लेनीन व्हाया भगतसिंग : भाजपचं वैचारिक दारिद्रय.

शेवट दोन तास राहिले असताना भगतसिंग “लेनिन रीव्हाल्युशनरी” हे पुस्तक वाचत राहिले. जेलमध्ये असताना लेनिनला टेलिग्राम पाठवण्याची इच्छा होती.

 

लेनिन हा समाजवादी विचारधारेने झपाटलेल्या जगभरातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिलेला आहे. रशियातील बोल्शेविक क्रांतीचा हिरो ज्याने जगात सर्वप्रथम समाजवादी विचारसरणीचं सरकार स्थापन केलं. भारताच्या संदर्भात भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांना देखील लेनिनकडूनच प्रेरणा मिळाली. याचं उत्तर आपल्याला इतिहासात २१ जानेवारी १९३० च्या एका घटनेत मिळतं. त्या दिवशी लाहोर खटल्याच्या संदर्भात कोर्टात आलेल्या भगतसिंगांनी एक टेलिग्राम वाचून दाखवला, जो ते लेनिनला पाठवू इच्छित होते. त्या टेलिग्राममध्ये भगतसिंग म्हणतात की, “ लेनिन दिवसाच्या औचित्यावर आम्ही त्या सर्वांना अभिवादन करू इच्छितो, जे महान लेनिनच्या विचारांना पुढे घेऊन जात आहेत. रशियात होत असलेल्या महान प्रयोगाच्या यशस्वीतेची आम्ही कामना करतो”

DKyNG6CXkAAz2EQ
twitter

भगतसिंगांच्या एकूणच जडणघडणीवर लेनिनचा खूप मोठा प्रभाव असल्याचं बघायला मिळतं. भगतसिंग स्पष्टपणे स्वतःला ‘बोल्शेविक’ म्हणवून घेत आणि मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित समाजाची निर्मिती करू इच्छित होते. भगतसिंगांनी फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या दोन तासांपूर्वी आपले वकील, प्राण मेहता यांच्याकडून ‘रीवाल्युशनरी लेनिन’ हे पुस्तक मागवून घेतलं होतं. ते पुस्तक ज्यावेळी मेहता यांनी भगतसिंगांना दिलं, त्यावेळी लगेचच त्यांनी ते वाचायला घेतलं. आपल्याकडे फारशी वेळ शिल्लक नसल्याची कल्पना असल्याने त्यांना ते संपवून टाकायचं होतं, असं मेहतांनी लिहलंय. विशेष म्हणजे जनतेच्या आक्रोशाला घाबरून भगतसिंगांना निर्धारित वेळेपूर्वीच फाशी देण्याचं ठरल्याने ते संपूर्ण पुस्तक वाचूच शकले नाहीत.

भगतसिंग हे स्वतःला कम्युनिस्ट मानत आणि लेनिन हे त्यांचं प्रेरणास्थान होतं. भगतसिंग हे भाजपसाठी देखील हिरो आहेत. थोडक्यात काय तर लेनीनच्या विरोधाच्या रस्त्यात भगतसिंग येतात हे भाजपला लवकर समजो हिच इच्छा !!!

Leave A Reply

Your email address will not be published.