आधी मेकअपचं सामान बनवणारी LG आता जगातली टॉपची इलेक्ट्रॉनिक कंपनी कशी बनली?

आज जगभरात ब्रँडचाचं बोलबाला आहे. म्हणजे कुठली वस्तू घ्यायची झाली तर आपण फेमस ब्रँडकडेचं वळतो. कारण क्वालिटी बरोबर इतक्या वर्षांचा विश्वास कंपनीने मिळवलेला असतो. यातलचं एक नाव म्हणजे एलजी. ज्यांची प्रोडक्ट आज आपल्याला प्रत्येकाच्या घरात हमखास पहायला मिळतील.

कारण एखाद्याला टीव्ही घ्यायचे असो, वॉशिंग मशीन किंवा  कुठलही इलेक्ट्रोनिक प्रोडक्ट घ्यायचं असेल तर आपण ते एलजीचीचं निवड करतो. कारण स्पष्ट आहे इतक्या वर्षांन

जगातल्या सर्वाधिक विस्तारलेल्या कंपनीत एलजीचं नावं आघाडीवर घेतलं जात. तशी कंपनी सगळ्याचं क्षेत्रात उतरलीये, पण खास करून फेमस आहे ती आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टसाठी. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, जेव्हा कंपनीची सुरुवात झाली तेव्हा ती इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट नाही तर आपल्या डेली यूजच्या वस्तू साबण, कॉस्मेटिक्स, क्रीमचं मॅन्युफॅक्चरिंग करायचीइनावानं 1947 साली ही कंपनी सुरू झाली. जसं आपण आधीच पाहिलं कंपनी डेली यूजची उत्पादन तयार करायची. प्रोडक्टची क्वालिटी एकदम भारी असायची त्यामुळं कोरियतल्या लोकल बाजारात कंपनीमे आपला जम बसवला.

पुढे कंपनीने प्लॅस्टिक म्यॅन्यूफॅक्चरींग कंपनी सुद्धा सुरू केली. जी साऊथ कोरिया मधली पहिली प्लास्टिक कंपनी होती. लॅक हूईचे प्रॉडक्ट इतके फेमस होते की, लोक त्यांना लकी प्रोडक्ट म्हणायला लागले.

पुढे 1958 मध्ये लॅक हूई कंपनीने गोल्ड स्टार नावाने कंपनी स्थापन केली. आणि अशाप्रकारे लॅक हूई आणि गोल्ड स्टार या नावांच्या कॉम्बिनेशनने एलजी नावानं कंपनी बाजारात उतरली. आणि कंपनीची टॅगलाइन ‘Life’s Good’ अशी ठेवण्यात आली.

या एलजी कंपनीचं पहिलं प्रोडक्ट होतं, रेडिओ जे काहीचं मोठं हिट झालं. त्यानंतर कंपनी उत्तर कोरीयातून बाहेर पडून इंटरनॅशनल ब्रँड बनण्याच्या दिशेनं वाटचाल करायला लागली.

त्यानंतर कंपनीने जगातला पहिला सीडीएमएम मोबाईल हेडसेट लाँच केला, जो कंपनीसाठी एक मास्टरपीस ठरला. त्याच्या 3 वर्षातचं जगातला पहिला प्लाझ्मा टिव्ही बाजारात आणला. जो जवळपास 60 इंचाचा होता. याच साखळीतं कंपनीने अल्ट्रा एचडी टिव्ही सुद्धा बनवला, जो जगातला सगळ्यात मोठा टीव्ही होता.

2013 पर्यंत एलजी सेकंड लार्जेस्ट टिव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनली होती. जी जवळपास 30 पेक्षा जास्त कंपन्या चालवते. यात केमिकल इंडस्ट्रीज, होम अप्लायन्सेस, टेक्स्टाईल्स, कॉस्मेटिक प्रोडक्ट, मेडिकल, पाईप, आणि कोको कोला, पेप्सिको अशा कितीतरी उपकंपन्या आहेत. ज्या जवळपास 80 देशांमध्ये पसरल्यात. आणि जवळपास 220,000 पेक्षा जास्त कर्मचारी कंपनीसोबत जोडले गेलेत.

हे ही वाचा भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.