भारताला सहिष्णुतेचा डोस देणाऱ्या अरब राष्ट्रांना कार्टूनमधला एक ‘किस’ सहन होत नाहीये

डिस्ने अँड कंपनीची ओळख आपल्याला लहानपणापासूनच आहे. लहानपण जाऊच द्या, मी अजूनही ICE AGE, TOGO, The Lion King, Moana, इतकंच नाही अलादिन वैगेरे पिक्चर्स पाहत असते.  डिस्ने जरी खास लहान मुलांसाठी पिक्चर्स आणि कार्टून्स बनवत असते.

याच डिस्नेचा ‘लाइटइअर’ नावाचा पिक्चर आला असून, हा ऍनीमिटेड पिक्चर आहे. टॉय स्टोरी कार्टून यात दाखवण्यात आलंय.

लाइटइअर काल जगभरात धुमधडाक्यात रिलीज झाला असला तरी काही देशांनी मात्र या पिक्चरला थेट बॅनच केलं आहे.

ही बंदी विशेष करून UAE देशांमध्ये लावली आहे. लाइटइअर हा कार्टून पिक्चर असून तो बॅन का करण्यात आलाय हा महत्वाचा प्रश्न आहे.

तर यात एक लेस्बियन कपल्समधील किसिंग सिन दाखवलाय त्यामुळे ‘लाइटइअर’ जवळपास १५ देशांमध्ये बॅन करण्यात आलाय..

आत्तापर्यंत, १४ देशांनी – मुख्यत्वे दक्षिणपूर्व आशिया आणि मध्य देशांनी आणि पॅलेस्टिनी प्रदेशाने यावर बंदी घातलीय. यात बहरीन, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. 

UAE च्या युथ अँड कल्चर मंत्रालयामार्फत ट्विट करून याची माहिती दिली कि, ‘लाइटइअर’ ला UAE च्या सर्व देशांच्या थिएटर्समध्ये रिलीज करण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. कारण या पिक्चरने UAE देशातील मीडिया सेन्सॉर बोर्डच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तर सिंगापूरच्या मीडिया रेग्युलेशन ऑथॉरिटीने अॅनिमेटेड चित्रपटाला १६+ रेटिंग दिलेले आहे.

लाइटइअरच्या स्टारकास्टमध्ये ख्रिस इव्हान्स, केके पामर, पीटर सोहनो, जेम्स ब्रोलिन, तायका वैतीती आणि डेल सॉलेस यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अँगस मॅक्लीन यांनी केले आहे. हा चित्रपट यूएस मध्ये १७ जून २०२२ रोजीच 3D आणि 4DX मध्ये रिलीज झालेला आहे.

या पिक्चरमध्ये एक बझ लाइटइयर हा अंतराळवीर आहे. तो त्याच्या कमांडर आणि क्रूसह एका अज्ञात ग्रहावर अडकलेला असतो. बझ लाइटइअर अनेक संकटांचा सामना करत पृथ्वीवर परतण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो.

लाइटइअरच्या एका सिनमध्ये यातली एक फिमेल कार्टून कॅरेक्टर तिच्या फिमेल पार्टनरला किस करते. थोडक्यात त्या लेस्बियन असतात. नेमका हाच सीन आहे ज्यामुळे हा पिक्चर बॅन करण्यात आलेला आहे.

अनेक राष्ट्रांमध्ये तेथील कायद्यानुसार समलिंगी संबंध म्हणजे गुन्हा आहे. 

LGBTQ ला मान्यता नसणारे असे अनेक देश आहेत.  समलैंगिकतेबद्दलचं कोणत्याही प्रकारचं कन्टेन्ट ऑनस्क्रीनवर दाखवण्यासाठी बंदी आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या चित्रपटात LGBTQ कम्युनिटीच्याबाबत काही संदर्भ असतो तेव्हा काही विशिष्ट ठिकाणी ही परिस्थिती निर्माण होत राहते आणि अशा पिक्चर्सवर बंदी येत असते.

LGBTQ दृश्यांमुळे चित्रपटांवर यापूर्वी बंदी घालण्यात आली आहे का?

हो हे काय पहिल्यांदा घडत नाहीये तर, याआधीही हॉलिवूड पिक्चर्स आखाती देशांमध्ये बॅन करण्यात आलेले आहेत. 

२०२१ मध्ये आलेला Marvel’s Eternals हा पिक्चर देखील सौदी अरेबिया, कतार आणि कुवेतमध्ये बॅन केला होता. 

Disney/Marvel's 'Eternals,' Season 2 of HBO's 'Righteous Gemstones' and a New 'Star Trek' Series - What's Upstream for Jan. 6-12 | Next TV

च्लो झाओ दिग्दर्शित मार्व्हल्स इटर्नल्समध्ये, यात शास्त्रज्ञ असेलेले ब्रायन टायरी हेन्रीचा आणि फास्टोस हे दोन पात्र  गे दाखवले असतात. त्यांचे ‘समलैंगिक संबंध’ तसेच त्यांचा एक किसिंग सिन यात पिक्चरमध्ये दाखवल्यामुळे सौदी अरेबिया, कतार आणि कुवेतमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती. मार्व्हल्स मध्ये असं पहिल्यांदाच समलैंगीक संबंध दाखवण्यात आले होते.

तेंव्हा सौदी अरेबिया, कतार, कुवेतच्या सेन्सॉर बोर्डाने हा सिन एडिट करण्यास वारंवार विनंत्या केल्या होत्या मात्र डिस्ने करण्यास तयार नव्हते. हा पिक्चर २०२१ च्या नोव्हेंबर मध्ये आखाती देशात प्रदर्शित होण्याची अपेक्षा होती. या चित्रपटावर अजूनही संयुक्त अरब अमिरातीमध्ये बंदी आहे.

याशिवाय आणखी एक उदाहरण म्हणजे, 

डिस्ने मार्व्हलचा मोस्ट सक्कसेसफुल ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा पिक्चर. यात एका फक्त १२ सेकंदाची क्लिप आहे ज्यात एक पात्र म्हणतंय कि, त्याच्या दोन आई आहेत आणि त्या समलैंगिक आहेत. मात्र हे समलैंगिक पात्र देखील दाखवण्यात आले नव्हते फक्त उल्लेख होता तरी देखील वातावरण तापलं होतं. 

एका सौदी अधिकाऱ्याने ती १२ सेकंदाची क्लिप कमी करण्याची विनंती केली होती. मात्र या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. जानेवारीमध्ये, ‘वेस्ट साइड स्टोरी’ हा चित्रपट देखील अनेक आखाती देशांमध्ये दाखवला गेला नाही.

पण हे फक्त आखाती आणि आग्नेय आशियापुरतंच मर्यादित नाही तर २०१७ मध्ये डिस्नेच्या ‘ब्युटी अँड द बीस्ट’ या चित्रपटात डिस्नेच्या इतिहासात पहिल्यांदाच खुलेपणाने समलिंगी पात्र दाखवले गेले होते ज्याच्या रिलीजच्या वेळेस रशियन सरकारने याची दखल घेतली होती. रशियामध्ये समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवले जात नसले तरी इथे या चित्रपटावर बंदीची मागणी करण्यात आलेली.

LGBTQ आणि सिनेमाचा वाद काय आहे?

अगदी यूएस सारख्या देशांमध्ये देखील, खास मुलांसाठी बनवलेल्या पिक्चर मध्ये LGBTQ संबंध दाखवण्याबाबतचा हा सगळा वाद आहे.

विशेषत: मुलांवर केंद्रित असलेल्या सामग्रीमध्ये LGBTQ संबंध दाखवले जाणार नाहीत असं विधेयक मंजूर झाले..हा मुद्दा फक्त सिरीज आणि चित्रपटांच्याबाबत नाहीये तर शाळांमध्ये आणि सिलॅबसमध्ये देखील याचा समावेश चालणार नाही. जर का एखाद्या शाळेत LGBTQ विषयांवर चर्चा करताना जर कोणता शिक्षक आढळला तर त्यांच्यावर विद्यार्थ्यांचे पालक आता कायदेशीर कारवाई करू शकतात. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.