दुबईची राजकुमारी दुर्दैवी देखील असू शकते, वाचा म्हणजे लक्षात येईल.

तुम्हाला कोणी सांगितलं की एका पंतप्रधानाची पोरगी जिचं खानदान अख्या देशाचं मालक आहे, तर तुम्ही विचार कराल की कसली नशिबवान पोरगी आहे. जस काय सटवीने हिच्याच हातात पेन देऊन स्वतःचं नशिब लिहायला सांगीतलं. पण या बाबतीत तस काहीच नाहीये .

ही कहानी आहे एका दुर्दैवी दुबईच्या राजकुमारीची.

तिचं नाव आहे शेख लतिफा. 

5 डिसेंबर 1985 साली शेख घराण्यात जन्मलेल्या लतिफाचं बालपण म्हणजे सोन्याच्या कार, हिरे लावलेले ताट वाट्या यांच्या मध्येच अगदी दुबईच्या राजकुमारीला  शोभेल अस गेलं पन जसजस वय वाढत गेल तसतस तिला बाहेर फिराव मित्रमैत्रीनीसोबत ट्रिप काढावी. पण बाप तर राजा ! त्याने तिला  तिला बाहेर पडु दिल नाही.

शालेय  शिक्षण संपल कि तीला राजवाड्यात ठेवलं तेही लागेल ते सगळं मिळेल पण बाहेर नाही पडायच या अटीवर. तिला या सगळ्याचा कंटाळा आला आणि तिने पळुन जायचा विचार केला, पन तो प्रयत्न असफल झाला. तिच्या बापाने तिला शोधुन परत आपल्या देशात आणलं.त्यानंतर मात्र तिचा छळ सुरु झाला. तीनपेक्षा जास्त वर्ष लतीफाला स्वताच्याच राजवाड्यातील एका अंधारया खोलीत डांबुन ठेवण्यात आलेलं. खिडकीतुन रोज काहीतरी खायला आणि पाणी एवढ भेटत होतं. कधी कधी अचानक  तिच्या बापाचे बॉडीगार्डपैकी कोनीतरी येत आणि तिला मारु लागत. ती ओरडु लागल्यास तिला म्हणत,

“तुझ्या बापाने तुला मरोपर्यंत मारायला सांगितलय. आम्ही त्याचे नोकर आहोत. आम्ही काहीच करु शकत नाहीत”

शेवटी बापाला दया येऊन तीची रवानगी घरात केली पन अटी त्याच की बाहेरील कोणाशीही बोलायचं नाही , लागल ते घरातच भेटंल..

असे दिवस जात असतानाच लतिफाने बापाच्याच ऑफिसमध्ये काम करत असलेला मुळचा फ्रेंच गुप्तचर खात्यात काम केलेला एका माणसाच्या मदतीने नियोजन केलं आणि एका मैत्रीणीबरोबर पळुन जायचा निर्णय घेतला.

एक मोठी अमेरीकन समुद्री बोट ‘नोस्ट्रोमो’ जी भारताकडे येनार होती तिचा कॅप्टन वगैरे सगळ्यांना मॅनेज करुन 24 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी दुबई सोडली.  त्याअगोदर तिने एक 39 मिनीटाचा व्हिडीयो तयार करुन ठेवला होता , त्यात तिचा होणारा छळ, देश का सोडत आहोत सगळ्या जीवनाची  कर्मकहानी सांगीतली होती.

देश सोडताच तिने एका ब्रिटीश मैत्रीनीला आपले व्हिडीयो इंटरनेटवर टाकायला सांगीतले जेनेकरुन सगळ्या जगासमोर ही कहानी येईल .त्या बोटीवर तिच्यासोबत आणखी पाच जण होते. ते दुबईचे रहिवाशी नव्हते.

3 मार्च 2018 रोजी ते जहाज भारतीय सागरी किनारयाच्या गोवा सरहद्दीच्या जवळ आले. मग तिने आपल्या सोबत असलेल्या त्या फ्रेंच मित्राच्या मदतीने काही भारतीय पत्रकारांना संपर्क केला आणि मदतीचे आवाहन केले .

पण दुसरा दिवस उजाडला तोच गोळीबारांनी .

राजकुमारीने आपली ब्रिटीश मैत्रीन राधा स्ट्रिलींग हिला शेवटचा व्हॉटसअप मॅसेज पाठवला ,”राधा मला मदत कर, बाहेर खुप माणसं आहेत आणि ते गोळीबार करत आहेत”

गोव्यापासुन फक्त 40-50 किलोमिटर अंतरावर ते जहाज ताब्यात घेण्यात आलं. जहाजाच्या कॅप्टनलासुद्धा  पकडण्यात आलं. अर्थात हे मिशन होतं भारतीय नौदल आणि युएई मिलीटरी फोर्सच लतिफाला पकडण्याच …

यामध्ये तिन भारतीय,दोन अरबी जहाजं ,दोन मिलीटरी विमानं आणि एका हेलिकॉप्टरचा  उपयोग करण्यात आला होता. एका असहाय्य ,स्वातंत्र्याच्या शोधात निघालेल्या मुलीला पकडायला जि ओरडु ओरडु सांगत होती की “मला परत दुबईला जायच नाही, माझा तिथ छळ होतो मला मोकळ्या हवेत जगु द्या”

अर्थात तिच ऐकणारं कोणीच नव्हतं.

तिच्या वडिलांनी म्हणजेच दुबईच्या पंतप्रधानांनी वैयक्तिक स्तरावर भारतीय सरकारला राजकुमारी लतीफाला पकडून परत पाठवून देण्याची विनंती केली होती. दुबई सरकारतर्फे अशी कोणतीही अधिकृत मागणी आली नसतानाही भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ते जहाज दुबई सरकारच्या हवाली केले.

दुबईमध्ये गेल्यावर बोटीवर हजर असलेल्या इतर प्रवाशांना दोन आठवडे ताब्यात ठेवून चौकशी केली गेली आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. त्यांच्यापैकी फिनलंडच्या टीना जोहानन हिने सुटका झाल्यावर सांगितलं की भारतीय कमांडोंनी पाचही जणांना बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघटनानी या घटनेविरुद्ध आवाज उठवला.

राजकुमारी शेख लतीफा आणि तिच्या दोन साथीदारांचे प्रतिनिधित्व करत असलेली लॉ फर्म ग्वर्निका 37 ने ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला सांगितले की त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थांना ताबडतोब हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. यानंतर ‘युनायटेड नेशन्स वर्किंग ग्रुप इनफोर्सड अॅन्ड इनव्होलंटरी डिसप्लेरन्स’ (WGEID)ने यू.ए.ई. आणि भारत यांना लतीफाला बळजबरीने अटक करून गायब करण्याच्या कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपांचे उत्तर देण्यास सांगितले आहे.

ग्वेर्निका 37 मधील टॉबी कॅडमॅन सांगितले की, WGEIDने या दोन्ही सरकारांना अमेरिकन ध्वज असलेले नोस्त्रोमो हे जहाज आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेच उल्लंघन करून ताब्यात का घेतले आणि त्यावर दोन्ही देशाच्या नौदलाच्या संयुक्त ऑपरेशन खाली कारवाई का केली याचेही कारण विचारले आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घटना अरबी समुद्रात घडल्याचे अमान्य केले आहे आणि चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. दुबई सरकारने या विषयावर बोलण्यास नकार दिला .

आज या घटनेला सात महिने होत आलेत. राजकुमारी शेख लतीफाचा ठावठिकाणा कोणालाच माहित नाही .

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.