झालेल्या महायुद्धातल्या न झालेल्या प्रेमाचा फोटो, जगासाठी आयकॉनिक ठरला.

तारिख होती १४ ऑगस्ट १९४५ ची. स्थळ होतं अमेरिकेच्या न्युयॉर्कमधलं जगप्रसिद्ध टाईम्स स्केअर. जपानने शरणागती पत्करली होती. दूसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला होता. टाईन्स स्केअरला जमलेल्या लोकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली. हा काळ तोच होता जेव्हा जपानमध्ये अणुबॉम्बच्या दाहकतेनं कित्येकजण शेवटच्या घटका मोजत होते. युद्धात चुक बरोबर अशा गोष्टी नसतात. असते ती फक्त बाजू. इथे अमेरिका जिंकली होती. अमेरिकेत जल्लोष चालू होता. चांगली गोष्ट हिच होती की महायुद्ध संपल होतं.

याच वेळी अल्फ्रेड इजनस्टेड नावाचा पत्रकार तिथे एका क्षणाचा शोध घेत होता. फोटोग्राफीच्या दुनियेत हा माणूस बाप म्हणून ओळखला जायचा. त्याला एकच फोटो हवा होता. दूसरं महायुद्ध संपल्याचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांमधून तो क्षण शोधत होता.

याबद्दल अल्फ्रेड इजनस्टेड आपल्या पुस्तकात म्हणतो,

“तेव्हा मी काहीतरी विशेष शोधत होतो. माझ्या लाईकाच्या लेन्समागून मी कुठे काय टिपता येईल याचा शोध घेत होतो. अचानक एक पांढरे कपडे घातलेली मुलगी कोणाच्यातरी मिठीत जात असल्याच मला दिसलं. क्षणभर मी स्तब्ध झालो आणि दूसऱ्याच सेकंदाला मी तो फोटो काढला.”

हाच तो फोटो, एक नौसेनिक एका नर्सला किस करतोय. दूसऱ्या दिवशी हा फोटो छापून आला आणि दूसरं महायुद्ध संपल्याची अधिकृत घोषणा झाली हे पटवून देणारा हा फोटो एक प्रतिक मानला गेला. युद्धाच्या मैदान संपुन प्रेमाची सुरवात झाल्याचा क्षण म्हणून तो टाईम प्रत्येकाने जपून ठेवला.

पण खरी गोष्ट पुढे झाली. तो नौसैनिक कोण होता. नर्सची कपडे घातलेली ती कोण होती. त्यांच्यात खरेच काही संबध होते का?

कित्येक प्रश्नांची उत्तरे अपुर्णच राहिली होती. कारण जेव्हा अल्फ्रेड इजनस्टेड यांनी तो फोटो काढला तेव्हा त्यांनी हा ना त्या नौसैनिकाच नाव विचारलं होतं ना की त्या नर्सचं.

फोटो जगप्रसिद्ध झाला आणि तो माझाच फोटो आहे असा दावा करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ति ठराविक काळानंतर समोर येत गेल्या. फोटोच्या मागच्या गोष्टी, त्यांच नात प्रत्येकाला माहिती तर करुन घ्यायचच होतं पण ते आज कुठ आहेत. त्या आनंदाच्या क्षणानंतर पुढे काय झालं याच कुतूहल देखील तसच होतं. एक एक करत अकरा जणांनी आपण त्या फोटोतील नौसेनिक असल्याचा दावा केला.

१९८० च्या सुमारास त्याच अकरा जणांपैकी एकाचा दावा जवळ जाणारा होता. पोर्तुगीज वंशाचे असणारे जॉर्ज मेंडोसा याचाच हा फोटो असल्याची खूण पटली होती. पण ती कोण होती. स्टोरी काय होती. तेव्हा जॉर्ज मेंडोसा म्हणाले, ती पांढऱ्या कपड्यांमध्ये तिथे उभा होती. युद्धाच्या काळात नर्स, डॉक्टर आमच्यासाठी देवासारखे धावून येत असेल. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता. मला समजलं नाही, मी तिच्या जवळ गेलो आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. मी अचानकच किस केलं आणि तिनेही विरोध केला नाही. तो आनंदाचा क्षण होता. ती कोण होती देखील मला माहित नाही.

त्यानंतर फोटोतील ती नर्स ग्रेटा फ्राईडमेन नावाची स्त्री असल्याची समोर आलं. बऱ्याच काळानंतर म्हणजे १९८० च्या दरम्यान फोटोग्राफर अल्फ्रेड इजनस्टेड, नौसेनिक जॉर्ज मेंडोसा आणि नर्स ग्रेटा फ्राईडमेन पुन्हा त्याच ठिकाणी भेटले. 

ग्रेटा म्हणाली,

“माझ्यासाठी तो क्षण रोमॅंटिक नव्हता, त्यात आनंद होता. तो समोर आला तेव्हा आणि किस घेवू लागला तेव्हा मी त्याला विरोध केला नाही. मला त्यात रोमॅंटिक देखील वाटलं नाही. तो फक्त निखळ आनंदाचा प्रकार होता. पण हा क्षण जगातला सर्वात सुंदर म्हणून गौरवण्यात आला.”

पुढे काय झालं, तर 

त्यांच्यात प्रेम नव्हतचं. तो फक्त एक क्षण होता. ग्रेटाची मुलगी सांगते माझ्या आईची व त्यांची इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा भेट झाल्यानंतर ते चांगले मित्र झाले. त्यांनी आपली मैत्री शेवटच्या क्षणापर्यन्त जपली. ८ सप्टेंबर २०१६ साली ग्रेटाचा मृत्यू झाला आणि काल जॉर्ज मेंडोसा. या दोघांनी आपण लक्षात ठेवायला हवं. यासाठी नाही की,प्रेमाची का वेगळी व्याख्या वगैरे त्यांनी सांगितली म्हणून. त्यांनी फक्त इतकच सांगितलं की न एक क्षण देखील प्रेमाचा असू शकतो. २० व्या शतकात दोन दोन महायुद्धांचा इतिहास सांगत असताना, त्याच पुस्तकात हा फोटो ठेवावा इतकच त्यांनी दाखवलं.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.