टाटांनी LIC ला संकटातून बाहेर काढलं आणि त्यातून TCS देखील मोठी केली

काल केंद्रीय बजेट सादर झाल. यात अनेक घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत. यात एलआयसीचे आयपीओ विक्रीसाठी काढले असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे देशात एलआयसी संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या.

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. यंदाच्या वर्षीपासून बाजारात एलआयसीचे आयपीओ बाजारात येणार आहेत. सद्या एलआयसीकडे ४०० अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

एलआयसीने अनेकवेळा देशाला संकटातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. आता देशाची आर्थिक परिस्थीती सुधारण्यासाठी पुन्हा एलआयसीचाच हात पकडावा लागत आहे. पण या अगोदर एलआयसीचं संकटात सापडली होती. एलआयसीला संकटातून बाहेर काढण्यासाठी टीसीएस पुढ आली होती.

जेआरडी टाटा यांचा कामानिमित्त युरोप, अमेरिकेत वावर असायचा. त्यावेळी त्यांना संगणकाचा झपाट्याने होत असलेला वापर दिसायचा. त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांना संगणकावर डाटा प्रोसेसिंग करणारी एखादी कंपनी काढण्याचे सुचवले.

त्यावेळी टाटा यांनी टाटा कंप्युटींग सेंटर (टीसीएस) या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी सरकार स्वत: चे कंप्युटर घेऊन देत नव्हत. त्यामुळे भाड्याचे कंप्युटर घ्यावे लागत होते.

जेआरडी टाटा यांनी टीसीएसची जबाबदारी फकीरचंद कोहली यांच्याकडे दिली होती.    

भारतात त्याकाळी संगणक क्षेत्रासाठी पोषक वातावरण नव्हते. टाटाच्या कंपन्या व इस्रो,हिंदुस्थान एरोनॉटीक्स अशा सरकारी कंपन्याची थोडीफार कामे यावर टीसीएसचा गुजारा सुरु होता. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशनमुळे आयातनिर्यातीवर बंधने घातली होती. संगणक उद्योगावर तर १३५% इतकी अन्यायकारक कर आकारणी होत होती.

एकदा तर संगणकाला यंत्र म्हणावे हे सांगण्यासाठी टीसीएसला न्यायालयात जावे लागले होते.

इंदिरा गांधींच्या आणीबाणीला हरवून आलेल्या मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारात तर हे नियम आणखी प्रचंड कडक झाले होते.

तेव्हाचे उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी आयबीएम या जगातल्या सर्वात मोठ्या संगणक कंपनीला भारतातून पळवून लावले. एकूणच अंधकारमय वातावरण होते.

देशातील एलआयसी या मोठ्या कंपनीने त्यावेळी आयबीएमचे कंप्युटर घेतले. पण भारतीयांची अजुनही संगणक कंप्युटर मानसिकता नव्हती, कंप्युटरमुळे काम कमी होणार. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार, अनेकजण बेरोजगार होणार असा समज झाला होता.

एलआयसी महामंडळाने त्यावेळी मोठी गुंतवणूक करुन कंप्युटर खरेदी केले होते. हे संगणक एलआयसीच्या कोलकाता कार्यालयात धुळ खात पडले होते. कारण एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा कंप्युटरला विरोध होता. कारण या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या जाण्याची भीती होती.

कामगारांच्या विरोधामुळे एलआयसी महामंडळ चांगलेच अडचणीत सापडले होते. कारण कंप्युटर मुळ किंमतीत कोण घेणार नाही. अस त्यांना वाटत होत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नूकसान होणार होते.

ही गोष्ट तेव्हा टीसीएसच्या कोहलींना कळली. त्यांनी जेआरडी टाटा यांच्या सल्ल्याने सरकारला सांगितल की,

तुम्हाला हे कंप्युटर नको असतील तर ती आम्ही मुळ किंमतीत घ्यायला तयार आहोत.

तेव्हा एलआयसी मोठ्या संकटातून बाहेर पडली. त्यांनी ती सर्व धुळ खात पडलेली संगणक टीसीएसला दिलीत. याचा फायदा टीसीएसला झाला.

लायसन्स राज सुरु असतानाही टीसीएस कडे स्वत: चे कंप्युटर आले होते. टीसीएसने पुढ जावून अमेरिकेत सॉफ्टवेअर विकण्यासाठी ऑफिस सुरु केल. आज सॉफ्टवेअरच्या दुनियेत टीसीएसचे नाव आदराने घेतले जाते.

संदर्भ – टाटायन, गिरीश कुबेर

हेही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.