामास लागले होते. त्यातूनच बॉलीवूडमार्फत एक कार्यक्रम आयोजित करुन हा फंड जमा करण्याची संकल्पना महेबुब खान यांनी मांडली होती. या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासोबतच बऱ्याच मोठमोठ्या असामी सहभागी होणार असल्यानं हा कार्यक्रम तितकाच हाय प्रोफाईल होणार होता.

या कार्यक्रमासाठी बॉलीवूडमधल्या फेमस अशा संगीतकारांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

प्रत्येक संगीतकाराने एक गाणं सादर करायचं अस ते नियोजन. या यादीत नौशाद, मदन मोहन, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र यांच्यासारखी मोठ्ठमोठ्ठी नावे होती. प्रत्येकाने आपआपल्या गाण्यासोबत तयारी केली होती मात्र सी. रामचंद्र यांच्याकडं कोणतचं गाणं नव्हतं !

गाण्याच्या शोधात ते गेले प्रसिद्ध कवी प्रदिप यांच्याजवळ. मुळचे मध्यप्रदेशातील असणारे रामचंद्र नारायण द्विवेदी हे कवी प्रदिप या नावाने बरेच फेमस होते. सी. रामचंद्र यांनी त्यांनी गाण लिहून देण्यासाठी विनंती केली. त्यांनी देखील ती मान्य केली पण प्रश्न होता तो गाणं सुचण्याचा !

एक दिवस कवी प्रदिप माहिमच्या बीचवर फिरत होते. सकाळच्या वातावरणात त्यांचा चार ओळी सुचल्या.

त्यांनी आपल्याजवळ सिगरेटचं रिकामं पाकीट घेतलं आणि त्यावर चार ओळी लिहल्या,

ऐ मेरे वतन के लोंगो..

हळुहळु कवी प्रदिप लिहीत गेले. ते जेव्हा घरी आले तेव्हा सिगरेटच्या पाकीटावर शंभर एक ओळी लिहून झाल्या होत्या. त्यांनी लगेच सी. रामचंद्र यांना बोलावून घेतलं. त्यांनी तात्काळ त्या ओळी घेतल्या आणि कामाला लागले.

आत्ता मुद्दा होता तो हे गाणं कोण म्हणणार ?

सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच कुठल्यातरी गोष्टीवरुन खटकलेलं होतं. लता मंगेशकर यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. सी. रामचंद्र यांनी आशा भोसलेंना घेवून प्रॅक्टिस चालू केली. आशा भोसले रोज रिहर्सल करु लागल्या.

अस सांगितलं जात की त्याचवेळी कवी प्रदिप यांनी हे गाणं लता मंगेशकर यांनी म्हणावं अशी विनंती केली. सी. रामचंद्र यांनी देखील ती मान्य केली. आत्ता लता आणि आशा दोघींही हे गाण गाणार होत्या. गाणं ड्युएट होणार होतं.

कार्यक्रमाची तारिख जवळ आली. दोनचं दिवसात दिल्लीला जाण्यासाठी सगळे निघणार होते.

अशा वेळी आशा भोसले अाजारी असल्याने येणार नसल्याची माहिती मिळाली.

कार्यक्रम सुरू झाला एकेका संगीतकाराची गाणी गायली जावू लागली. त्यानंतर नंबर आला तो ये मेरे वतंन के लोगों या गाण्याचां. सी. रामचंद्र यांनी संपुर्ण सोय केली होती. लता गाणं गावू लागल्या आणि वातावरण बदलू लागलं. लोकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले.

खुद्द पंडित जवाहरलाल भावूक झाले. गाणं शेवटाकडे आलं तेव्हा “जय हिंद जय हिंद कि सेना” चा आवाज कोरसमधून ऐकू येवू लागला. कोरस देणारे समोर नव्हतेच मग कोण गाणं म्हणू लागलं आहे? लोकांना समजलं नाही.

प्रेक्षकचं कोरस देत आहेत असा समज झाला आणि प्रेक्षक देखील त्यात सहभागी झाली.

आत्ता मुद्दा राहतो तो हे गाणं नेमकं कोणाच होतं? तर त्याचं उत्तर नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघांनी चंद्रावर पाऊल ठेवलं त्या वाक्यात शोधता येईल काय ?

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.