टेनिस सुपरस्टार लिएंडर पेसच्या जीवावर ममता बॅनर्जी गोवा जिंकायचा विचार करतात..

भाजपा आणि काँग्रेसनंतर  टीएमसी  अर्थात ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष देशभरात आपलं जाळं पसरवण्याचा प्रयत्न करतयं. पश्चिम बंगाल राज्यापुरता मर्यादित असणारा हा पक्ष राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर इतर राज्यांत असणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतयं.

यासाठी पक्ष इतर पक्षांना  ततोडीसतोड देत रणनिती आखतयं. नवीन उमेदवार आपल्या सोबत जोडल्या बरोबरच टीएमसी  इतर पक्षातील नेत्यांना ही आपल्याकडे वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतयं. 

म्हणजे गोव्याचचं बोलायचं झालं तर, पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.  ज्यासाठी पक्षानं जोरदार तयारी सुरु केली आहे. या प्रयत्नांत इतर पक्षाचे नेते सुद्धा पक्षाशी जोडले जात आहेत. यात भाजपा नेता सब्यासाची दत्ता,  काँग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरियो, अभिनेत्री नसीफा अली आणि अनेक बड्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

आता तृणमूल काँग्रेसच्या या गोव्याच्या टीम मध्ये  आणखीन एक नाव जोडलं जातयं. ते म्हणजे टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस.

लिएंडर पेसने गोव्यात ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. लिएंडर पेसने तृणमूल काँग्रेसचा झेंडा फडकावत आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे.

लिएंडर पेस हे भारतातीलच नव्हे तर जगातील सुपरस्टार टेनिसपटू आहे.

लिएंडर पेस यांना ४८ वर्षांपासून पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  गोव्यातील टीएमसीमध्ये लिएंडर पेसचा समावेश करून टीएमसीने निवडणुकीत संपूर्ण तयारीनिशी उतरलो असल्याचा  संदेश दिला आहे. 

यावेळी लिएंडर पेस म्हणाले की,

मी १४ वर्षांचा असताना ममता क्रीडा मंत्री होत्या आणि त्यांनी मला माझे स्वप्न साकार करण्यास सक्षम केले.  आता मी निवृत्त झालो आहे.  मी ममता यांच्या मार्गदर्शनाखाली आलो आहे, जेणेकरून मी जिथे आहे, तिथल्या लोकांसाठी काहीतरी करू शकेन.  माझ्या करिअरवर ममताचा प्रभाव पडला आहे. 

लिएंडर पेस यांच्या प्रवेशाबाबत ममता बॅनर्जी या वेळी म्हणाल्या,

लिएंडर पेस टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. ते माझ्या लहान भावासारखा आहेत.

टीएमसीने ट्विट करून म्हटले आहे की, आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, लिएंडर पेस ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये सामील झाले.  2014 पासून आम्ही वाट पाहत असलेल्या लोकशाहीची पहाट या देशातील प्रत्येकाला दिसेल याची आम्ही एकत्रितपणे खात्री करू.

दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी गोव्यात आहेत.  ममता बॅनर्जी यांना आता बंगालनंतर गोव्यात टीएमसीचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी प्रशांत किशोर  यांची IPAC टीम कामाला लागलीये. 

यापूर्वी गोव्यात, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की मी एकता आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतो, मी ज्या प्रकारे पश्चिम बंगालशी जोडलेली आहे, गोवा देखील माझ्यासाठी माझी भूमी आहे.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.