लेनिनच्या पुतळ्याचा घनघोर किस्सा !!!

“पुतळा पाडण्यापूर्वी डोकं लावलं असत तर संघ आज जगात पोहचला असता.” अस आम्ही नाही तर डावे लोक म्हणतात.

संघ नेहमीच उत्साहाच्या भरात आत्मघातकी निर्णय घेतो आणि पुरोगाम्यांना मोर्चे काढायची संधी देतो. नुकताच पाडण्यात आलेला लेनिनचा पुतळा देखील याच आत्मघातकीपणाच वैशिष्ट मानावे लागेल. त्रिपूरामध्ये सत्ता आल्यानंतर कधी नव्हे ते सुनिल देवधर हे नाव पांचजन्यच्या बाहेर झळकू लागले होते. तोच या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचा विषय राष्ट्रीय करत देवधरांच्या प्रकरणाची हवाच काढून घेतली.

सदरच्या या अतिप्रसंगाच वर्णन पुरोगाम्यांनी नेहमीप्रमाणं “विचारांची लढाई” या ग्रंथात नोंदवून घेतल असलं तरी यापुढे उत्साहाच्या भरात संघकार्यकर्त्यानां निर्णय घ्यायचे झाल्यास त्यांनी नेमकं काय करावं यासाठी आम्ही हे उदाहरण देत  आहोत.

तर हि गोष्ट लेटेस्ट.
लेटेस्ट म्हणजे २०१५ सालातली.

युक्रेनचे अध्यक्ष “पेट्रो पोरोशेको” यांनी जगभरातल्या लोकांना “डिकम्युनायझेशनचा” आवाज दिला. आत्ता त्यांचा देश युक्रेन, त्यात त्यांच नाव पेट्रो पोरोशेको. अशा माणसाचं कशाला जग ऐकणार.

जग ऐकत नाही म्हणल्यानंतर त्यांनी आपल्या देशात असणाऱ्या लेनिनच्या पुतळ्यांकडे मोर्चा वळवला. या पुतळ्यांच काहीतरी विशेष करावं असा विचार त्यांच्या डोक्यात आला.

 

    

त्यानंतर त्यांनी लेनिनचा हा पुतळा स्टार वार्सच्या डार्थ वाडर मध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. अस का ? तर हे डावे मुळात डोक्यानं शहाणे असतात. पुतळा तोडला की हे त्या जागेवर पुतळ्याच स्मारक उभा करतात. म्हणून पेट्रो अध्यक्षांनी सरळ सरळ लेनिनच्या पुतळ्याला एका खुंखार विलनच रुपडं देवून टाकलं. विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय तिथच थांबले नाहीत तर त्यांनी या पुतळ्यात मोफत वायफायचं सॉकेट देखील बसवलं जेणेकरून लोकांनी या ठिकाणी यावं आणि रोज व्हिलनचा पुतळा पहावां !!!