भावांनो, ही घ्या २०२१ च्या ड्राय डे ची यादी… 

जिथ कमी तिथं आम्ही, या बोलभिडूवाल्यांनी संस्कृती नासवली. अरे काय बोलताय काय. दारू पिवून संस्कृती नासत असती तर इंद्रदेवाच्या सोमरसामुळे कधीच स्वर्गलोकातली राजेशाही बुडाली असती. अगदी अगदी सांगायचं झालं तर वेदांमध्ये देखील सोमरसाचे उल्लेख आहेत. दारू पिवून संस्कृती भ्रष्ट होत नसते पण दारू पिवून दंगा करणं, बायकोला मारणं, एकरभर फूकून टाकणं यामुळे नक्की संस्कृती बुडते, त्यामुळे दोन दारूला न देता वृत्तीला द्यावा.. 

असो आपण काय इथं संस्कार भारतीचा क्लास सुरू केलेला नाही. ज्याला गरज लागते त्याच्या अडचणी दूर करणं आपलं काम आहे. दारू पिणाऱ्यांच्या समोरची सर्वात मोठ्ठी अडचण असते ती म्हणजे ड्राय डे चं नियोजन. 

म्हणूनच २०२१ साली येणाऱ्या ड्राय डे चं वेळापत्रक देत आहोत. वाचा आणि शांत बसा… 

जानेवारी :

१४ जानेवारी : मकर संक्रात आहे. 

२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन 

३० जानेवारी : महात्मा गांधी पुण्यतिथी दिन 

यातला ३० जानेवारी हमखास विसरणार बघा, लक्षात असुद्या.. 

फेब्रुवारी :

१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती 

२७ फेब्रुवारी : गुरूनानक जयंती 

मार्च : 

८ मार्च : स्वामी दयानंद सरस्वती जयंती ( भारतात ड्राय डे असतोय महाराष्ट्राच माहित नाही तरिही नियोजन असावं) 

११ मार्च : महाशिवरात्री ( भांग मिळू शकते) 

२९ मार्च : होळी ( चेष्टा नाय दंगा होवू नये म्हणून ड्राय डे ठेवत्यात) 

एप्रिल : 

२ एप्रिल : गुड फ्रायडे 

१४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 

२१ एप्रिल : रामनवमी 

२५ एप्रिल : महावीर जयंती 

मे :  

१ मे : महाराष्ट्र दिन 

१२ मे : ईद 

१३ मे : ईद 

जून :

हायला एक पण दिवस ड्राय डे नाय भिडू 

जुलै :

२० जुलै : आषाढी एकादशी 

२४ जुलै : गुरू पौर्णिमा 

ऑगस्ट :

१० ऑगस्ट : मोहरम 

१५ ऑगस्ट : भारताचा ( म्हणजे आपला) स्वातंत्र दिन 

३० ऑगस्ट : कृष्णजन्माष्ठमी 

सप्टेंबर : 

१० सप्टेंबर : गणेश चतुर्थी 

१९ सप्टेंबर : अनंत चतुदर्शी 

ऑक्टोंबर :

२ ऑक्टोंबर : गांधी जयंती (शनिवार येतोय) 

८ ऑक्टोंबर : गांधी सप्ताहचा शेवटचा दिवस. ह्यो दरवर्षी दगा देत असतोय दिवस लक्षात राहत नाही. त्यात या दिवशी शुक्रवार आहे. सो गुरवारीच नियोजन करा. 

१५ ऑक्टोंबर : दसरा 

१८ ऑक्टोंबर : ईद 

२० ऑक्टोंबर : महर्षि वाल्मिकी जयंती 

नोव्हेंबर : 

४ नोव्हेंबर : दिवाळी 

१४ नोव्हेंबर : कार्तिकी एकादशी 

१९ नोव्हेंबर : गुरूनानक जयंती 

डिसेंबर :

२५ डिसेंबर : ख्रिसमस ( आपल्याकडं सहसा बंद नसतय पण ठेवत्यात कुठं कुठं उगी घोळ नको.. 

यात स्थानिक निवडणूका, महाराष्ट्राच राजकारण पाहता चुकून काय झालच तर विधानसभा निवडणूका, स्थानिक राजकारण, महत्वाच्या व्यक्ती वगैरे वगैरे कारणांमुळे देखील एखादा-दुसरा ड्राय डे वाढू शकतो. त्याला आम्ही व आमचे संपादक जबाबदार नाहीत. स्टॉक हाय का विचारायला फोन करु नये.

thnx me later 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.